मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत| अध्याय तिसरा श्रीस्वामीसमर्थगुरूकथामृत अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा सप्ताहाची फलश्रुती आरती पहिली आरती दुसरी श्रीसमर्थास प्रार्थना कथामृत - अध्याय तिसरा प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात. Tags : kathasamarthaकथासमर्थ अध्याय तिसरा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यैनमः । श्रीअन्नपूर्णायै नमः । ललितादेवी नमोस्तुते ॥१॥सकलांसी वंदितो भावे । संत चरित्र पूर्ण व्हावे । आशीर्वाद मज लाभावे । सकल श्रीसंत देवांचे ॥२॥आशीर्वाद लाभल्यावर । सकल कार्य होय सुकर । ऐसे पुरावे पुराणीं फार । वाचतांना आढळती ॥३॥वरदान मिळाले अर्जुनास । शाप बाधले ते कर्णास । सूर्यपुत्र तो असता त्यास । अपयश आले सर्वदा ॥४॥उदाहरण हे नित्य मनीं । ठेवुनी लोळतो संत चरणीं । वरदान मज द्या ग्रंथ लेखनीं । अखंड त्यासी प्रार्थितसे ॥५॥अनंत लहरी सागरावरी । उसळत असती वरचेवरी । गणिल तयांची संख्या खरी । ऐसा न कोणी विश्वांत ॥६॥तैसाचि संत चरित्र सागर । चमत्करांच्या लहरी त्यावर । प्रकट होती वारंवार । लोकहिता कारणे ॥७॥चमत्कारे लोक वळती । उपदेशाने ना ऐकती । ऐशीच असे ही जनरीतो । ज्ञात सर्वांसि सत्य हे ॥८॥नाठाळ जनां उद्धराया । चमत्कार या सुलभ उपाया-। सिद्ध योजुनी करिती दया । दाविती जनां सत्पंथ ॥९॥अत्तराचा एक थेंब । जैसा नाशितो दुर्गंध । तैसाचि संत संबंध-। घडता दुर्जन पालटे ॥१०॥केवि वर्णू संत महती । वर्णावया ती शब्द नसती । निःस्वार्थपणे कृपा करिती । दीनोद्धारा कारणे ॥११॥सिद्ध, साधू, संत महंत । अधर्मयोगे होत व्यथित । पृथ्वीवरी अवतरतात । धर्मं रक्षावयास्तव ॥१२॥दृश्य-अदृअश्य सृष्टींत । सिद्धांचा अधिकार बहुत । प्रसंग पडल्या जनहितार्थ । चमत्कारही करिती ते ॥१३॥श्रेष्ठ ऐशा योगियांत । नृसिंहयती अति विख्यात । पशु-पक्ष्यांचे मनोगत-। होते जाणत लीलया ॥१४॥तैशीच आता मनोहर । कथा ऐकणे सविस्तर । मृग-मृगी त्यां भेटल्यावर । संवाद झाला श्रवणीय ॥१५॥सानुल्या निज पाडसास । भेटण्याची धरोनि आस । मृगी निघाली शोधायास । महाभयंकर वनामध्ये ॥१६।हिंडता-शोधिता फार थकली । क्षुधे-तृषेने व्याकुळली । वात्सल्यभावे अति तळमळली । पाडस तिचे गवसेना ॥१७॥निजबाळाची आस धरुनी । तैशीच फिरे हरिणी वनीं । सर्वत्र पाहता धुंडाळुनी । हताश झाली अत्यंत ॥१८।तशांत घडले दुजे नवल । मृगे गांठिले तेचि स्थल । मृगीस बघता हर्षोत्फुल्ल । मृग जाहला तेधवा ॥१९॥परि त्यां शावक सापडेना । तेणे तयांसी अति यातना-। तशांत लागे तृषा त्यांना । शोधु लागले जलाशय ॥