TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
सख्या तुम्ही चंद्र, मी चा...

लावणी १५८ वी - सख्या तुम्ही चंद्र, मी चा...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १५८ वी
सख्या तुम्ही चंद्र, मी चांदणी । प्रीत चालूं द्या सदा फिदा, किती करूं तरी मनधरणी ? ॥धृ०॥

धरीन पदरासी एकांतीं । तीळ तीळ झिजलें मास, आशेची निराशा या वक्तीं । तुम्ही प्राणाचे संगातीं । बसुन ताजवा तोल बिनमोल तुझी कांती । कमळण पाण्यामधिं खुलती । सुवासिक सुगंध, बघुन चोचल्या घाईच्या वक्तीं । मनीं झुरते मोरावाणी । शांत बसा जयवंता बसा येकांत माझे धनी ॥१॥

शपथ घालीन रघुनाथाची । वेड लागलें मला, भुकेली तुमच्या वचनाची । चटक लागली या स्वरूपाची । घटकेंतून नऊ रंग वृत्ती चालवा उभयतांची । लाज कांहीं धरा क्रियेची । आशावंत मी कांता करिते आठवण रायाची । अलाबला किती घेऊं ? तन्मय झाले पाहुनी ॥२॥

भेट आज झाली लई दिवसा । लालाजी लालडी सुंदरा टाकी उसासा । घातला विषयाचा फासा । क्रियाभाग कोठें राहिला, जाळीं गुंतला मासा । मला घेऊनी पलंगीं बसा । घ्या पानाची विडी घ्या, घडी मग मजवर रुसा । नका दु:ख देऊंअ असा मनीं । मदनबाण चेतला बोलती रत्नाची खाणी ॥३॥

बसा पलंगावर मनमोहना, चकचकाट लखालोट अंगावर घालिते गहिना । तुम्ही पोपट, मी मंजुळा मैना । कवळुन धरते आतां माझ्या मलयगिरी चंदना । आशा मज नाहीं तुमच्या धना । भोगा एकांतीं बसून, तुमच्या फेडिन कल्पना । समजला रतन हिरे खाणी । रामा गाती, गवळी भेती, थिजले पाहुनी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:29.4370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उपजणें

  • अ.क्रि. 
  • उत्पन्न होणें ; जन्मणें ; उदभवणें . ऐसा उपजे नित्य सदभावो । तोहि आपणपांचि । - ज्ञा ६ . ६९ . पदीं उपजती नदी कशि कशी त्रिलोकीसती । - केका ७७ . 
  • पासून निघणें ; मिळणें ; प्राप्त होणें . श्रीरामभजनीं बैसली प्रीत । तेजोमय शरीर दिसत । तेणे इंद्रासि भय उपजलें बहुत । म्हणे पद निश्चित घेईल हा । - संवि २ . १८२ . म्ह० उपजल्या प्राण्यास मरण हें लागलेलेंच आहे . [ उपज पहा ] 
RANDOM WORD

Did you know?

’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site