मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ७ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय ७ वा Translation - भाषांतर परीक्षिता, मांधात्यासी अंबरीष । तया यौवनाश्व पुत्र होई ॥१॥पुरुकुत्साप्रति ‘नर्मदा’ नामक । अर्पिताती नाग स्वभगिनी ॥२॥नागांस्तव तेणें वधिले गंधर्व । नसे सर्पभय स्मरणें त्याच्या ॥३॥त्रसद्दस्यु तया, तया अनरण्य । हर्यश्व, आरुण पुढती क्रमें ॥४॥तया त्रिबंधन, सत्यव्रत तया । नांव त्रिशंकु त्या जनीं रुढ ॥५॥वासुदेव म्हणे त्रिशंकूचें वृत्त । ऐकूनि चकित व्हाल आतां ॥६॥५४विवाहसमयीं विप्रकन्या एक । त्रिशंकु उन्मत्त हरुनि नेई ॥१॥‘चांडाळ हो’ ऐसें विप्र तया शापी । विश्वामित्र त्यासी चढवी स्वर्गी ॥२॥ढकलूनि देती परी तया देव । ऊर्ध्व चरण शिर खालीं होई ॥३॥तैसाचि त्या ठाईं तया विश्वामित्र । रक्षी, अद्यापि तो दिसतो नभीं ॥४॥पुत्र त्याचा हरिश्चंद्र नामें ख्यात । विश्वामित्रें राज्य हरिलें त्याचें ॥५॥वासुदेव म्हणे यज्ञदक्षिणार्थ । हरुनियां राज्य छळिलें नृपा ॥६॥५५ऐकूनि तें कुलगुरु नृपाळाचे । शापिती मुनींतें पक्षी होई ॥१॥वसिष्ठांही परी शापी विश्वामित्र । मुने होईं बक वदला क्रोधें ॥२॥ऐसे होऊनि ते पक्षी बहु काल । होती परस्पर युद्धमग्न ॥३॥संतानार्थ राव प्रार्थी वरुणातें । पुत्र दे मी त्यातें हविन यज्ञीं ॥४॥‘रोहित’ नामें त्या तदा पुत्र होई । यज्ञरत होईं वरूण म्हणे ॥५॥वासुदेव म्हणे हरिश्चंद्र तदा । म्हणे शुद्ध होतां हवन करुं ॥६॥५६दश दिन ऐसे जातां म्हणे राव । होईल पवित्र दंत येतां ॥१॥पुढती ते येतां म्हणे राव याचे । पडतां दुग्धाए दंत शुद्धि ॥२॥पडतां ते दंत, म्हणे नूतनाची । प्राप्ति होतां शुद्धि पुत्राप्रति ॥३॥नूतनही येतां म्हणे हा क्षत्रिय । लेईल कवच तदा शुद्धि ॥४॥ऐसी टाळाटाळ करी हरिश्चंद्र । वृत्त रोहितास कळलें तदा ॥५॥घेऊनि धनुष्य गेला तो काननीं । क्रुद्ध तें पाहूनि वरूणदेव ॥६॥अंतीं हरिश्चंद्रा होई जलोदर । म्हणे वासुदेव पुढती ऐका ॥७॥५७परिसूनि वृत्त वनीं तें रोहित । यावयासी सिद्ध होई ग्रामीं ॥१॥पाहूनि तें इंद्र निवारी तयासी । पांच वेळ ऐसी घडली कृति ॥२॥अंतीं अजीगर्तपुत्र शुन:शेष । घेऊनियां क्रीतपुत्र येई ॥३॥पाहूनि तयासी तोषला वरुण । रोगनिवारण केलें क्षणीं ॥४॥यज्ञांत त्या इंद्रें सुवर्णाचा रथ । अर्पिला रायास अत्यानंदें ॥५॥वासुदेव म्हणे यज्ञाचें त्या वृत्त । कथितील शुक समयीं पुढें ॥६॥५८सत्यव्रत त्याचें पाहूनि संतुष्ट । होई, विश्वामित्र ज्ञान अर्पी ॥१॥पुढती वैभव भोगिलें नृपानें । आत्मानात्मज्ञानें कृतार्थ तो ॥२॥स्वस्वरुपीं स्थिर जाहला ध्यानानें । पृथिव्यादि क्रमें लीन होई ॥३॥अहंममतत्वीं पाही ज्ञानकला । ब्रह्मरुपीं झाला स्थिर ऐसा ॥४॥वासुदेव म्हणे जाळूनि अज्ञान । ज्ञानामाजी लीन होई ज्ञाता ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP