मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय २ रा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय २ रा Translation - भाषांतर ६तपानें मनूसी होती दश पुत्र । अष्टम पृषध्र कथिलें पूर्वी ॥१॥गुरुगृहीं धेनुरक्षणाचें कार्य । निवेदिती आर्य गुरु तया ॥२॥खड्गधारी बाळ रजनीमाझारी । धेनूंतें सांभाळी दक्षतेनें ॥३॥पर्जन्य वर्षतां एकदां गोठयांत । प्रवेशूनि व्याघ्र धेनु हरी ॥४॥धेनुहंबरडा ऐकूनि धांवला । वार एक केला परम त्वेषें ॥५॥वासुदेव म्हणे अंधकार घोर । होई विपरीत तयावेळीं ॥६॥७व्याघ्राचा तैं कर्ण परी धेनुमान । तुटली, जाणे कोण दैवलीला ॥१॥व्याघ्रचि मरण पावला मानूनि । पृषध्र जाऊनि बसला स्वस्थ ॥२॥प्रात:काळीं वृत्त कळतां गुरुसी । शाप पृषध्रासी शूद्रत्वाचा ॥३॥शांतपणें शाप स्वीकारुनि बाळ । पाळी ब्रह्मचर्य अत्यानंदें ॥४॥सर्वसंगत्यागें ईश्वरस्मरण । करुनि, भ्रमण करी सदा ॥५॥वेडा बधिर वा मानिती त्या लोक । अंतीं वनव्यांत शिरला एका ॥६॥वासुदेव म्हणे परब्रह्मरुप । पावला तो दग्ध होऊनियां ॥७॥८विरक्तिचि होता कवि । राज्यइच्छा न त्या पाहीं ॥१॥ध्यानें जाहला पावन । वनीं पावे परब्रह्म ॥२॥करुषकाचे कारुष । उत्तरेसी करिती राज्य ॥३॥धार्ष्टपुत्र ते धृष्टाचे । विप्र होती स्वसामर्थ्यें ॥४॥नृगालागीं तो सुमति । पुत्र तया भूतज्योति ॥५॥वसु तया एक पुत्र । वसूलागीं तो प्रतीक ॥६॥ओघवान् ओघवती । कन्या पुत्र तया होती ॥७॥वासुदेव म्हणे पुत्र । ओघवाना नाम तेंच ॥८॥९मनुपुत्र नरिष्यंताप्रति पुत्र- । ‘चित्रसेन’ त्यास नाम होतें ॥१॥दक्ष, मीढ्वान, कूर्च, इंद्रसेन ऐसे । पुत्र-पौत्र साचे प्रपौत्रही ॥२॥वीतिहोत्र, सत्यश्रवा, ऊरुश्रवा । क्रम हा जाणावा तत्पुत्रांचा ॥३॥देवदत्त ‘अग्निवेश्य’ ते पुढती । गोत्र या नामेंचि पुढती एक ॥४॥वासुदेव म्हणे शुक परीक्षिता । निवेदिती आतां दिष्टवंश ॥५॥१०दिष्टासी नाभाग, तया भलदन । वत्सप्रीति जाण पुत्र तया ॥१॥प्रांशु, प्रमति ते खनित्र, पुढती । चाक्षुष, विविंशति, रंभ पुढें ॥२॥खनिनेत्र, करंधम, आवीक्षित् । मरुत्त विख्यात यज्ञकर्ता ॥३॥दम, राज्यवर्धन, सुधृति । नर, केवलासी बंधुमान् ॥४॥वेगवान्, बंधु ऐसी वंशवेल । तृणबिंदु पुत्र बंधुलागीं ॥५॥वासुदेव म्हणे आलंबुषा नामें । अप्सरा वरी प्रेमें ॥६॥११विशाल तैं शून्यबंधु, धूम्रकेतु । पुत्र वंशसेतु तियेठाईं ॥१॥इडविडा नामक कन्या विश्रव्यासी । दिधली, तियेसी धनद पुत्र ॥२॥विशालाचा वंश चालला पुढती । वैशाली नगरी रम्य ॥३॥पुत्र हेमचंद्र, धूम्राक्ष तयाचा । संयमन साचा धूम्राक्षासी ॥४॥कृशाश्व, देवज पुत्र त्याचे दोन । कृशाश्वासी जाण सोमदत्त ॥५॥यज्ञकर्ता तोही सुमति तयासी । जनमेजय त्यासी पुत्र एक ॥६॥वासुदेव म्हणे तृणबिंदुवंश । ऐसा कीर्तिमंत पुढती झाला ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP