TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कथामृत - सप्ताहाची फलश्रुती

प्रस्तुत कथामृताच्या पारायणाने भक्तगणांना वारंवार विविध मनोहारी अनुभव येतात.


सप्ताहाची फलश्रुती
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीलक्ष्मी नृसिंहाय नमः । समर्थ स्वामी नमोस्तुते ॥१॥
प्रातःकर्मे आवरोनी । सर्वारंभी देव पूजुनी । धूप नैवेद्य दाखवोनी । आरती करावी प्रेमाने ॥२॥
कुलदैवता प्रार्थुनी मनीं । मातापितादी त्या वंदुनी । सद्‌गुरुसी शरण रिघुनी । ग्रंथ आदरे वंदावा ॥३॥
गुरुकथामृत वाचण्याचा । सप्ताह व्हावा पूण साचा । लाभ होवो प्रभुकृपेचा । मनीं करावा संकल्प ॥४॥
उच्चासनीं श्रीसमर्थाची । मूर्ति ठेवोनिया साची । फळे, फुले अर्पुनी तिची प्रार्थना करणे मनोभावें ॥५॥
तुपाचे लावुनी निरांजन । सौभाग्य द्रव्ये-समर्पून । धूप दीपादी ओवाळुन । साष्टांग नमने वंदावे ॥६॥
अध्याय वाचिता नित्य तीन । सातवे दिनीं सहज पूर्ण । सप्ताह होतो हे जाणुन । ग्रंथ वाचणे अत्यादरे ॥७॥
सप्ताह साजरा करा यासी । वेळ नसला जरि कुणासी एका तरी अध्यायासी । नित्य नेमे वाचावे ॥८॥
समर्थचरणीं ठेवुनी मन । ग्रंथाचे जो करि वाचन । तयावरी श्रीसमर्थ जाण । कृपा करतील सर्वथा ॥९॥
निर्बुद्धासी ज्ञानप्राप्ती । निर्धना ये सधन स्थिती । ऐशी असे ग्रंथमहती । यास्तव करणे पारायणे ॥१०॥
निपुत्रिकांसी पुत्रप्राप्ति । स्वामीपदी ठेवुनी भक्ती-। वाचिता पोथी ये प्रचिती ऐसे महत्त्व ग्रंथाचे ॥११॥
अनारोग्य ते जाई लया । ग्रथावर्तनी गोडी जया । अनुभव याचा की घ्यावया । सप्ताह करणे वरचेवरी ॥१२॥
शत्रुत्वाचा व्हावया नाश । समर्थचरिताचा हव्यास-। धरोनि करणे सप्ताहास । गुरुकथामृत ग्रंथाचा ॥१३॥
नानाविध ते विकल्प येती रात्रंदिन ते मना छळिती । नष्ट कराया विकल्पमती । गुरुकथामृत वाचावे ॥१४॥
चिंता इंगळी अति विषार । डसता घाबरे जीव फार । गुरुकथामृत उपाय थोर । नित्य वाचनी ठेवावा ॥१५॥
पिशाच्चबाधा अपस्मार । रोग करिती जे जर्जर । सकल पीडांचा परिहार । गुरुकथामृत करित असे ॥१६॥
स्वामीसमर्थ अलौकिक । दुष्टांसि वाटे सदा धाक । गुरुकथामृत वाचिता एक भक्ता रक्षील सर्वथा ॥१७॥
अश्रद्ध वृत्ती नसावी ती । श्रद्धा खरीही कार्यशक्ती । इच्छिल्याची होत प्राप्ती । श्रद्धा असणे आवश्यक ॥१८॥
धनी धरेचा झालो जरी । विसर आपुला न पडो तरी । शिर ठेवोनि चरणांवरी । प्रार्थितो तुज योगेश्वरा ॥१९॥
मज मतिमंदा दिली स्फूर्ती । म्हणोनि झाली ग्रंथपूर्ती । उपकार देवा वर्णू किती । शब्द होताति पांगुळे ॥२०॥
साष्टांगे नमितो समर्थासी । संत, सज्जन भाविकांसी । गुरुकथामृत वाचील त्यासी । नमन माझे साष्टांगे ॥२१॥
ऐशी असे ही फलश्रुती । स्वामीचरणी ठेवुनी मती । गुरुकथमृत ग्रंथाप्रती । वाचिती तयां तो कल्पद्रुम ॥२२॥
संतजनहो ही लेखणी । समर्थचरनीं मी अर्पुनी प्रेमादरे सर्वास नमुनी ग्रंथपूर्ती करीत असे ॥२३॥
॥ श्री स्वामी समर्थ की जय ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2011-04-15T20:48:53.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

quantum repulsive force

  • क्वांटम प्रतिकर्षी बल 
RANDOM WORD

Did you know?

श्रीदत्तपुराणटीका and more books for shree dattaray
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.