मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ४ था स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ४ था सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय ४ था Translation - भाषांतर २०नभगपुत्र तो नाभाग । गुरुगृहीं विद्याभ्यास ॥१॥ब्रह्मचर्ये बहुत दिन । करी, बंधू तें पाहून ॥२॥मानिती हा न येईचि । म्हणूनि संपदा वांटिती ॥३॥म्हणती येतां नाभागातें । पिता देऊं तव वाटयातें ॥४॥ऐकूनि तो पित्यालागीं । सर्व वृत्तांत निवेदी ॥५॥वासुदेव म्हणे पिता । कथी काय तेंचि ऐका ॥६॥२१द्रव्यासम नसें भोग्य मी नाभागा । भेटें जा अंगिरा करिती यज्ञ ॥१॥षडहकर्मी त्यां सर्वदा संदेह । ‘इदमित्था सूक्त’ शिकवी तयां ॥२॥तेणें अवशिष्ट द्रव्य यज्ञांतील । देऊनि जातील स्वर्गांत ते ॥३॥ऐकूनि नाभाग जाई यज्ञामाजी । अंगिरा मुनींसी शिकवी सुखें ॥४॥तदा मुनि तया अवशिष्ट द्रव्य । अर्पूनियां स्वर्ग गांठिताती ॥५॥काळपुरुष तैं म्हणे नाभागासी । द्रव्याचा तुजसी अधिकार न ॥६॥वासुदेव म्हणे वृत्तांत नाभाग । कथितांचि रुद्र म्हणे ऐका ॥७॥२२जाईं रे, पित्यासी पुसेनियां येईं । कथितां तो देई द्रव्य माझें ॥१॥अवशिष्ट द्रव्य सकल रुद्राचें । यज्ञाचा हा असे नियम जाणें ॥२॥ऐकूनि नाभाग जाऊनियां पुशी । पिता म्हणे कथी सत्य रुद्र ॥३॥दक्षयज्ञामाजी झाला हा नियम । तेंवी सर्व धन रुद्राचेंचि ॥४॥ऐकूनि नाभाग शरण रुद्रासी । जाऊनि तयासी अर्पी धन ॥५॥पाहूनि सद्वृत्त संतोषला रुद्र । कथी वासुदेव पुढती ऐका ॥६॥२३नाभागा, पित्यानें तव केला योग्य न्याय ।पुत्रलोभेंही नाहींचि वरिला अन्याय ॥१॥ऐकूनि तो न्याय तूंही वागलासी तैसा ।पाहूनि हें वृत्त तव पावलों संतोषा ॥२॥यास्तव अर्पितों धन संतोषें हें तुज ।मज जाणसीच आतां होवो ब्रह्मबोध ॥३॥कथूनियां ऐसें रुद्र पावे अंतर्धान ।पुण्यप्रद पढेल जो नित्य हें आख्यान ॥४॥शिवप्रसादें त्या मंत्र तेंवी ब्रह्मबोध ।म्हणे वासुदेव होई जाणा हा सिद्धांत ॥५॥२४शुकमहामुनि कथिती नृपासी । अंबरीष जगीं भाग्यशाली ॥१॥अन्यथा न कदा होई विप्रशाप । परी अंबरीष अपवाद त्या ॥२॥परीक्षिती म्हणे ब्रह्माही समर्थ । नसे, अंबरीष तरला केंवी ॥३॥वृत्त तें सकळ मुने, मज सांगा । तुम्हांविण वक्ता कोण जगीं ॥४॥वासुदेव म्हणे रायाप्रति शुक । निवेदिती तेंच कथितों ऐका ॥५॥२५शुकमहामुनि कथिती नृपासे । अंबरीष जगीं भाग्यशाली ॥१॥दुर्लभ जें नरा ऐश्वर्य तें त्यासी । भासे तो भ्रमचि परी तया ॥२॥अंकित तयाच्या सप्तद्वीपा पृथ्वी । मृत्तिकाचि त्यासी परी धन ॥३॥