TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
छपरपलंग शृंगारून कां ग घर...

लावणी ११३ वी - छपरपलंग शृंगारून कां ग घर...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी ११३ वी
छपरपलंग शृंगारून कां ग घरीं नाहीं प्राणसखा ग ? ॥धृ०॥
मज घालुन प्रपंचघोरीं गेले साजण सखे नौकरीं ।
होतों दोन जीव संसारीं, झाली फुटाफूट निर्धारीं ।
सांगतीं कधिं न वज (?) भारी, परतशील कधिं माघारीं ?
काय करूं या इतर सुखा ग ? ॥१॥
रूपसुंदर सगुणा रे, तुजवाचुन भोगुं कुणा रे ? ।
जळो मखमुली बिच्छोना रे, तळमळते नीच येइना रे ।
राजस कुणि जाउन आणा रे, किति आवरूं तरुणपणा रे ? ।
हरल्या बाई तहानभुका ग ॥२॥
केलि स्वारी ऐन हिवाळी, वाईटबरी करून दिवाळी ।
तधींपासुन नाहीं शुद्ध हे जाली (म) आहे (?) पुरतें पाप कपाळीं ।
धाडिते पत्रें सांजसकाळीं, कसें करित असेन रुतुकाळीं ? ।
मारिते भलत्यातें हांका ग ॥३॥
लागलें पिसें पुरतें मनीं रात्रंदिवस चुरमुरते ।
बोलते हसुन वरवरते धीर देउन काम आवरते ।
तूं तिकडे मी इकडे मरते, भेटशील कधीं ? वाट पाहाते ।
नका भरूं कुणि भांग टिका ॥४॥
गंगु हैबती म्हणे तो हौशी गुणसगुण राजविलासी ।
मन मानले त्या देशीं भोगिता सुख, नाहीं उदासी ।
महादेव गुणरासी करि जडण प्रभाकर खाशी ।
नाहीं जोडा आणिक तुम्हां ग ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:26.9700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सांदीकोंदी

  • इ० शब्द सांधनें आरंभ होणार्‍या शब्दामध्यें पहा . सांदोसांदी - क्रिवि . कोनाकोपर्‍यांत . - दा ३ . १ . १६ . कोणी न येती राजद्वाराकडे । जो तो दडे सांदोसांदी । . सांदा - पु . सांधा पहा . वरि चर्म घातलें रे कर्मकीटकांचा सांदा । - नामना ७१ . सांदी - स्त्री . कोपरा ; फट ; सांधी पहा . सांदीमाजी रगडावा । महानागें पायांतळी । - ह १९ . ९६ . 
RANDOM WORD

Did you know?

रुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site