मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक १०१ ते १०५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक १०१ ते १०५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १०१ ते १०५ Translation - भाषांतर क्षेत्राणां चैव सर्वेषां यथा काशी ह्यनुत्तमा । तथा पुराणव्रातानां श्रीमद्भागवतं द्विजाः ॥१०१॥आणि सर्वक्षेत्रांमाजि काशी । अनुत्तमा केवळ जैसी । जीहून अन्योत्तम नसे ऐसी । क्षेत्रा शीर्षीं मंडन पैं ॥९८५॥तेंवि पुराणज्योतिषीं सकळीं । श्रीमद्भागवत अंशुमाळी । उत्तमोत्तम कैवल्यशाळी । पुण्यबहळीं विराजित ॥८६॥ऐसें श्रीमद्भागवताचें । महिम्न ब्राह्मणां कथून साचें । यावरी तात्पर्य सर्वार्थाचें । मुकुलित वाचे सूत कथी ॥८७॥श्रीमद्भागवतं पुराणममलं यद्वैष्णवानां प्रियं यस्मिन्पारमहंस्यमेकममलं ज्ञानं परं गीयते ।तत्र ज्ञानविरागभक्तिसहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं तच्छृण्वन्विपठन्विचारणपरो भक्त्या विमुच्येन्नरः ॥१०२॥जें श्रीमद्भागवतपुराण । अमळ वैष्णवां प्रिय संपूर्ण । जेथ अर्थवादादिलक्षण । नसे निपटून साद्यंत ॥८८॥परमहंसी जे एक पाविजे । निर्मळज्ञानवस्तु उमजे । तें उत्कृष्ट यामाजि सहजें । कथिजतें भोजें बोधमय ॥८९॥आणि जेथ सर्वकर्मोपरम । तें नैष्कर्म्यसंकल्पावगम । भक्तिज्ञानविरागेंसीं सम । अवघें सुगम विस्तारिलें ॥९९०॥तें निजभक्तीनें निरंतर । ऐकत पढत असतां नर । विवेकें होय विचारणपर । तो मुक्त सत्वर होत असे ॥९१॥हें रहस्य येथींचें मुख्य । सुश्रोतयां कथूनि प्रख्य । आतां निश्चय आपुला सम्यक । वदे निष्टंक आनंदें ॥९२॥कस्मै येन विभासितो यमतुलो ज्ञानप्रदीपः पुरा तद्रूषेण च नारदाय मनुये कृष्णाय तद्रूपिणा । योगीन्द्राय तदात्मनाऽथ भगवद्राताय कारुन्यतस्तच्छुद्धं विमलं विशोकममृतं सत्यं परं धीमहि ॥१०३॥पूर्वीं ब्रह्मयाकारणें । ज्याचे न ये च अन्य तुलने । तो हा ज्ञानप्रदीप सकरुणें । कथिला जेणें अनुपम ॥९३॥मग तोचि नारदमुनीकारणें । ब्रह्मरूपें कथिला वचनें । त्यावरी नारदरूपें कृपेनें । व्यासाकारणें प्रकाशिला ॥९४॥व्यासरूपें शुकयोगिया । मग शुकरूपें नृपा तया । भगवद्गाता कारणें प्राया । अतिकारुण्यास्तव कथिला ॥९९५॥जेंवि कृशानें अधिष्ठिली वर्ति । तेचि प्रदीप्त होतसे ज्योति । मग तत्तदूपें अनेकांप्रति । प्रकाशी स्वस्थिति अन्वयें ॥९६॥तेंवि परंपरागत एवंरूप । श्रीभागवतात्मक ज्ञानप्रदीप । प्रकाशिला तो शुद्ध निर्लेप । परमसकृप चिन्मात्र ॥९७॥शोकातीत विमळ शान्त । जरामरनरहित अमृत । नारायणाख्य तत्व सत्य । निजहृदयांत मी ध्यातों ॥९८॥ऐसें बोलूनि सूत तेव्हां । प्रेमोत्कर्षें धरूनि भावा । नमन करी देवाधिदेवा । बोधोपकारा आठवूनी ॥९९॥कीं ग्रंथ संपतां मंगळाचरण । अवश्य करावें सुवक्तेन । तेंचि मंगळप्रद गुरुदेवनमन । करी सुज्ञ सद्भावें ॥१०००॥नमस्तस्मै भगवते वासुदेवाय साक्षिणे । य इदं कृपया कस्म व्याचचक्षे मुमुक्षवे ॥१०४॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । सर्वसाक्षी नारायण । अखिलभूतनिवासी पूर्ण । रमारमण वासुदेव ॥१॥नमन त्या भगवंताकारणें । जो ब्रह्मयाकारणें कृपेनें । श्रीभागवत उदारपणें । जाला स्वगुणें उपदेशिता ॥२॥कीं तो ब्रह्मा परमविरक्त । मुमुक्षु शुद्ध अधिकारवंत । शान्त दान्त पवित्र भक्त । यास्तव निवान्त प्रबोधिला ॥३॥ऐसें नमूनि नारायण । आतां आपुला सद्गुरुराणा । जो निरसिता संसारविगुणा । निजकल्याणा अभिवंदी ॥४॥योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे । संसारसर्पदष्टं यो विष्णुरातमजीवयत् ॥१०५॥समस्त योगियां माजी श्रेष्ठ । शुकयोगीन्द्र सद्गुरु इष्ट । ब्रह्मरूप स्वयें प्रकट । करुणाविष्ट निज शरणा ॥१००५॥तया कारणें साष्टाङ्गनमन । जो प्रणतजनांचें निजजीवन । सौभद्रनंदनातें पूर्ण । जाला आपण जीवविता ॥६॥अज्ञानकाळीं संसारोरगें । डंखिला सबळ अविद्यावेगें । तया निजबोधामृतामोघें । जीवविलें आंगें ब्रह्मत्वें ॥७॥एवं नमूनि शुकयोगीन्द्रा । निजदेशिका बोधसमुद्रा । यावरी स्वाभीष्ट मागे गुरुवरा । ते सूतगिरा अवधारा ॥८॥जया निजगुरुपदीं आवडी । तद्दास्याची जीवीं गोडी । वांछिती परमार्थाची जोडी । कैवल्यहोडी उपेक्षूनी ॥९॥तिहीं हेंचि मागिजे गुरुदेवा । उपेक्षूनि इहपरविभवा । मजहि हाचि असे हेवा । सूत ज्या दैवा संप्रार्थी ॥१०१०॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP