मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १७ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १७ वा Translation - भाषांतर १२३पुरुपुत्र आयुलागीं सुत पांच । नहुष, क्षत्रवृद्ध, रजी, रंभ ॥१॥अनेना पांचवा क्षत्रवृद्धवंश । कथितों तो ऐक परीक्षिता ॥२॥सुहोत्र नामक पुत्र क्षत्रवृद्धा । पुत्र तीन तया काश्य, कुश ॥३॥गृत्समद, ऐसीं नामें तयांप्रति । गृत्समदाप्रति शुनक: पुत्र ॥४॥शौनक तयाचा ऋग्वेद्यांत श्रेष्ठ । सुहोत्राचा पुत्र काश्य नामें ॥५॥काशि तया पुत्र राष्ट्र, दीर्घतमा । पुढती ते जाणा यथाक्रम ॥६॥वासुदेव म्हणे पुढती धन्वंतरि । स्मरणेंचि हरी सकल रोग ॥७॥१२४केतुमान्, भीमरथ, दिवोदास । द्युमान् तयास पुत्र होई ॥१॥अलर्क तयाच्या पुत्रांमाजी श्रेष्ठ । सहासष्ट सहस्त्र अब्दें राजा ॥२॥संतति, सुनीथ, सुकेतन तेंवी । धर्मकेतु पाहीं सत्यकेतु ॥३॥धृष्टकेतु, सुकुमार, वीतिहोत्र । भर्ग तया पुत्र भार्गभूमि ॥४॥वासुदेव म्हणे रंभादिकवंश । निवेदिती शुक ऐका आतां ॥५॥१२५रभस, गंभीर पुत्र ते रंभातें । अक्रिय रभसातें पुत्र एक ॥१॥विप्रकुल त्याच्या होई स्त्रीपासूनि । अनेनासी गुणी पुत्र ‘शुद्ध’ ॥२॥शुचि, त्रिककुत्, शांतरय त्याचा । निरिच्छ तो होता आत्मज्ञानी ॥३॥रजीप्रति होते पंच शतपुत्र । रजीसी त्या स्वर्ग दिधला इंद्रें ॥४॥दैत्यभयें, मागे पुढती पुत्रांसी । देती न ते त्यासी, गुरु तदा - ॥५॥अभिचारयज्ञें भ्रष्टमती करी । इंद्र तैं संहारी तयांलागीं ॥६॥वासुदेव म्हणे विरुद्ध उपाय । यशस्वी ते काल फिरतां होती ॥७॥१२६क्षत्रवृद्धपौत्र कुशपुत्र ‘प्रति’ । संजय तयासी पुढती जय ॥१॥‘कृत’ ‘हर्यवन’ ‘सहदेव’ ‘हीन’ पुढती जयसेन, संकृति ते ॥२॥संकृतीसी जय नामें पुत्र एक । क्षत्रियवरिष्ठ जाण होता ॥३॥क्षत्रवृद्धादींचा विस्तार कथिला । ऐकावा वहिला नहुषवंश ॥४॥वासुदेव म्हणे वंश हे प्रसिद्ध । ऐकूनि निरत व्हावें धर्मी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP