मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १६ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १६ वा Translation - भाषांतर ११६पितृवचन मानूनि । रमला राम तीर्थाटनीं ॥१॥ऐसें लोटे एक वर्ष । तदा येई आश्रमांत ॥२॥पुढती एके दिनीं माता । जाई गंगेसी उदका ॥३॥गंधर्व तैं चित्ररथ । जलक्रीडा करी तेथ ॥४॥स्त्रियांसवें पाही क्रीडा । रेणुकेंते कामबाधा ॥५॥होमसमय विसरुनि । रमली क्षणभरी त्या स्थानीं ॥६॥वासुदेव म्हणे माता । पुढती नेसते उदका ॥७॥११७मुनींच्या सन्निध ठेऊनि उदक । करुनियां स्मित कर जोडी ॥१॥अंतरींचा दोष जाणिला मुनींनीं । पुत्रांतें वाहूनि वदले क्रोधें ॥२॥तत्काल मातेसी वधावें म्हणती । परी न धजती बाहू त्यांचे ॥३॥पाचारुनि तदा परशुरामातें । वधीं सकलांतें म्हणती मुनी ॥४॥पित्याचें सामर्थ्य जाणूनियां राम । सकलां वधून चरणां वंदी ॥५॥संतोषूनि मुनि म्हणती वर माग । सकलां जिवंत करा म्हणे ॥६॥तेंवी हें स्मरण न राहो कोणासी । तयास्तु बोलती तदा मुनि ॥७॥वासुदेव म्हणे तदा तीं तत्काळ । जाहलीं सकळ पूर्वीसम ॥८॥११८सहस्त्रार्जुनाचे पुत्र पितृवधें । बहु दु:खी होते परि न बळ ॥१॥रामपराभव होता त्या अशक्य । अनुकूल एक वेळ तयां ॥२॥बंधूंस घेऊनि राम जाई वनीं । पाहूनि आश्रमीं दुष्ट येती ॥३॥समाधिनिमग्न जमदग्नि तदा । पाहूनि तद्वधा प्रवर्तले ॥४॥व्याकुळ रेणुका पाहूनिही शिर - । घेऊनियां क्रूर निघूनि गेले ॥५॥धांव धांव रामा, कोठें रे, तूं जासी । ऐसी रेणुकेची आर्त हांक - ॥६॥वासुदेव म्हणे कानीं येतां राम । धांवूनि आश्रम जवळी करी ॥७॥११९भयंकर दृश्य पाहूनि आश्रमीं । परशु खेंचूनि धांव घेई ॥१॥माहिष्मतीवरी चाल करी वेगें । कर्म दुर्जनांचें भोंवले त्यां ॥२॥जमदग्निशिर घेऊनि जों येती । गर्जना रामाची तोंचि आली ॥३॥दशसहस्त्र त्या भ्याडांचीं मस्तकें । छेदूनियां तेथें रचिला ढीग ॥४॥रुधिरें त्या पूर येई नर्मदेसी । ईशेच्छाचि होती ऐसी तदा ॥५॥उन्मत्त क्षत्रियसंहार जाहला । एकवीस वेळां रामहस्तें ॥६॥स्यमंतपंचकीं रुधिरें तयांच्या । भरियेलें डोहां पंच सख्य ॥७॥वासुदेव म्हणे भूमिभार ऐसा । हरुनियां भक्तां रक्षी देव ॥८॥१२०निवेदिती शुक पितृशिर राम । आणूनियां यज्ञ करिता झाला ॥१॥धडासी तें शिर लावूनियां यज्ञें । परितुष्ट केलें ईश्वरासी ॥२॥ऋत्विजांसी सर्व भूमि देई दान । कश्यपप्रधान सकल मुनि ॥३॥सरस्वतीतीरीं अवभृथस्नान । करितांचि भस्म सकळ पापें ॥४॥जमदग्नितेंही पूर्वदेहप्राप्ति । सप्तऋषींमाजी स्थान लाभे ॥५॥रामही सावर्णि मन्वंतरीं सप्त - । ऋषींमाजी एक पुढती ऋषि ॥६॥सर्वसंगत्यागें महेंद्रपर्वतीं । राहिला अद्यापि असे तेथें ॥७॥वासुदेव म्हणे परशुरामवृत्त । ऐसें, रोमांचित करी देह ॥८॥१२१गाधिसुत विश्वामित्रवृत्त आतां । शुकोक्त तें ऐका पुढती हर्षे ॥१॥तप:सामर्थ्ये तो जाहला ब्रह्मर्षि । एकाधिक त्यासी पुत्र शत ॥२॥शुन:शेपही तो अजीगर्त सुत । मानीयेला पुत्र विश्वामित्रें ॥३॥द्रव्याशेनें तो बांधिला स्तंभासी । स्तवूनि देवांसी मुक्त झाला ॥४॥रक्षिलें देवांनीं तेणें देवरात । नाम कथी त्यास वासुदेव ॥५॥१२२विश्वामित्र तया नेऊनि सदनीं । स्वपुत्रांलागूनि वदला ऐका ॥१॥ज्येष्ठबंधु तुम्हीं मानावें याप्रति । रुचे न हे उक्ति सकलां परी ॥२॥न रुचे तयांसी शापी विश्वामित्र । मूढहो, व्हा म्लेच्छ अधार्मिक ॥३॥मधुच्छंदा पुत्र मानूनि ते आज्ञा । बंधु ऐसी संज्ञा देई तया ॥४॥पाहूनियां मुनि तुष्ट होई मनीं । वंश वाढो जनीं तुमचा म्हणे ॥५॥आज्ञाधारकांचें यापरी कल्याण । जाहलें जे अन्य पतन तयां ॥६॥वासुदेव म्हणे विश्वामित्रकथा । ऐकूनियां चित्ता तोष वाटे ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP