TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
जोडली प्रीत नको तोंडू सग...

लावणी १५४ वी - जोडली प्रीत नको तोंडू सग...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १५४ वी
जोडली प्रीत नको तोंडू सगुण गुणीराया । केली अर्पण तुला मी काया ॥धृ०॥

आज काय चुकले सेवेला ? पदरीं घाला । कोण्या गोष्टीचा अंतर पडला ? । संकेत मनाचा केला, भरवसा आपला । दासी पायाची, पहा मासला । जीव जळून रक्षा झाला, सांगूं, कुणाला ? । जखमा भाल्याच्या या शरिराला । हितगुज कोणास मी सांगूं पंढरिराया ? । सजणा ह्या गोष्टी जीवीं धराव्या ॥१॥

मी सासुरवासी गणगोताला त्यजिले । आपुल्या स्वरुपाला पाहुन रिझले । उभयतां प्रीत चालवा म्हणुन मी धजले । मर्जी रक्षितां मी पलंगीं निजले । शिवसांब सदाशिव फार दिवस मी पुजले । विषयाच्या घामानें शरीर भिजलें । आज धरा मजवरी करा कृपेची छाया । पलंगीं गुजगोष्टी मज शिकवाव्या ॥२॥

देह घातला करवीं, मी सांगूं मजला संभाळा । दासी चरणाची पूर्ण कृपाळा । तुम्ही राजबनसी राजींन्द्रा कोमळ चंद्रा आज्ञा पाळा । माझा पाहून मराठमोळा । मनरतन गुणी माणसा भरोसा आपली कोमळ आमळा (आबला) । भोग प्रीतीनें बसून मशीं खेळा । मुखचंद्र तुझा सुकुमार वारंवार उभी मी पाहाया । नको कोठें जाऊं प्राणविसाव्या ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:29.2330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

दीन्हणे

  • स.क्रि. ( काव्य ) देणे . दीह्नणे असेहि रुप येते . जरी पाए श्रीचरणां वेधले । हात दास्यासि दीह्नले । - ऋ २६ . ते वेळी देवे आफाॐनु । भीमा दीन्हला सर्वमानु । - शिशु ९२४ . [ सं . दत्त ; प्रा . दिण्ण , दिण्णेल्लय ] 
  • स.क्रि. ( काव्य ) देणे . दीह्नणे असेहि रुप येते . जरी पाए श्रीचरणां वेधले । हात दास्यासि दीह्नले । - ऋ २६ . ते वेळी देवे आफाॐनु । भीमा दीन्हला सर्वमानु । - शिशु ९२४ . [ सं . दत्त ; प्रा . दिण्ण , दिण्णेल्लय ] 
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.