मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|उपासना खंड|
अध्याय २०

उपासना खंड - अध्याय २०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(भुजंगप्रयात्)

विधी व्यास संवाद ऐके पुढें तो ।

करी जातकर्मादि जो जो विधी तो ॥

निमंत्री बहू विप्र ज्योतीष शास्त्री ।

पुसूनी तयां तोषवी रत्‍न वस्त्रीं ॥१॥

सुताचें नृपें ठेविलें नाम दक्ष ।

तया देतसे औषधें भीम दक्ष ॥

तयालागिं त्यानें बहू मंत्र-तंत्र ।

करुनी करी यत्‍न ते सांग यंत्र ॥२॥

करी मित्र-वर्षे तपासीहि भीम ।

नसे गूण सूताहि ताता अराम ॥

बहु दुःखि झाला तसा क्रोध आला ।

सतीला वदूनी उपाहास केला ॥३॥

सुताचें नि तूझें नको दर्शनासी ।

वदोनी तयां धाडिलें कीं वनासी ॥

सवें ती सती घेतसे पुत्र दक्ष ।

तिसी तस्करीं ठेविलें पूर्ण लक्ष ॥४॥

हिरोनी सतीला पळाले समग्र ।

कशी दैवलीला नृपा हीच उग्र ॥

फिरे ग्राम-ग्रामीं क्षुधार्थी सती ती ।

करी याचना ती गृहांची गती ती ॥५॥

तया बालकाला सती देउळांत ।

तिथें ठेवुनी याचनेसाठिं जात ॥

तिथें एक आला मुनी देवभक्त ।

तया अंग वातें सतीपुत्र मुक्त ॥६॥

सती याचनेहून ती येत तीतें ।

दिसे पुत्रकाया क्षतांहीन ती तें ॥

तिसी बालकाची दिसे अंगकांती ।

दिसे गोमटी ती जणूं रत्‍न-दीप्ती ॥७॥

(पृथ्वी)

सुतास बघतां सती बहुत हर्षली भूपतें ।

न मंत्र-तपसा तशी बहुत औषधें होत तें ॥

असें सहज कार्य हें घडून चोज हे वाटले ।

असें नवल देखुनी सकल लोकही तोषले ॥८॥

म्हणून उभयांस ते वसन पात्रही भोजना ।

मुदीत करिती जुनीं नविन देउनी या मनां ॥

असा क्रमहि चालिला बहुत काळ अत्यादरें ।

गणेश-यजना करी विनत बाळ हा सादरें ॥९॥

(गीति)

दक्षें तप हें केलें, अंगुष्ठीं ठाकला जपे मंत्र ।

निष्ठापूर्वक मानस, करुनि जपे तो दिशाक्षरी मंत्र ॥१०॥

दक्षाचें तप पाहे, तोषित झाला गजानन प्रभु तो ।

दक्षापुढेंच ठेला, दोघांनीं पाहिला वर प्रभु तो ॥११॥

मणिमय किरीट शिरसा, शिव-सानेत्री मुखीं जसा करिसा ।

हरिसाभुजीच तैसा, पीतांबर-धारि दीप्तिनें रविसा ॥१२॥

पुढती गणेश देवें, विप्राचें घेतलें असे रुप ।

मागा द्वयास वदला, देतों वर मी तुम्हांस अनुरुप ॥१३॥

पाणी-द्वयास जोडुन, सार्थक केलें मदीय जन्माचें ।

विप्रोत्तमास ऐसें, दक्ष वदे भाव-पूर्णशा वाचें ॥१४॥

रुपें धारण केलीं, उद्धारासी त्वदीय तीं दोन ।

ऐसीं अनंत रुपें, घेतां ग्रंथांत वानिती कथन ॥१५॥

मानस-विकार साही, नियमन करिसी असेंहि ग्रंथांत ।

ऐशा स्तवास परसुनि, कर्ण-मनोहर तयांस वदतात ॥१६॥

(इंद्रवज्रा)

दक्षा तुला मी वर देत नाहीं ।

भक्तास माझ्या बहु राग येई ॥

कांती दिली जो तनु-वातभक्त ।

वरास देऊन करील मुक्त ॥१७॥

त्याचें असे मुद्गल नाम सांगे ।

पावे प्रभू गुप्त तशाच आंगें ॥

दक्षास दुःखें अति खेद झाला ।

धावा करी तो शरणार्थ त्याला ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP