मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १ ला स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १ ला सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १ ला Translation - भाषांतर १परीक्षिती म्हणे द्रविड देशींचा । मनु होई राजा सत्यव्रत ॥१॥कथिलेंसी त्याचा निवेदावा वंश । निवेदा चरित्र सकल तेंचि ॥२॥शुकमहामुनि बोलले रायासी । कथा संक्षेपेंचि कथणें शक्य ॥३॥कमलोद्भवाचा पुत्र जो मरीचि । कश्यप तयासी पुत्र होई ॥४॥अदितीपासूनि तया विवस्वान् । ‘संज्ञा’ ऐसें नाम तत्कांतेसी ॥५॥‘श्राद्धदेव’ मनु जाहला तियेसी । वासुदेव त्यासी नमन करी ॥६॥२श्राद्धदेवाची ते राजा । ‘श्रद्धा’ गुणवती कांता ॥१॥तिज दश पुत्र होती । नामें ऐकावीं तयांचीं ॥२॥श्रेष्ठ इक्ष्वाकु, तो नृग । पुढती शर्याति तैं दिष्ट ॥३॥धृष्ट तेंवी करुषक । नरिण्यंतही पृषध्र ॥४॥नभग, कवि ऐसे दश । नामें गातो वासुदेव ॥५॥३मनूप्रति पूर्वी संतती न होतां । प्रार्थी तो वसिष्ठा अत्यादरें ॥१॥मित्रावरुणांची इष्टि ते करिती । श्राद्धदेवपत्नी कन्या इच्छी ॥२॥होत्यालागीं श्रद्धा विनवी त्यापरी । कन्या ‘इला’ झाली स्मरणें तया ॥३॥वसिष्ठासी मनु म्हणे हें विपरीत । झालें केंवी मज निवेदावें ॥४॥चिंतूनि वसिष्ठ बोलले तयासी । कारण याप्रति ‘होता’ असे ॥५॥असो, आतां हेचि पुत्रत्व पावेल । वासुदेव बोल म्हणे सत्य ॥६॥४आदिपुरुषासी प्रार्थितां वसिष्ठ । सुद्युम्न तो पुत्र होई इला ॥१॥एकदां सुद्युम्न मृगयेसी जातां । मेरुपर्वताचा प्रांत गांठी ॥२॥क्रीडास्थान शिव-पार्वतीचें तेंचि । येई सुद्युम्नासी स्त्रीत्व तेथें ॥३॥सेवक अश्वही स्त्रीरुप पावले । उद्विग्न जाहले सकल तदा ॥४॥क्रीडाकाळीं येती एकदां त्या स्थानीं । दर्शनार्थ मुनि शंकराच्या ॥५॥पाहूनि तयांसी लाजली भवानी । गेले ते निघूनि मुनि तदा ॥६॥तदाप्रभृति हा शाप शंकराचा । परी न ठाऊका सुद्युम्ना तो ॥७॥वासुदेव म्हणे इला ते इलाचि । जाहली प्रभूची काय लीला ॥८॥५परिवारासवें इला बुधाश्रमीं । येतांचि पाहूनि मोह बुधा ॥१॥इलाही बुधासी पाहूनि मोहित । होई तयां पुत्र पुरुरवा ॥२॥पुढती सुद्युम्न प्रार्थी वसिष्ठांसी । वृत्तांत निवेदी सकळ तयां ॥३॥सदय वसिष्ठ प्रार्थिती शिवातें । शिव तैं इलेतें देती वर ॥४॥नर एक मास, एक मास नारी । ऐसी स्थिती झाली सुद्युम्नाची ॥५॥उत्कल, गयतैं विमल त्या पुत्र । करीतसे राज्य ऐसें इला ॥६॥वासुदेव म्हणे पुरुरवा अंतीं । राजा, वनामाजी जातां इला ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP