मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर स रुक्मिणोदुर्हितरमुपयेमे महारथः । तस्मात्सुतोऽनिरुद्धोऽभोन्नागायुतबलान्वितः ॥३६॥तरी तो प्रद्युम्न महारथी । रुक्मिमातुळात्मजा सती । नामें पवित्रा रुक्मवती । जाल सुमती विवाहिता ॥७९॥हें तंव कथानक सविस्तर । पूर्वीं च कथिलेंसे समग्र । असो तियेपासूनि कुमर । जाला सुन्दर अनिरुद्ध ॥३८०॥अयुतहस्तींचें तयासि बळ । शस्त्रास्त्रविद्येमाजि कुशल । यशस्वी प्रतापी प्राञ्जळ । परम सुशीळ अतिदक्ष ॥८१॥स चापि रुक्मिणः पौत्रीं दौहित्रो जगृहे ततः । वज्रस्तस्याभवद्यस्तु मौसलादवशेषितः ॥३७॥तो ही रुक्मियाची नात । दौहित्र तयाचा यथार्थ । रोचनानामका गुणवंत । जाला गृहीता तत्पाणि ॥८२॥त्यानंतरें त्या अनिरुद्धास । पुत्र जाला त्या वज्रनिर्देश । जो मुसळप्रळय ऋषिशापरोष । त्याहूनि अवशेष वांचला ॥८३॥प्रतिबाहुरभूत्तस्मात्सुबाहुस्तस्य चात्मजः । सुबाहोः शान्तसेनोऽभूच्छतसेनस्तु तत्सुतः ॥३८॥त्यापासूनि जाला प्रतिबाहु । तयाचा आत्मज सुबाहु । सुबाहूचा गुणवंत बहु । पुत्र सदैव शान्तसेन ॥८४॥तयाचा तनय शतसेन । त्याहूनि पुढें वर्धमान । वंशपरंपरा संपूर्ण । कथावी गहन कोठवरी ॥३८५॥भगवत्प्रसादगुणें । महिमा ऊर्जित विख्यातपणें । यदुकुळाच्या शुभलक्षणें । उपमा देणें घडेना ॥८६॥न ह्येतस्मिन्कुलेजाता अधना अबहुप्रजाः । अल्पायुषोऽल्पवीर्याश्च अब्रह्मण्याश्च जज्ञिरे ॥३९॥या कुळीं दैवें जे जे जाले । असंपन्न सहसा नायकिले । सकळसंपत्तींहीं भरले । पुण्याथिले सज्ञान ॥८७॥निर्द्धन किंवा अल्पप्रज । अल्पायुशाल्पवीर्य सहज । अब्रह्मण्य अल्पतेज । ऐसे कोण्हीच न जन्मले ॥८८॥अवघेच यथेष्ट धनवंत । तैसेचि विपुळ संतानयुक्त । स्वधर्मतेजें सम भास्वत । ब्राह्मणभक्त ब्रह्मिष्ट ॥८९॥वेदोक्तधर्माचरणनिरत । शमसंपन्न इन्द्रियजित । सत्यभाषणी सत्यव्रत । कीर्तिमंत जगत्त्रयीं ॥३९०॥जरी पुससी ऐसें विचक्षणा । संख्या किती यादवगणा । तरी विदित नसेच हें कोणा । विस्तारपणा बाहुल्यें ॥९१॥यदुवंशप्रसूतानां पुंसां विख्यातकर्मणाम् । सङ्ख्या न शक्यते कर्तुमपि वर्गायुतैर्नृप ॥४०॥अत्यंत बुद्धिकुशळ ज्ञाता । पुरुषां यदुवंशप्रसूतां । बहुविख्यात कर्मवंतां । निरंतर गणितां शतवर्षें ॥९२॥तथापि तिहीं करूनियां । संख्या करूं न शके राया । हे गोष्टी यावया प्रत्यया । ऐक आपैसया कांहींसे ॥९३॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP