मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ११ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ११ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय ११ वा Translation - भाषांतर ८२व्यासपुत्र महामुनि । म्हणती नृपा, घे ऐकूनि ॥१॥वसिष्ठांचा शिष्य राम । करी बहुविध यज्ञ ॥२॥सर्व दिशांचेंही राज्य । राम अर्पी ऋत्विजांस ॥३॥अलंकार वस्त्र पात्र । एक राम जानकीस ॥४॥पाहूनियां तें औदार्य । रक्षीं तूंचि म्हणती आर्य ॥५॥रामा, अप्राप्य आम्हांसी । तुझ्या सान्निध्यें नसेचि ॥६॥तुझ्या कृपेनें हें ज्ञान । आतां कांहीं नसे न्यून ॥७॥वासुदेव म्हणे मुनि । धन्य श्रीरामा वंदूनि ॥८॥८३पुढती एकदां गुप्त वेषें राम । हिंडतां दारुण समय येई ॥१॥जारिणीसी एका पति कथी क्रोधें । आश्रय न तूतें सदनीं माझ्या ॥२॥रामें स्त्रीलंपटें जानकीस्वीकार । केला तो प्रकार नसे एथें ॥३॥ऐकूनि तें राम होई मनीं खिन्न । सीतेसी नेऊन त्यागी वनीं ॥४॥दिवस तियेसी गेले होते कांही । वाल्मिकींच्या जाई आश्रमांत ॥५॥कुश-लव नामें पुत्र तेज:पुंज । जाहले तियेस तयास्थानीं ॥६॥वासुदेव म्हणे सीता भूविवरी । अंती प्रवेशली रामनामें ॥७॥८४अंगद तैं चित्रकेतु नामें पुत्र । होती सौमित्रांस भाग्यवंत ॥१॥तक्ष, पुष्कल ते भरताचे दोन । सुबाहु, श्रुतसेन शत्रुघ्नाचे ॥२॥सीता भूप्रवेशवृत्तांत रामास । कळतां मनास खेद त्याच्या ॥३॥अंतीं बहु वर्षे करी अग्निसेवा । अनवाणी गेला वनामाजी ॥४॥चरणकमळें भक्तहृदयांत । स्थापूनि वैकुंठ गांठी राम ॥५॥वासुदेव म्हणे अगाध ते लीला । करुनियां गेला रामचंद्र ॥६॥८५निवेदिती शुक सेतुबंधनादि । लौकिकार्थ होती सकल क्रिया ॥१॥आवश्यक रामा नव्हतें तें कांही । वानरांचें घेई ईश साह्य ॥२॥गुणगान त्याचें तारील विश्वासी । धन्य सेवा त्याची घडली जयां ॥३॥दर्शनही त्याचें घडलें जयांसी । धन्य ते या लोकीं जन्मूनियां ॥४॥अनुयायित्व ज्यां लाभलें तयाचें । पादस्पर्श ज्यातें घडला त्याचा ॥५॥पावले ते मुक्ति सर्व भाग्यवंत । श्रवणें या शांत होती जन ॥६॥वासुदेव म्हणे अंतीं मोक्षलाभ । ऐकावें चरित्र यास्तव हें ॥७॥८६परीक्षितप्रश्नें रामाचें वर्तन । करिती कथन मुनि ऐका ॥१॥बांधव तयाचे करिती दिग्विजया । वधूनि गंधर्वां, हरिती धन ॥२॥लवणासुरातें वधूनि शत्रूघ्न । करी मधुवन मथुरायुक्त ॥३॥लवण तो होता मधुदैत्यपुत्र । वसलें नगर ‘मथुरा’ तेथें ॥४॥भक्तदर्शनार्थ अयोध्येंत राम । हिंडे तदा जन संतोषती ॥५॥सुगंधि जलाचे घालूनियां सडे । केळी-पोफळीतें उभारिती ॥६॥वासुदेव म्हणे गुढया तोरणांनीं । अभिव्यक्त जनीं करिती भाव ॥७॥८७रामावरी वृष्टि करिती पुष्पांची । अंतरांत भक्ती ऐसी बहु ॥१॥श्रीराममंदिर नवरत्नांकित । अमूल्य अनंत वस्तु तेथें ॥२॥उंबरठे द्वारीं होते प्रवालाचे । स्तंभ वैडूर्याचे हरित भूमि ॥३॥स्फटिकाच्या भित्ति मौक्तिकमालिका । शोभती पताका दिव्य बहु ॥४॥पुष्पमाला तेंवी सुगंधी पदार्थ । सिंचियेले तेथ सुटला गंध ॥५॥उजळले दीप धूपाचा सुगंध । तेथें रामचंद्र सीतेसवें - ॥६॥आनंदें राहूनि वर्णाश्रमधर्मे । राज्य उत्साहानें करीतसे ॥७॥वासुदेव म्हणे श्रीराममंदिर । सुखाचें आगर भक्तजनां ॥८॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP