मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर एकैकस्यां दश दश कृष्णोऽजीजनदात्मजान् । यावन्त्य आत्मनो भार्या अमोघ गतिरीश्वरः ॥३१॥एकैके स्त्रियेचे ठायीं । दश दश पुत्रांतें शेषशायी । जनिता जाला हे नवायी । न्यूनाधिक कहीं न स्रवला ॥३६५॥जितुक्या स्वस्त्रिया सर्वही । तितुक्या समपुत्रवती पाहीं । केल्या श्रीकृष्णें ज्या कांहीं । विकल्प नाहीं सापत्न ॥६६॥कीं अमोघ रति जयाची पूर्ण । तो पत्यक्ष ईश्वर श्रीकृष्ण । सत्यसंकल्पी सनातन । स्वेच्छावतरणसंकर्त्ता ॥६७॥असो आतां ते समग्र पुत्र । महाप्रतापी परम पवित्र । ज्यांचा उद्दाम पराक्रम तीव्र । धीर उदार सुशीळ जे ॥६८॥एक लक्ष एकषष्टिसहस्र । त्यावरी अधिक अशीतिमात्र । इतुके हो गणनासूत्र । गणितां अवग्र कार्ष्णि हें ॥६९॥तेषामुद्दामवीर्याणामष्टादश महारथाः । आसन्नुदारयशसस्तेषां नामानि मे शृणु ॥३२॥तयां उद्दामवीर्यामाजी । अष्टादशतनुजराजी । महारथी ऐसी वाजी । शौर्यकाजीं अतिदक्ष ॥३७०॥जे उदार यशस्वी समरमेश । अतिप्रतापी जेंवि चंडांश । तयांचे पृथकनामनिर्देश । ऐक अशेष मजहून ॥७१॥प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च दीप्तिमान्भानुरेव च । साम्बो मधुर्बृहद्भानुश्चित्रभानुर्वृकोऽरुणः ॥३३॥पुष्करो वेदबाहुश्च श्रुतदेवः सुनन्दनः । चित्रबाहुर्विरूपश्च कविर्न्यग्रोध एव च ॥३४॥प्रद्युम्न आणि अनिरुद्ध । दीप्तिमान भानु प्रसिद्ध । बृहद्भानु साम्ब मधु । चित्रभानु वृक अरुण ॥७२॥पुष्कर वेदबाहु श्रुतदेव । सुनंदन चित्रबाहु सुदैव । विरूप कवि न्यग्रोध । नांव जाण अपूर्व शेवटील ॥७३॥एवं नामीं हे अठरी जण । येथ अनिरुद्ध कथिला जाण । तो कृष्णपौत्र हें श्रुतमान । पिता प्रद्युम्न जयाचा ॥७४॥तरी सुत सप्तदश गणावे । यांसि शौर्यें तत्तुल्य जाणावें । कीं अनेकतनयीं याही नांवें । असेल कोण्ही पुत्रांचीं ॥३७५॥एतेषामपि राजेन्द्र तनुजानां मधुद्विषः । प्रद्युम्न आसीत्प्रथमः पितृवद्रुक्मिणीसुतः ॥३५॥ऐसे अष्टादश हे महारथी । मधुद्विषाचे पुत्र सुमती । इतुकियांही सकळ सुतीं । प्रथम निश्चिती प्रद्युम्न ॥७६॥जो देवी रुक्मिणीचा नंदन । पित्यासारिखाचि दृश्यमान । रूपें वीर्यें गुणें समान । प्रतिमा आन प्रभूची ॥७७॥आतां ययाचा संक्षेपें वंश । ऐकें प्रसंगें भो नरेश । ज्याचिया स्मरणें अघभ्रंश । होय निःशेष क्षणमात्रें ॥७८॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP