मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ९१ ते ९५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ९१ ते ९५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ९१ ते ९५ Translation - भाषांतर देवता मुनयः सिद्धाः पितरो मनवो नृपाः । यच्छन्ति कामान्गृणतः श्रृण्वतो यस्यकीर्तनात् ॥९१॥राजा जालिया कृपावंत । नियोगी करिती आदर बहुत । तेंवि येणें तुष्टे रमाकान्त । यास्तव समस्त आदरिती ॥४७॥इंद्रादि देवता संपूर्ण । महर्षि आदि मुनि सर्वज्ञ । अर्यमादिक पितृगण । तैसेच मनु नरपति ॥४८॥हे श्रीभागवताचा गाता ऐकता । तयाच्या सर्व कामांतें तत्वता । पुरविती सर्वथा न मागतां । भजती सर्वथा आस्थेनें ॥४९॥कीं येथ भागवतीं हरिकीर्तन । तें हा निरंतर करी सुसेवन । जेथ कीर्तन तेथ भगवान । यास्तव संपूर्ण आदरिती ॥९५०॥श्रीभागवतोपजीवी नर । त्या न स्पर्शे दुःख दरिद्रे । चार्ही पुरुषार्थ अच्छिद्र । लाभे निरंतर यथेष्ट तो ॥५१॥यास्तव श्रीभागवतीं प्रीती । जयासि जाली अनन्यरीती । त्या सुलभ सर्वार्थ वोळगती । हे निश्चयोक्ती निर्द्धारें ॥५२॥पुराणसङ्ख्या सम्भूतिमस्य वाच्य प्रयोजने । दानं दानस्य माहात्म्यं पाठादेश्च निबोधत ॥९२॥आतां पुराणसंख्यासंभूति । आणि येथींचें वाच्य यावत्समाप्ति । तेंविच प्रयोजन ही तुम्हां प्रति । कथितों सद्रीती यथार्थ ॥५३॥आणि जैसें करावें याचे दान । आणि माहात्म्य दानाचें संपूर्ण । आणि पारायणाचें लक्षण । जाणा निक्षुण्ण मद्वचनें ॥५४॥ब्रह्मपद्मविष्णुपुराण । शिवनारदमार्कंड वान्ह । भविष्यब्रह्मवैवर्त्ताभिधान । लिंगपुराण तें दाहावें ॥९५५॥वाराहस्कंदवामन । कूर्ममत्साख्य पुराण । गरुडब्रह्माण्डनामक पूर्ण । श्रीभागवत अठरावें ॥५६॥एवं पुराणसन्दोहश्चतुर्ल्लक्ष उदाहृतः । तत्राष्टादशसाहस्रं श्रीभागवतमिष्यते ॥९३॥ऐसा हा पुराणसमुच्चय । चतुर्ल्लक्षसंख्याक होय । त्यामाजि श्रीभागवताह्वय । श्लोक सहस्र अष्टादश ॥५७॥इदं भगवतापूर्व ब्रह्मणे नाभिपङ्कजे । स्थिताय भवभीताय कारुण्यात्सम्प्रकाशितम् ॥९४॥पूर्वीं कल्पादिकाळीं विधि । हरिनाभिकंजीं रजोनिधी । जन्मला जैं प्रळयान्तसंधी । राहिला स्तब्धधी पद्मासनीं ॥५८॥कांहीं नुमजेचि परावर । जल मात्र अगाध सर्वत्र । मग निर्बुजला अधिकतर । भवभय घोर पावला ॥५९॥ऐसिया ब्राह्मया कारणें । कारुण्यास्तव करुणापूर्णें । हें सम्यक्प्रकारें नारायणें । परमदयेनें प्रकाशिलें ॥९६०॥आतां श्रीमद्भागवतीं । वाच्य संपूर्ण यथानिगुती । तेंही परिसा सावधवृत्ती । संक्षेपोक्ती वरूनियां ॥६१॥आदिमध्यावसानेषु वैराग्याख्यन संयुतम् । हरिलीलाकथाव्रातामृतानन्धितत्सुरम् ॥९५॥आदि मध्यावसानीं येथ । आख्यानें जीं कथिलीं शस्त । तीं सर्वही वैराग्ययुक्त । श्रवणें विरक्त मन होय ॥६२॥माजि हरिलीलासमूह । तेंचि अमृतरूप निःसंदेह । तेणें शिवादिसुरसमुच्चय । आनंदमय सर्वदा ॥६३॥ऐसें सर्वानंदकर केवळ । जगत्पावन सार निखळ । श्रीमद्भागवत स्वानंदमूळ । ऐका प्रांजळ प्रयोजन ॥६४॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP