स्कंध ९ वा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३७
ईश्वरवचनें अंबरीषाप्रति । येऊनियां प्रार्थी विनयें मुनि ॥१॥
आपणाकारणें त्रेधा ते विप्राची । पाहूनि नृपासी लाज वाटे ॥२॥
असहाय स्थिति पाहूनि मुनींची । अंबरीष प्रार्थी सुदर्शना ॥३॥
सुदर्शना, घेईं नमस्कार माझा । सर्व सामर्थ्याचा ठेवा तूंचि ॥४॥
दुष्टविनाशार्थ ठाकसी तूं रणीं । शांतिदाता जनीं तूंचि एक ॥५॥
दानधर्म ईशभाव जरी मज । संरक्षीं विप्रास तरी चक्रा ॥६॥
वासुदेव म्हणे चक्र तदा शांत । पाहुनि दुर्वास तोष पावे ॥७॥

३८
मुनि म्हणे राया, भक्तहृदयाचा । अनुभव साचा आजि मज ॥१॥
जोडिला जयांनीं जगन्नाथ त्यांसी । असाध्य कांहींचि नसे लोकीं ॥२॥
त्रिविध ताप त्यां करितील काय । सर्वदा निर्भय भक्तजन ॥३॥
उदारा, यद्यपि केला अपराध । तथापि तूं मज संरक्षिलें ॥४॥
अपकार्‍यातेंही उपकारकर्ते । धन्य जगीं ऐसे संतश्रेष्ठ ॥५॥
वासुदेव म्हणे सर्वांभूतीं सम । तेंवी क्षमावान तेचि संत ॥६॥

३९
शुकमहामुनि बोलले गृहासी । नव्हतें कांहींचि ज्ञात नृपा ॥१॥
प्रतिक्षा मुनींची पहात बैसला । अब्द एक गेला काल ऐसा ॥२॥
अतिथि भोजनावीण तया अन्न । नव्हतेंचि जाण वर्ष एक ॥३॥
मुनींचा हा ताप पाहूनि त्या दु:ख । भोजन षड्रस देई तयां ॥४॥
अनुज्ञेनें करी पुढती भोजन । करीत वर्णन मुनि गेले ॥५॥
श्रवण - पठनें याच्या ईश तोष । पुत्र नृपाळातें होती तीन ॥६॥
अर्पूनि त्यां राज्य पावला तो मुक्ति । वासुदेव वंदी नृपाळा त्या ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP