मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ९ वा| अध्याय १० वा स्कंध ९ वा नवम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ९ वा - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ९ वा - अध्याय १० वा Translation - भाषांतर ७७राया, खट्वांगासी दीर्घबाहु पुत्र । रघु तो विख्यात पुत्र त्याचा ॥१॥रघूचा तो अज, दशरथ त्याचा । श्रीविष्णु जयाचा पुत्र होई ॥२॥राम-लक्ष्मणही भरत शत्रुघ्न । अंशें नारायण पुत्र त्याचे ॥३॥परब्रह्म रामा वंदूनि तयाचें । चरित्र संक्षेपें कथिती मुनि ॥४॥कल्याण आमुचें करो तो श्रीराम । पित्यास्तव वन स्वीकारी जो ॥५॥वासुदेव म्हणे चरण कोमल । सीतचेही कर असह्य त्या ॥६॥७८काननीं सौमित्र तेंवी हनुमंत । सेविती रामास अत्यादरें ॥१॥कौशिकमखांत बालपणीं तेणें । गतप्राण केले मारीचादि ॥२॥जनकमंदिरीं स्वयंवरास्तव । भंगियेलें शिवचाप शौर्ये ॥३॥जनकनंदीनीरुपी चित्शक्तीसी । वरिलें भक्तांसी तोषवूनि ॥४॥अयोध्येसी जातां दर्प भार्गवाचा । हरिला प्रत्यंचा ओढूनियां ॥५॥वासुदेव म्हणे पितृवचनार्थ । कैकेयीचा शब्द पुढती मानी ॥६॥७९काननीं राक्षसीनासिकेचा छेद । राक्षसांचा वध केला बहु ॥१॥वृत्त तें रावणा कथी शूर्पणखा । सीतेच्या स्वरुपा वर्णी तेंवी ॥२॥मोहित पौलस्त्य मारिचासमेत । येऊनि सीतेस हरुनि नेई ॥३॥मार्गांत जटायु अडवी तयातें । राम सीते, सीते, करुनि रडे ॥४॥शोधितां सीतेस पाही जटायूसी । करी क्रिया त्याची परम दु:खें ॥५॥वासुदेव म्हणे कबंधाचा वध । सुग्रीवाचें सख्य पुढती होई ॥६॥८०वालिवधोत्तर वास्तव्य त्याठायीं । सीताशुद्धि होई, पुढती सेतु ॥१॥लंकेमाजी जातां होई घोर युद्ध । अंतीं दुष्टवध केला रामें ॥२॥सीताभेट होतां सकलां आनंद । बिभीषणा राज्य अर्पी प्रभु ॥३॥पुष्पकविमानीं बैसूनि पुढती । मार्ग आक्रमिती अयोध्येचा ॥४॥भरतासी वृत्त कथी हनुमान । वृत्त तें ऐकूनि सकलां हर्ष ॥५॥वासुदेव म्हणे भरताची भेट । आनंदाची लूट तयावेळीं ॥६॥८१पुढती नगरीं प्रवेशले राम । भेटती येऊन माता हर्षे ॥१॥अन्यदिनीं होई अभिषेकोत्सव । त्रेतायुगीं सर्व म्हणती कृत ॥२॥पितृआज्ञेसम श्रीरामाची आज्ञा । वंद्य सकलांना वाटे बहु ॥३॥आदर्श श्रीराम सकळ राजांसी । नसे आधि-व्याधि राज्यीं त्याच्या ॥४॥अपमृत्यु कोणा न येईचि साचा । सतीधर्मे सीता रामा सेवीं ॥५॥एकपत्नीव्रत आचरुनि राम । प्रजासंरक्षण करीतसे ॥६॥वासुदेव म्हणे दाशरथी राम । कैवल्यनिधान वंदुं प्रेमें ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 02, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP