TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
सोड गीता-भागवत पाही दाखला...

लावणी १९३ वी - सोड गीता-भागवत पाही दाखला...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १९३ वी
सोड गीता-भागवत पाही दाखला । तुरा कलगीचा गुलाम सांगता नाहीं लाज तुजला ॥धृ०॥
नह्मता दुंमदुमकार । तेव्हाचा ऐक दाखला निर्गुणनिराकार । तेव्हां तो होता एकला । मग सुटलो वायो त्याचे पोटी तेज झाला । त्या तेजाचे पोटीं ब्रह्म-बीज जन्मला । इथून म्होरं मेरूमदार पुसतो तुजला ॥१॥
अनंत्या त्याच्या मावा, कूर्म अवतार त्यानें धरला । पातळ भुवनामधिं त्यानी प्रकाश मांडला । अपले मस्तकीं शेष त्यांनीं स्थापला । शेषाचे मस्तकी आकार गोटीचा केला ॥२॥
निरगुण निराकार त्यांनी केलीसे लीला । नित अनिमंदा अंगुळ सोपली तिजला ( ? ) । तेव्हां ती सती काये बोले निरगुणाला । काये तुमके पैदा केलें कशाला । जयब्रह्मा विष्णु आहे भ्रतार दिले तुजला । मग करू शृंगार गेली विषय भोगायाला | x   x   x म्हणतो माझी माता कशी भोगूं तुजला ? ॥३॥
गोटीची लांबी रुंदी सांग हां मला । कोणता ब्रह्म होत मेरूच्या पठाराला । कोणत्या वृक्षाचें फळ पडलें धरणीला ? । त्याची वाहती नदी शाहिरा तिचें नांव बोला । गासी टाणाटोणा तू पाखडाला, दे येवढें सांगून, नाहीं तर हो आमचा चेला ॥४॥
कविराज येमा म्हणे आज पुस्ता झालों तुजला । किती स्वर्गाची उंची ? सांग आम्हांला । किती कोस भरले? येकदां हिशेब करून बोला । फुगलास डुकरावाणी, शहाणपण कळलं अवघ्याला । कोणत्या गोष्टीमधिं तुरा गुलाम ठरविला ? । कोणत्या निरगुण मजुर शेतीला केला । खडुर गुह्य ने ( ? ) दोही शास्राचा दाखला । गणू महादू म्हणे कर नागेशावर हल्ला ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:30.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नसता

  • वि. १ अस्तित्वांत नसलेला ; अविद्यमान . हठे बाई कैसी धरुनि बससि गोष्टि नसती । - सारुह ६ . १२२ . २ खरी , प्रत्यक्ष नसलेली ; खोटी ; निराधार . हा कर्मभोग ओढवला सायासी । नसतेच विघ्न हे । - शनि ६८ . ईश्वर होतां पाठमोरा । नसतीच विघ्ने येती घरा । ३ अनावश्यक ; फाजील ; अवास्तव . तूं फार करितोसि टवाळी । नसतीच चढविली कळी । - शनि ७० . जसेः - नसता कारभार = उगाच लुडबुड करणे ; नसता खर्च = अवास्तव , उगाच आलेला खर्च ; नसता उपद्रव = कारण नसतां , स्वतःचा दोष नसतां झालेला त्रास . ४ नुकसानीचा ; तोट्याचा . जसेः - नसता उद्योग - धंदा - व्यवहार - व्यापार . ५ गरीब ; अकिंचन ; दरिद्री . ६ ( गरीबाच्या येथे गडीमाणसे नसतात . त्यास जर श्रीमंतांना पानसुपारी , मेजवानी इ० देण्याचा प्रसंग आला तर तो थट्टेने , उपरोधाने आपल्या अविद्यमान , लटक्याच गड्याला नसत्या म्हणून हांक मारुन करण्यास सांगतो अशा अर्थी ) नसणारा ; लटुपुटीचा ( साणूस , गडी ). अरे नसत्या ! गुडगुडी भरुन आण , राव बसले आहेत . - क्रिवि . वांचून ; विना . - शर . म्ह ० असल्याचे विकार नसल्यचे घोरंकार = श्रीमंतांना चैन कराविशी वाटते तर गरीबास काबाडकष्ट करावे लागतात . 
  • वि. अनावश्यक , अवास्तव , गरज नसताना , फाजील . 
  • p pr  of नसणें Not existent; not real. Uncalled for. 
  • नसता कारभार Meddling. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.