२०॥अंतरावरी तोंच एक । निर्झर देखिला अति सुरेख । अमृतजलीं बुडवुनी मुख । प्राशिती जल संतोषे ॥२१॥जलप्राशनें संतोषली । तृण भक्षुनी तृप्त झाली । पूर्वस्थानीं ती पातली । पाहु लागली आश्चर्ये ॥२२॥भव्य वृक्षाच्या छायेंत । एक मुनी प्रसन्न चित्त । सुधादृष्टिनें अवलोकित । समोरील त्यां युगुलासी ॥२३॥कां मज बघता टक लावुनी । विसरलात का ओळख जुनी । गतजन्मीचा परिचय म्हणुनी । प्रेमपूर्वक विचारितो ॥२४॥असता आम्ही गाणगापुरीं । होतास आमुचा सेवेकरी । तज्जन्मी तूं प्रखर खरी । अखंड सेवा केलीस ॥२५॥होतासि तूं विप्र रोगी । पीडिलेला महारोगी । निज भक्तीर्ने दया जागी-। करिता, केला रोगमुक्त ॥२६॥हीच मृगी भार्या होती । पतिनिष्ठ साध्वी, महासती । परंतु झाली तुज दुर्मती । संपन्न काल येतांची ॥२७॥मुलेबाळे, धान्य-संचय । गोधन, धन ही सर्व सोय । दूध, दही, नवनीत, साय । गोकुळासम गृह होते ॥२८॥कशासि काही नव्हते उणे । जात होते दिन मजेने । पुढे वर्तसी उन्मत्तपणें । अपमानिले साधूजना ॥२९॥दुष्ट वर्तन असह्य झाले । शापिणे तुज भाग पडलें । पशुजन्मीं या तुज घातले । भोग भोगावयालागी ॥३०॥ऐकता हे सिद्धशब्द । कुरंग राहिले निःस्तब्ध । वृत्त ऐकता ती हतबुद्ध । होउनी अश्रु गाळिती ॥३१॥स्फुरली वाणी जोडप्यासी । प्रार्थना करिती यतिवरांसी । क्षमा असावी अपराध्यासी । चरण चाटिती स्वामिंचे ॥३२॥क्षमा याचिता द्रवले यती । अश्रु नेत्रांतुनी गळती । नरदेहाची तुम्हां प्राप्ती । पुढिल जन्मीं अत्युत्तम ॥३३॥श्रवणी पडता मधुर वाणी । भारावली ती कृतज्ञतेनी । मस्तक ठेविती यती चरणी । साश्रु नयनें पुनःपुन्हा ॥३४॥तोचि पाडसे तिथे आली । भेट होता अति हर्षली । दयासागरें दया केली । पशूंवरी त्या अपूर्व ॥३५॥ऐसे यतिवर्य कनवाळू । मातेहुनीही अति दयाळू । सर्व जीवांचा प्रतिपाळू । सदासर्वदा करिताती ॥३६॥सामर्थ्य पाहता अलौकिक । आश्चर्य पावले मुनि अनेक । सर्व मिळोनी तयें एक । समारंभ तो आयोजिला ॥३७॥हिमगिरीचे सर्व योगी । जमती प्रेमे एक जागी । सन्मानयोग्य हा थोर जोगी । ऐसे वदती ते सर्व ॥३८॥गुहा सजविती पल्लवांनी । मृगाजिन घातले उच्चासनी । फळे, फुले मधु आणुनी । स्वागत करिती प्रेमाने ॥३९॥उच्चासनीम यति बैसता । सभेत आली अपूर्वता । स्मित वदन ते स्वामि बघता । धन्यता वाटे ऋषिजनांसी ॥४०॥ऋषी अर्पिती सुमनमाळा । कुणी अर्पिती मधुर फळां । पर्णद्रोणीं मधु आगळा । प्राशनार्थ देती कुणी ॥४१॥पक्षि करिती किलबिलाट । वनश्रींचे सुरम्य भाट । यतिस्तुतीचा अपूर्व थाट । बघतां तपस्वी आनंदले ॥४२॥