ईश, ईशभक्तांवरी त्याचें प्रेम । गाई त्याचे गुण वासुदेव ॥४॥२६सर्वकाल ज्याचें मन ध्यानरत । श्रीकृष्णचरित्र चिंतीतसे ॥१॥ईशगुणगानीं दंग ज्याची वाणी । हस्त, सेवाकर्मी सदा रत ॥२॥निवृत्तिप्रधान कथा रुचे कर्णां । आवडे लोचना कृष्णमूर्ति ॥३॥ईश्वरभक्तांसी आलिंगी शरीर । निर्माल्य सुगंध घ्राणेंद्रिया ॥४॥प्रसादभक्षणीं लांचावे रसना । पाद तीर्थाटना सिद्ध सदा ॥५॥वासुदेव म्हणे भक्त - भगवंत - । वंदना, मस्तक नम्र त्याचें ॥६॥२७सदा परमेश्वरार्पण । बुद्धीनेंचि करी कर्म ॥१॥सर्वांठायीं भरला ईश । हेचि भावना जयास ॥२॥विप्रआज्ञा ते ईशाची । मानूनियां राज्य भोगी ॥३॥वसिष्ठादि मुनिद्वारा । विविध यज्ञांत रंगला ॥४॥देव मानव समान । यज्ञामाजी त्याच्या जाण ॥५॥देवांसम मानवांचें । यज्ञांत त्या न लवे पातें ॥६॥वासुदेव म्हणे ऐसे । प्रेक्षणीय यज्ञ त्याचे ॥७॥२८आश्रितही त्याए मुंकुंदाचे भक्त । स्वर्ग तया तुच्छ भक्तीहूनि ॥१॥अंतीं सर्वसंगत्यागयुक्त भक्ति । करुनि ईशासी प्रिय राव ॥२॥दुष्टनिवारक भक्तसंरक्षक । अर्पी प्रभु चक्र तयालागीं ॥३॥ईश्वरतोषार्थ साधनद्वादशी । करी राव चित्तीं धरुनि भाव ॥४॥कांतेसवें एक अब्द केलें व्रत । श्रवणीय वृत्त कथितों ऐकें ॥५॥वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । वृत्तांत नृपातें कथिती शुक ॥६॥२९व्रतसमाप्तीसी कार्तिक दशमी । द्वादशीच्या दिनीं एकभुक्त ॥१॥एकादशीप्रति करी उपोषण । यमुनेचें स्नान मधुवनीं ॥२॥अभिषेक पूजा करी श्रीहरीची । विरागी भक्तांसी तेंवी पूजी ॥३॥ज्ञात्या विप्रांप्रति षड्रस भोजन । तेंवी इच्छेसम दक्षिणाही ॥४॥सुस्वभावी अल्पवयाच्या दुधाळ । अर्पी त्यां नृपाळ धेनु बहु ॥५॥सालंकृत साठ कोटि धेनु ऐशा । झुलींसवें त्यांच्या सदनीं धाडी ॥६॥वासुदेव म्हणे सांगता व्रताची । करावया ऐसी शक्ति तया ॥७॥३०विप्राज्ञा घेऊनि पारणासी सिद्ध । पातले दुर्वास तोंचि तेथें ॥१॥पाहूनि तयांसी अत्यादरें पूजी । भोजनार्थ प्रार्थी विनयें तयां ॥२॥करुनि तें मान्य कालिंदी तटाकी । आन्हिकासी जाती मुनिश्रेष्ठ ॥३॥स्नानसंध्यादिक चाललें मुनींचें । चिंता नृपाळातीं वाटे बहु ॥४॥घटिका एकचि राहिली द्वादशी । व्रतभंगभीति मनीं वाटे ॥५॥वासुदेव म्हणे शास्त्रार्थ विप्रांसी । अत्यादरें पुशी नृपश्रेष्ठ ॥६॥३१आमंत्रित विप्रा त्यजूनि भोजन । करितां अवमान होई त्याचा ॥१॥व्रतपूर्ति तेंवी सन्मान विप्राचा । प्राशितां उदका होई वाटे ॥२॥विप्रही तयासी निवेदिती तेंचि । पारणा जलेंचि करी राव ॥३॥