मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय ७०

उपासना खंड - अध्याय ७०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

इंद्रास शूरसेनें, पुशिलें व्रत तें प्रमूख संकष्टी ।

कृतवीर्याला विधिनें, दिधलें तें सांगणें कृपादृष्टी ॥१॥

इंद्र तयासी सांगे, शुभदिन पाहून सतिल करि स्नान ।

नित्यविधि सारुनियां, निश्चय करणें प्रभुव्रता करिन ॥२॥

उपवास करी दिवसा, पूजन करणें गजाननप्रभुचें ।

पुनरपि चंद्रोदयिंही, पूजन करणें दिनापरी साचें ॥३॥

आसन मांडून आधीं, त्यावरि ठेवी सनीर कलशासी ।

त्यावरि ठेवी पीठा, त्यामाजी मूर्त ठेवि यजनासी ॥४॥

हेमाची मूर्त करी, पूजा करि बा यथाविधी राजा ।

वाहे दूर्वा म्हणुनी, नामावलि एकवीस ती ओजा ॥५॥

नंतर प्रार्थू देवा, भोजन द्यावें यथाबलें विप्रां ।

ऐसें आहे व्रत हें, तें करणें चार मास सह-विप्रां ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP