मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय ८ वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय ८ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय ८ वा Translation - भाषांतर ५९रोहिता हरित, हरितासी चंप । सुदेव, विजय पुढती क्रमें ॥१॥भरुक, वृक तैं बाहुक पुढती । तयाचें हरिती राज्य शत्रु ॥२॥वनामाजी देह पडतां तयाचा । राणी सती जातां उदरीं गर्भ ॥३॥पाहूनि तियेसी निवारिती मुनि । सपत्नीच्या मनीं उपजे द्वेष ॥४॥चारिलें तैं विष तिजप्रति परी । ईश जया तारी भय न तया ॥५॥विषासवें जन्म पावला म्हणूनि । ‘सगर’ चि जनीं संज्ञा लाभे ॥६॥वासुदेव म्हणे सार्वभौम नृप । शासन दुष्टांस करिता झाला ॥७॥६०हैहय, बर्बर, यवन, शकादि । मातले तयांसी सगर दापी ॥१॥वध न करितां शिक्षा करी तयां । मुंडन कित्येकां योजीतसे ॥२॥अर्ध मुंडनाची शिक्षा कोणाप्रति । मोकळे कोणासी केश प्राप्त ॥३॥नग्न राहूनियां कफनीचि ल्यावी । कोणी स्वीकारावी कौपीनचि ॥४॥वासुदेव म्हणे विविध यापरी । राव शिक्षा करी दुर्जनांसी ॥५॥६१सुमति, केशिनी सगराच्या स्त्रिया । और्वऋषि तया गुरु होता ॥१॥बहु अश्वमेध केले नृपाळानें । एकदां इंद्रानें हरिला अश्व ॥२॥सुमतीचे पुत्र बहुत उन्मत्त । पित्राज्ञेनें देश खणिला त्यांनीं ॥३॥शोधित ते अश्व गेले ईशान्येसी । कपिल तयासी बसले जेथें ॥४॥समीप तयांच्या पाहूनियां अश्व । सांपडला चोर गर्जले तैं ॥५॥सोंग करी पहा, पिटा या दुष्टासी । आतां डोळे झांकी पहा केंवी ॥६॥वासुदेव म्हणे त्यागूनि विचार । निर्णय तो घोर अपराध ॥७॥६२साठ सहस्त्र ते पुत्र अविवेकी । सशस्त्र धांवती मुनीवरी ॥१॥इंद्रमायेनें ते जाहले मोहित । स्वकर्मेचि मृतप्राय दुष्ट ॥२॥कोलाहल त्यांचा ऐकूनियां मुनि । नेत्र उघडूनि अवलोकिती ॥३॥भस्म सकलांचें जाहले त्या क्षणीं । सर्वसाक्षी अग्नि क्रोध पावे ॥४॥क्रोध कपिलांसी नव्हता लवही । क्रोध न कदाही स्पर्शे ज्ञात्या ॥५॥वासुदेव म्हणे सांख्यशास्त्रनौका । निर्मिली त्या श्रेष्ठा नमन भावें ॥६॥६३असमंजा पुत्र होता केशिनीतें । स्मरण गतजन्मीचें तयालागीं ॥१॥कुसंग कदाही न घडो यास्तव । स्वीकारी मूढत्व जाणूनियां ॥२॥एकदां सरयूतीरींच्या बालकां । बुडवी उदकामाजे स्वयें ॥३॥राज्याबाहेरी त्या देतां हांकलूनि । बालकें देऊनि पुढती गेला ॥४॥आश्चर्य सकलां वाटलें त्यावेळीं । नृपालागीं होई पश्चात्ताप ॥५॥वासुदेव म्हणे अंशुमान त्याचा । दक्ष सगराच्या सेवेमाजी ॥६॥६४अश्वशोधार्थ तो राजाज्ञेनें जाई । भस्मराशी पाही कपिलाश्रमीं ॥१॥सन्निधचि अश्व दिसला तयातें । वंदी कपिलांतें अंशुमान ॥२॥म्हणे मुने, तूंचि परब्रह्मस्वरुप । अज्ञानें त्वद्रूप न कळे आम्हां ॥३॥शुद्ध सत्वरुपा, त्रिगुणोद्भवांसी । बोध कैशारीती व्हावा तव ॥४॥भेद-मोहत्यागें सनत्कुमारादि । विवेकें जाणिती रुप तुझें ॥५॥भाग्येंचि हें आम्हां जाहलें दर्शन । करितों वंदन भावें तुज ॥६॥वासुदेव म्हणे स्तवन यापरी । अंशुमान करी श्रेष्ठर्षीचें ॥७॥६५कृपावलोकनें बोलले तैं मुनि । जाईं हा घेऊनि अश्व यज्ञी ॥१॥गंगोदकावीण पितरउद्धार । नसेचि साचार ध्यानीं असो ॥२॥प्रदक्षिणा तदा घाली अंशुमान । नगरीं घेऊन अश्व जाई ॥३॥पूर्ण करी यज्ञ हर्षे तैं सगर । प्रेमें अर्पी राज्य अंशुमाना ॥४॥ज्ञानमार्गे जाई उद्धरुनि राव । गातो वासुदेव वृत्त प्रेमें ॥५॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP