TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
जिवलग जीवीचा बाई छान छबेल...

लावणी ११७ वी - जिवलग जीवीचा बाई छान छबेल...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी ११७ वी
जिवलग जीवीचा बाई छान छबेला ॥धृ०॥
किति तरी जीव हा बाई कसुनि कसावा ।
आनंद सुखाचा प्राणी पलंगीं असावा ।
कोणे सवतीनें मोहुन प्राणविसावा ।
फिताउनि नेला गे फिताउनि नेला ॥१॥
काय आहे दुसरेपाशी काया हे सोन्याची ।
हिरे जडउनी बसली असल मिन्याची ।
म्हणोनिया सांड केली असल जुन्याची ।
पाहा घात केला गे पहा घाट केला ॥२॥
नये मज धुंडित जातां रात्र अंधारी ।
कोणि तरी जवळी आणा, असेल शेजारीं ।
खुशालीनें बक्षिस देइन तुम्हां निर्धारीं ।
शिरपाउ शेला हे शिरपाउ शेला ॥३॥
म्हणे गंगु हैबती प्राणप्रियेसी ।
रहा गडे सावध अपुले क्रियेशीं ।
सुखी राखो देव तुम्हां असें अस्त्रियेशी ।
महादेव भोळा, महादेव भोळा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:27.1700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दावा उगवणें

  • घेणें 
  • ( एखाद्यानें ) केलेल्या अपकारांचा सूड उगविणें 
  • ( एखाद्याने ) केलेल्या अपकारांचें उट्टें काढणें 
  • बदला घेणें 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.