ऋषिगण गाती वेदमंत्र । वातावरण ते होय पवित्र । यतिवर असती पूज्यपात्र । यास्तव स्तविती मुनि सारे ॥४३॥योगेश्वरांसी सर्व नमिती । धन्य वदती आम्ही जगतीं । असा योग्यांचा अधिपती । बघायासी न मिळे कदा ॥४४॥ अष्टसिद्धी वोळंगती । रात्रंदिन त्या जयां पुढती । श्रेष्ठपणासी नाही मिती । धन्य जाहलो या दर्शनें ॥४५॥स्वर्णचंपक, बूटमोगरा । बकुल, जाई सर्वेश्वरा । चंदन, केतकी सुलसितुरा । सुगंधी पुष्पे अर्पियली ॥४६॥केशर, कस्तुरी अंगी चर्चिती । नाना सुगंधी द्रव्ये अर्पिती । कमल पुष्पे । पदिं वाहती । ऐसे पूजिती परमादरे ॥४७॥बघुनि दिव्य हा पूजाविधी । यक्ष, गंधर्व, किन्नरांदी । नारद, तुंबर, सुरेश्वरादी । जयजयकारा करिती ते ॥४८॥हे ना केवळ योगेश्वर । हे तो प्रत्यक्ष परमेश्वर । उत्पत्ती, स्थिती, प्रलयंकार । सर्व सत्ता इये हातीं ॥४९॥ऋषिगण भवती दाट जमले । चरणारविंदी नम्र झाले । मार्गदर्शन पाहिजे केले । आपण देवा सदोदित ॥५०॥आसनीं स्वामी स्थिरावले । भक्ति पाहोनि गहिंवरले । आनंदाश्रू पूर चाले । दिव्य तयांच्या नेत्रांतुनी ॥५१॥कंठ जाहला सद्गदित । बोलत असता ऋषींप्रत । जपतप करिता हिमनगांत । परित्यागुनी सर्व काही ॥५२॥अहम् ब्रह्मास्मि तत्त्व कथिती । स्वामी तदार्था विशद करिती । कैवल्यमार्गा सुकर करिती । गुह्य त्यांतील सांगोनी ॥५३॥मर्म कळतां ऋषि हर्षले । महद्भाग्ये यति लाभले । निज मस्तकी चरण धरिले ॥ यतिवर्यांचे सर्वानी ॥५४॥अज्ञानाचा नाश केला । ज्ञान प्रकाशे मार्ग दिसला । शतजन्मींचा लाभ झाला । स्वामी दर्शनें सकलांसी ॥५५॥स्वामि देती आशीर्वाद । ध्येय साधाल निर्विवाद । तुम्हासि बघतां परमानंद-। आम्हासही जाहला असे ॥५६॥ प्रेमे बोलोनि यति उठले । गुहेमधोनी बाहेर आले । मुनिगण तदा वर्षती फुले । जयजयकार करोनिया ॥५७॥जयजयकारे गिरिकंदर-।निनादला तो मनोहर । यतिवर्य जाता दूर दूर । साश्रु नयने बघती ऋषी ॥५८॥धन्य, धन्य तो तपस्वीगण । जयांसि घडले यतिदर्शन । सामान्य आपण पापीजन । दर्शन कैसे घडेल की ॥५९॥कशासि घ्यावी दुष्ट शंका । स्वामी दयार्णव नसती का?। आर्त ऐशा निज भाविका । भेटतील ते स्वप्नांतरीं ॥६०॥आर्तता सर्वाची वाढावी । यतीश्वरांची भेट व्हावी । कल्याणप्रदं गोष्ट घडावी । सकल भक्तांच्या जीवनीं ॥६१॥ऐसे प्रार्थोनि यतीश्वरां । पूर्ण करितो अध्याय तिसरा । संकल्पं आमुचे परमेश्वरा-। पूर्ण करावे सदोदित ॥६२॥इति श्रीस्वामीगुरुकथामृत । त्यांतील अध्याय पूर्ण होत । रामचंद्र गोविंद हे लिहित । स्वामीकृपे सर्वथा ॥६३॥॥ श्रीस्वामी समर्थ की जय ॥ N/A References : N/A Last Updated : April 11, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP