TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
आरती संतमंडळी । हातीं घ...

आरती संतांची - आरती संतमंडळी । हातीं घ...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


आरती संतांची

आरती संतमंडळी ।

हातीं घेउनिं पुष्पांजुळि ओंवाळिन पंचप्राणें ।

त्याचें चरण न्याहाळी ॥ धृ. ॥

मच्छेंद्र गोरख ॥ गैनी निवृत्तीनाथ ।

ज्ञानदेव नामदेव ॥ खेचर विसोबा संत ।

सोपान चांगदेव ॥ गोरा जगमित्र भक्त ॥

कबीर पाठक नामा ॥ चोखा परसा भागवर ॥ आरती ॥ १ ॥

भानुदास कृष्णदास । वडवळसिद्ध नागनाथ ।

बहिरा पिसा मुकुंदराज । केशवस्वामी सूरदास ॥

रंगनाथ वामनस्वामी । जनजसवंत दास ॥ २ ॥

एकनाथ रामदास । यांचा हरिपदीं वास ॥

गुरुकृपा संपादिली । स्वामी जनार्दन त्यास ॥

मिराबाई मुक्ताबाई । बहिणाबाई उदास ।

सोनार नरहरी हा । माळी सांवता दास ॥ ३ ॥

रोहिदास संताबाई । जनी राजाई गोणाई ॥

जोगापरमानंदसाल्या । शेखमहंमद भाई ॥

निंबराज बोधराज । माथा तयांचे पायीं ॥

कूर्मदास शिवदास ॥ मलुकदास कर्माबाई ॥ ४ ॥

नारा म्हादा गोंदा विठा । प्रेमळ दामाजी ॥

तुकोबा गणेशनाथ । सेना नरसीमहत ॥

तुलसीदास कसांबया । पवार संतोबा भक्त ॥

महिपती तुम्हांपासी । चरणसेवा मागत ॥ ५ ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उगाणणें

  • स.क्रि. फोड करुन सांगणें ; स्पष्ट करणें ; उपदेश करणें . शास्त्रसिध्दांतु आघवा उगाणिला । - ज्ञा १६ . ४१ . [ सं . उदमन ] 
  • क्रि. 
  • हिशेब देणें ; झाडा देणें . परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं । - ज्ञा १८ . ७४३ . 
  • अर्पण करणें ; हवाली करणें . तीं गोपवत्सें उगाणलीं । गोपनाथासीं । - कथा ४ . ३ . २६५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.