मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ८६ ते ९० अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ८६ ते ९० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ८६ ते ९० Translation - भाषांतर यूयं द्विजाग्र्या बत भूर भागायच्छश्वदात्मन्यखिलात्मभूतम् ।नारायणं देवमदेवमीशमजस्रभावाभजता विवेश्य ॥८६॥यास्तव द्विजश्रेष्ठ हो तुम्ही । बहुपुण्यात्मे तपादि नियमीं । परमभाग्याचे निष्कामकामी । कीं पुरुषोत्तमीं अनुसरलां ॥६॥इहपरकाम सांडूनि सर्व । सर्वान्तर्यामी वासुदेव । नारायण जो देवाधिदेव । ज्यां नाहींच देव आणिक ॥७॥कोण्या हेतूस्तव म्हणाल जरी । तरी ईश सर्वांचा नियमनकारी । ऐसियातें निजान्तरीं । भजतां निर्द्धारीं प्रवेशवून ॥८॥श्रीहरीचें वास्तवरूप । निजानुभवें निर्विकल्प । अभेदभावें आपेंआप । चिन्तूनि अकंप भजतात ॥९॥धन्य धन्य तुमचें जन्म । धन्य धन्य तुमचें कर्म । धन्य धन्य तुमचें काम । कीं पुरुषोत्तमपर जालां ॥९१०॥आजि तुमच्या भाग्योत्तमा । सहसा नेणवे मातें उपमा । भजनें लंघिलें कलिमलछद्मा । कैवल्यधामा साधियलें ॥११॥अहं च संस्मारित आत्मतत्वं श्रुतं पुरा मे परमार्षित वक्त्रात् ।प्रायोपवेशे नृपतेः परीक्षितः सदस्यृषीणां महतां च शृण्वताम् ॥८७॥आणि मजवरहि उपकार थोर । द्विज श्रेष्ठ हो तुमचा फार । जाला असे कीं हें सार । परमार्थर स्मरविलों ॥१२॥परम ऋषि जो श्रीशुकमुनी । परिसिलें तयाच्या मुखाहूनी । आत्मतत्व म्यां निज श्रवणीं । पूर्वीं रंगणीं संतांच्या ॥१३॥जैं प्रायोपविष्ट नृप परीक्षिती । तयाचे संसदीं यथानिगुती । ऐकत असतां महंत सुमती । तैं दैवोदितीं हें लाभलें ॥१४॥तें बहुतां दिवसांचें स्मरविलें । हरिकीर्तनोत्साहें निवविलें । माझेंचि मजला दृढाविलें । मज जालें येणें बहु सुख ॥९१५॥वनश्री जेंवि कां वनोदरीं थोकली राहे जीर्णाङ्कुरीं । वसंतसंगें जयापरी । सुमनादिभारीं रूपा ये ॥१६॥ऐसें मुनिश्रोतयां सूत । प्रमोदूनियां तोषभरित । यावरी भागवताची तथ्य । महिमा कथित फळयुक्त ॥१७॥तेचि फळश्रुति आणि महिमा । कैवल्यदायक अत्युत्तमा । श्रोतीं परिसावी धरूनि प्रेमा । सांडूनि गरिमा आविद्यक ॥१८॥एतद्वः कथितं विप्राः कथनीयोरुकर्मणः । माहात्म्यं वासुदेवस्य सर्वाशुभविनाशतम् ॥८८॥सूत म्हणे विप्र हो हें । उत्कृष्टकर्म वसुदेवतनयें । त्या वासुदेवाचें माहात्म्य स्वयें । कथिलें कथनीय तुम्हांसि म्यां ॥१९॥कथाया योग्य हेंचि कैसें । ऐसें कल्पाल जरि मानसें । तरी अशुभाचें आपैसें । नाशक असे महिम्न हें ॥९२०॥पाप ताप दुःख दरिद्र । शोक मोह अपयश क्षुद्र । अज्ञानादि अशुभमात्र । नाशक चरित्र हरीचें ॥२१॥य एवं श्रावयेन्नित्यं यामक्षणमनन्यधीः । श्रद्धावान्योऽनु शृणुयात्पुनात्यात्मानमेव सः ॥८९॥ऐसें अखिल मंगळायतन । परमार्थ विधीनें याम क्षण । हें सद्भाविकां करवीं श्रवण । अनन्यधिषण जो कोण्ही ॥२२॥आणि श्रद्धावंत जो ऐके श्रोतीं । आस्था अंतरीं धरूनि पुरी । तो तत्काळ नर निर्द्धारीं । पवित्र करी आपणातें ॥२३॥