TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
कोणी शोध करा सखयाचा । दाव...

लावणी १३२ वी - कोणी शोध करा सखयाचा । दाव...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १३२ वी
कोणी शोध करा सखयाचा । दावा राघो मैनेचा ॥धृ०॥
सखे मी बाळपणापासून । माहेरिं कीं होते आजुन । कमिले पोरांमध्ये खेळुन । तारुण्या वयामधीं येउन । सासरा आला मज घेउन । आनंद जाहाला बहु दारुण । वेळ वक्त पाहुन दिवसाचा ॥१॥

बारा वर्षें जालीं लग्नाला । हळदीचा डाग नाहीं गेला । पती माझा छालछबेला । टाकुनी कोणाकडे गेला ? । कोणी आणा गे जिवलग जीवीचा ॥२॥

आरसा घेउनि सखुबाई । श्रींगार करीत लवलाही । चार समया जळति ठांई ठांई । पलंगावर हातरली जाई । येथें आसरा नाहीं कोणाचा ॥३॥

सुंदर व्याकुळ जीवाशीं । असें कळलें तिच्या सजणाशीं । धावुनी आला गुणीराशी । भोगिली नार मंदिराशीं । कवी बिरोबा राजबनसी । ख्याल गातो दखनदेशी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:28.0930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गळ्यांत मशिद येणें

  • प्रार्थना करावयास जावे तो मशीदच अंगावर कोसळणें 
  • चांगली गोष्‍ट करावयास जावे तो एखादी आपत्ति ओढवणें. न टळणारी आपत्ति येणें. (गु.) गले तके ओलवावी. 
RANDOM WORD

Did you know?

Gotra. Vats & vatsayan are same ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site