TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
सरल्यावर ही गरज सहज, वैद्...

लावणी २९ वी - सरल्यावर ही गरज सहज, वैद्...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी २९ वी
सरल्यावर ही गरज सहज, वैद्याचें कारण नसे ।
तसे मशी जिवलगा जाहला पाठमोरे कसे ? ॥धृ०॥
ब्रह्मह्रदय जाणुन जवळ पायासन्निध पातले ।
दिसतें मन माघारें, आतां कां आळसावर घातलें ? ।
कामक्रोध षडरिपु दुष्ट शरिरामधें मातले ।
अपेक्षित इच्छिते हेत पुरवावे चित्तांतले ।
सुस्थळ जागा पवित्र पाहुन मी नि:संग राहातले ।
सुख द्यावें दुसर्‍यास, हित पहा मुळ शोधून आंतलें ।
वाटीभर दुध पिऊन शेवटीं पात्र रिकामें जसें ॥१॥
रात्रीचा दिवस करून बदलखातर ही गोष्ट साहिली ।
तेव्हांची ती गेली जशी मृगजळगंगा वाहिली ।
लइ लालुच दावुन, हळुच मज फुसू लावुन मोहिली ।
धरून हतिं नागीण, प्रीतिची बरि वेसण गोविली ।
एक म्हणतां दहा उभ्या, कोणती तरी त्यातुन चांगली ? ।
पुढली जाहलीं पुढें, मागली मग मागेंच राहिली ।
तृप्त होतां वासना, भोजनाचा कंटाळा असे ॥२॥
जाहली वाचादत्त कृपा मजवर जय संपादिले ।
तुम्ही आणिक मी पूर्वीं परस्पर वचन हतावर दिलें ।
तुळशीदळ जर शिळें जाहलें तरि शास्त्रीं वंदिलें ।
विसर पडूं नये कधिं, आधीं ज्याला पदरीं बांधिलें ।
घट उदंड, पण जीवन येक हें सर्वांतरीं भेदिले ।
अतिचंचल चैतन्य चित्त मायाचक्रीं बेधिलें ।
विटाळून सिद्धान्न, ताट भरलें वाया जातसे ॥३॥
तुम्हि चंद्रोदयप्रभा सख्या, मी आज्ञांकित आगळी ।
लाट सागरावरिल, तिला तरि कशि म्हणतां वेगळी ? ।
चालविले बरोबरी धरून माझी तुम्ही करांगुळी ।
हुरमोजी बिनडाग, डाग नसतां केली डागळी ।
एकांती खाशाचे बिछोन्यावरतीं पडते गळीं ।
कल्पवृक्ष भेटतां दैन्य जावें प्रपंचमंगळीं ।
होनाजी बाळा म्हणे, न धरि संशय किंचित राजसे ।
येक निश्चियावरून स्वामींचे सदय ह्रदय होतसे ।

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:21.2200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

झांज

  • वि. लहर ; आवेश ; त्वेष ; मूर्च्छा . ' तरी झांज स्वभावानी आली तरी सबूरी करुन गम खाणें हा मोठा उपाय आहे .' - शामच भारतवर्ष . ४ . 
  • स्त्री. १ पंखा ; विंझणा . २ ताटी ; पडदा . कुरकुला पहा . वाळियाच्या झांजी । दवण्याचे कुंड घालोनी । - ऐपो १५ . 
  • न. एका विशिष्ट तालांत गावयाचें पद , पोवाडा . 
  • स्त्री. मूर्च्छा ; झीट ; घेरी ; चक्कर ; डोळे फिरणें . ( क्रि० येणें . ) [ सं . झंझा ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

देवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site