इतुक्यांत येती दुर्वास त्या स्थानीं । सकळ जाणूनि क्रुद्ध होती ॥४॥आधींच कोपिष्ट त्यांत क्षुधाकुल । कांपे थरथर अंग त्यांएं ॥५॥वासुदेव म्हणे क्रोधाकुल मुनि । अपमान जाणूनि उठले वेगें ॥६॥३२म्हणती मदांध जाहला हा राजा । करी अतिथीचा अपमान ॥१॥पाचारुनि मज वागला हा ऐसा । प्रभाव तपाचा पाहो आतां ॥२॥बोलूनियां जटा उपटिली एक । निर्मी भयानक कृत्या तेणें ॥३॥धांवली ती क्रोधें राजावरी क्रौर्ये । करीं तळपलें खड्ग तिच्या ॥४॥महाभयंकर पाहूनिही कृत्या । लेश न भयाचा नृपाळासी ॥५॥वासुदेव म्हणे ईश विश्वाधार । जयासी आधार निर्भय तो ॥६॥३३संकटापूर्वीचि योजितो उपाय । देव भक्तांस्तव कनवाळु ॥१॥आधींचि प्रेरिलें होतें सुदर्शन । कृत्या बलहीन झाली तेणें ॥२॥क्रुद्ध सर्प जेंवी अंगावरी यावा । तोंचि गवसावा वणव्यामाजी ॥३॥तैसीच ते कृत्या होई भस्मसात । मुनीमागें चक्र धांव घेई ॥४॥दशदिशा धांव घेती तदा मुनि । त्रैलोक्यीं त्यां कोणी संरक्षीना ॥५॥मुनि ब्रह्मदेवा विनवितां तोही । सामर्थ्य तें नाहीं मजसी म्हणे ॥६॥वासुदेव म्हणे दुर्वास शिवासी । विनवितां त्याची वाणी ऐका ॥७॥३४दुर्वासा, अनंतकोटि ब्रह्मांडांचा । चालक जो त्याचा प्रभाव हा ॥१॥मोठमोठे आम्हीं देव महादेव । करणार काय विष्णूपुढें ॥२॥यास्तव शरण जाईं तूं त्यासीच । वैकुंठीं दुर्वास तदा जाती ॥३॥अपराध केला म्हणती भक्तीचा । दया करीं आतां तूंचि देवा ॥४॥भगवंता, तव महिमा अगाध । कांहींचि अशक्य नसे तुज ॥५॥वासुदेव म्हणे भक्तपराधीन । बोले भगवान काय ऐका ॥६॥३५विप्रा, तुझ्या रक्षणार्थ । जाण नसें मी स्वतंत्र ॥१॥मजसाठीं सर्व त्याग । करिती तयांचा मी दास ॥२॥पतिव्रतेसी जैं पति । रक्षी, तेंवी मी भक्तांसी ॥३॥मुक्ति घेऊनियां चारी । उभा तयाच्या मी द्वारीं ॥४॥परी मजवरी प्रेम । त्याचें, मोक्षही त्यजून ॥५॥इच्छिती जे माझी सेवा । सांभाळणें भाग तयां ॥६॥वासुदेव म्हणे देव । सेवकही भक्तांस्तव ॥७॥३६अभिमानत्याग करिती तयांचा । अभिमान साचा धरणें लागे ॥१॥भक्तांसी संतोष तेंचि माझें सुख । मी त्यांच्या हृदयांत, तेही माझ्या ॥२॥दुर्वासा, तूं जरी इच्छिसी कल्याण । छळासी कारण तेथेंचि जा ॥३॥प्रभाव आपुला दावी जो सज्जना । तयाचीच दैना होई जगीं ॥४॥तपश्चर्या विद्या मोक्षद विप्रासी । योजितां कुमार्गी महाभय ॥५॥अंबरीषइच्छा नसतांही मज । प्रतिकार तुज करणें प्राप्त ॥६॥भक्तचि सामर्थ्य आंवरिती माझें । यास्तव भक्तांतें शरण जाईम ॥७॥वासुदेव म्हणे बोले भगवान । नित्य पराधीन भक्तांच्या मी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP