TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
मंगळधामा श्रीरामा, कधीं म...

लावणी १३७ वी - मंगळधामा श्रीरामा, कधीं म...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १३७ वी
मंगळधामा श्रीरामा, कधीं मजला भेटसी ? ॥धृ०॥
कैकेयीच्या सत्य कराया पितृवचनातें मानी । चामरें, छत्रें दिधलीं भरता भक्त अभिमानी । अयोध्या सोडुनी जाले वैराग्य चापपाणी । मुगुट कुंडलें काढुनी वल्कलें वृक्षाचीं थाटसी ॥१॥

पतिश्रापें सीळा अहिल्या वनीं हो ती उद्धरली । या अरण्यवासामाजीं जयें शुर्पणखा वधिली । सुग्रीवास वाळी मर्दुनी त्वां कीस्कींदा दीधली । स्वामी मारुतीच्या राया मम ह्रदईं दाटसी ॥२॥

पाषाण तरले नामें सिंधुंतुन उतराया । बिभीषणासीं लंका दिधली हा रावण मुर्दुनीया । तेतीस कोटी सोडविलें बंदींतुन देव जया । हा आनंद सर्वत्रांचा. वाटसी ॥३॥

शत्रुचा क्षयो कराया अवतार धरिलासी । ऋषी ब्राह्मण जग रक्षाया जन्मला सूर्यवंशी । महाराज चापपाणी जय अयोध्यावासी । कवि आपा येशवंताचे लावणी दुर्गुण हे लोटसी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:28.3600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लोहो

  • पु. लोभ ; स्नेह ; प्रेम ; आकर्षण ; लाहो . ( देवीचा गोंधळ घालतांना व पुढील म्हणीतच या शब्दाचा उपयोग होतो . इतर ठिकाणी सहसा येत नाही . ) [ सं . लोभ ] म्ह० देखला गोहो लागला लोहो . = लग्न होतांच किंवा नवर्‍याची गांठ पडतांच अल्लड मुलगी त्यावर प्रेम करुं लागली ( घराचा व आईबापांचा विसर पडला ). 
  • न. 
  • लोखंड . 
  • लोखंडाचे केकेले शस्त्र , तरवार इ० . लोहाचे काळवखे पडिले । फररां आकाशु गवसिले । - शिशु ५८५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय ? त्याचा अर्थ किंवा उगम कोणता?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.