जैसा वक्ता तैसाचि श्रोता । या भागवताचा भक्त पुरता । केवळ आपणातेंचि स्वता । करी सर्वथा पुनीत ॥२४॥स्नानादिकीं देहचि पूत । होय तैसें हें नव्हे निश्चित । साक्षात आत्मा चेतनानाथ । जो भ्रमें म्हणवीत मी जीव ॥९२५॥तें जें आपुलें निजरूप । अविद्याविनाशें निष्कंप । सच्चिदानंद निर्विकल्प । श्रवणें पठनें करी नर ॥२६॥नित्य होतां श्रवण पठन । कळे नित्यानित्यविवेक पूर्ण । तेणें होय निजात्मज्ञान । जननमरणभय लोपे ॥२७॥स्वप्नामाजि दुःखें नाना । जागृति उपाय तन्निरसना । तद्वत उपाय निजमोक्षणा । आत्मज्ञानावीण नसे ॥२८॥स्वप्नभ्रमाचा परिहार । जागृति जालिया उशीर । करावया न लगे किंचिन्मात्र । हेंहि स्वतंत्र तैसेंची ॥२९॥तेंचि आत्मज्ञान नव्हे सानें । त्यीर्थें यज्ञें तपें दानें । सगुणनिर्गुणश्रवणें पठनें । वांचूनि आनें केवळ ॥९३०॥म्हणाल अंतःकरणशुद्धीवीण । कैसें होईल निजात्मज्ञान । तें यज्ञादिक्रियेनें साधे पूर्ण । परी हिंसादि दूषण तेथ वसे ॥३१॥जे जे सोपाधिक पुण्यक्रिया । ते ते पापेंवीण नये आया । देशकाळादि प्रत्यवाया । पाविजे विधिनिषेधीं ॥३२॥तेथ पापपुण्याचें जोड फळ । बहुधा लाहिजे केवळ । तथापि विरळा पुण्यशीळ । अस्पृष्टशमल निर्मळ ॥३३॥यास्तव चित्तशुद्धि आणि ज्ञान । होती दोन्हीहि करितां पूर्ण । श्रीमद्भागवताचें सेवन । जाणा सर्वज्ञ श्रोते हो ॥३४॥सगुणलीलावतारचरित्रें । नामें अनेकें अतिपवित्रें । ये ग्रंथीं कथिलीं जीं विचित्रें । ती श्रोतृवक्त्रें सेविता ॥९३५॥पाप आकल्प क्षणें नाशे । पुण्योत्कर्षें अपार पोषे । मग कथिलें येथ वास्तव जैसें । अपरोक्ष तैसें बोधा ये ॥३६॥यास्तव श्रीमद्भागवताचा । वक्ता श्रोता स्वयेंचि साचा । घोट भरूनि अविद्येचा । पुनेत आपणा करितसे ॥३७॥आतां पर्वादिविशेषें । महिमा ज्यापरि वाच्य असे । तोहि परिसा प्रेमोत्कर्षें । स्वस्थमानसें अमोघ ॥३८॥द्वादश्यामेकादश्यां वा शृण्वन्नायुष्यवान्भवेत् । पठत्यनश्नन्प्रयतस्ततो भवत्यपातकी ॥९०॥विष्णुव्रतां माझारी थोर । द्वादशी एकादशी पवित्र । मोक्षमार्गींचें अग्रहार । किंवा वज्र अघनगा ॥३९॥या पुण्यदिवशीं पढे ऐके । नियमाचरें पृथक्पृथकें । तेणें फळ होय तेंही आशिकें । कथितों निकें व्यासोक्त ॥९४०॥एकादशीचे पुण्यदिनीं । केवळ निराहारी असोनी । ऐके पढे आनंदोनी । होय तो जनीं अपातकी ॥४१॥शुष्कें आर्द्रें सांसर्गिकें । महापापें उपपातकें । तीं सर्व श्रवणें पठनें ऐके । नाशती विवेकें भ्रमापरी ॥४२॥पारणा सारूनि द्वादशीसी । प्रयत होत्साता दिवानिशी । पडे ऐके जो विवेकराशी । होय तो विशेषी आयुष्मान् ॥४३॥तयाचीं अपमृत्यादि विघ्नें । होती संपूर्ण हीं भग्नें । राहे सर्वदा अरोगपणें । शुभलक्षणें विराजित ॥४४॥म्हणाल अनन्यभक्ति करून । करितां श्रीभागवतसेवन । पारमार्थिक साधे पूर्ण । व्यवहारसधन केंवि घडे ॥९४५॥तरि तैसें नव्हे हें एकदेशी । भुक्तिमुक्तिद कल्याणराशी । येथ ऋद्धि सिद्धि तिष्ठती दासी । ऐका संक्षेपेंसीं ते गोष्टी ॥४६॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP