मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर तिस्रः कोट्यः सहस्राणामष्टाशीतिशतानि च । आसन्यदुकुलाचार्याः कुमाराणामिति श्रुतम् ॥४१॥सहस्रें सहस्र यदुकुमार । तयांचे आचार्य पढविणार । यदुकुळीं होते विद्यापात्र । गणना विचित्र तयांची ॥९४॥तीन कोटि अठ्यायशीं शतें । पृथक् पृथक् इतुकें होते । हें परिसिलें परि निश्चयातें । आम्हां निरुतें करवेना ॥३९५॥एकैका गुरूजवळ । पुढें अनेक अर्भकमेळ । तयांची व्यवस्था सकळ । केंवि प्राञ्जळ घडेल ॥९६॥सङ्ख्यानं यादवानां कः करिष्यति महात्मनाम् । यत्रायुतानामयुतलक्षेणास्ते स आहुकः ॥४२॥पृथक बहुतांचे पढविणारे । ते आचार्यसंख्या निर्द्धारें । जेव्हां इतुकी गणनाद्वारें । ते ही परस्परें श्रुतमात्र ॥९७॥परंतु सम्यक जाणिजेत नाहीं । तेव्हां कुमरांची संख्या पाहीं । कैसी करणें घडेल कहें । गोष्टी हेही विचारीं ॥९८॥मां वडिल यादवांची संख्या । कवण करील तें श्रोतृमुख्या । अपरिमितचि ऐसी आख्या । पुराणलेख्या माजिवडी ॥९९॥जेथ अयुताचे अयुत लक्ष । इतुका यदुसमुदाय दक्ष । तेणें करूनियां प्रत्यक्ष । राहिला तो ईश आहुक ॥४००॥अयुत म्हणिजे सहस्र दश । दशसहस्रें अयुत लक्ष । गणितां गणना होय विशेष । जेथ मनाचें लक्ष पांगुळे ॥१॥जरी म्हणसी कीं हे येतुले । एकत्र कोठोनियां जन्मले । तरी येविषयीं पुरा वर्त्तलें । तुजला वहिलें कथितों मी ॥२॥देवासुराहवहता दैतेया ये सुदारुणाः । ते चोत्पन्ना मनुष्येषु प्रजा दृप्ता बबाधिरे ॥४३॥पूर्वीं सुरासुरांचें युद्ध । जालें अत्यंत घोर प्रसिद्ध । तेथें मृत्यु पावले जे विरुद्ध । दैत्य विविध बहु दारुण ॥३॥तेचि मनुष्यांच्या ठायीं । पुन्हा जन्मले दुःखदायी । पढिले निर्ज्जरांचिये ठायीं । निर्मूळ सर्वही करावया ॥४॥मूळ देवांचे साङ्ग यज्ञ । यज्ञकारक मर्त्यसुज्ञ । ते स्वधर्मीं असतां निमग्न । इहामुत्रिका सुरवाड ॥४०५॥ यास्तव धर्माचा उच्छेद । करावया प्रवर्तले विशद । पीडूं लागले प्रजावृंद । दृप्त अबुद्ध दुरात्मे ॥६॥तन्निग्रहाय हरिणा प्रोक्ता देवा यदोः कुले । अवतीर्णाः कुलशतं तेषामेकाधिपं नृप ॥४४॥तयांच्या निग्रहाकारणें । देवां आज्ञापिलें हरीनें । ते अवतरले मानवपणें । यदुकुळीं जाणें सहस्रशः ॥७॥ज्यांचे एकाधिप कुलशत । म्हणिजे अनेक कुळें जीं विस्तृत । तयांचा एकचि राजा समर्थ । कीं मिथैकचित नरेश ॥८॥तेषां प्रमाणं भगवान्प्रभुत्वेनाभवद्धरिः । ये चानुवर्त्तिनस्तस्य ववृधुः सर्वयादवाः ॥४५॥तयांसि प्रभुत्वें एक प्रमाण । षड्गुणैश्वर्यसंपन्न । श्रीकृष्ण देवकीनंदन । जाला परिपूर्ण सामर्थ्यें ॥९॥तेणें त्रैलोक्यीं निर्भय । अखिलोर्जित आनंदमय । सुरवाडले यादवनिचय । पूर्णाशयें धर्मिष्ठ ॥४१०॥आणि जे अनुवर्ती हरीचे । वर्तती सहवासें कां साचे । प्रेमानंदें चित्त नाचे । सदा जयांचें सद्भावें ॥११॥ते सर्वही यादव सुखें । वाढले विशिष्टदैवोल्लेखें । उल्लंघिलें मर्यादारेखे । पूर्णविवेकें संपन्न ॥१२॥यादवांच्या बहुकुळश्रेणी । त्यांमाजि वृष्णिकुळीं चक्रपाणी । स्वयें अवतरला कल्याणखाणी । म्हणोनि वृष्णि अतिनिकट ॥१३॥काय वर्णूं तयांचा महिमा । जे स्थिति दुर्ल्लभ मुनिनिष्कामां । योगियां प्राप्तां अभ्याससीमा । ते यां उत्तमा सहजगती ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP