मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ९० वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ९० वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते १०७ अध्याय ९० वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर कृष्णस्तु तत्स्तनविषज्जितकुङ्कुमस्रक् क्रीडाभिषङ्गधुतकुन्तलवृन्दबन्धः । सिञ्चिन्मुहुर्युवतिभिः प्रतिषिच्यमानो रेमे करेणुभुइरिवेभपतिः परीतः ॥११॥त्या ज्या क्रीडमाना स्वाङ्गना । तदालिंगनें स्रक्संपूर्णा । तत्स्तनकुंकुमास्तव जाणा । रंगल्या सघना जयाच्या ॥७२॥निडळपट्टिके ऊर्ध्वभागीं । कुरळ केश द्विरेफरंगीं । तन्निचयजटिका चांगी । कुटिलानेकीं आकर्णा ॥७३॥ते कुन्तळकदंबबंध । क्रीडाभिनिवेशें अमंद । जवें कपायमान विविध । विलसित प्रसिद्ध जयाचें ॥७४॥ऐसा कुंकुमरंजित स्रग्वी । कंपितकुंतळवृंदीं सर्वी । विराजमान रुचिरावयवीं । लीळानुभावी श्रीकृष्ण ॥१७५॥नद्योदकें तो वारंवार । सिंपित असतां स्त्रीनिकर । भंवता स्त्रियांहीं सिंपिला स्वैर । नर्मानुकार दावूनी ॥७६॥एवं मिथा क्रीडमान श्रीधर । जळीं रमता जाला मनोहर । जेंवि करेणुसह महाकुंजर । क्रीडे दुर्धर निःशंक ॥७७॥वसंतकाळीं चलदलोद्भव । कोमल लसलसित पल्लव । भक्षूनि इभइभीसमुदाव । होताति सर्व कामाकुल ॥७८॥तया उत्कृष्ट कामोद्दीपना । अगाध हदिनी करिणीगणा । सहवर्तमान परिभ्रमणा । क्रीडे विदान गजराज ॥७९॥शुंडेमाजि घेऊनि नीर । भोंवताल्या परिघाकार । शिंपिती कुंजरी कुंजर । जवळी ना दूर होत्सात्या ॥१८०॥तैसाचि तोहि कामान्वित । स्वकरें तवांबरी सिंचित । इतस्तता उपसर्पत । रमे अद्भुतक्रीडाभरें ॥८१॥करिणी कई शुंडादंड । मेळवी स्पर्शी तदंग दृढ । वरि वरी प्रोक्षी वारि उदंड । आळंगी प्रौढ सम्मीळनें ॥८२॥तया गजपतीचिया परी । जळीं तरुणींसह श्रीहरी । रमता जाला नर्माचारी । चिरकाळवरी प्रमोदें ॥८३॥त्यावरी रमणींसह निवान्त । स्वतनु कुंकुमाद्यंकित । क्षाळूनियां विलासभुक्त । निघाला त्वरित बाहेरी ॥८४॥नटानां नर्त्तकीनां च गीतवाद्योपजीविनाम् । क्रीडालङ्कारवासांसि कृष्णोऽदात्तस्य च स्त्रियः ॥१२॥शुष्कवाळुवंटा उपरी । येऊनियां सस्त्रीनिकरीं । क्रीडालंकार वसनें सारीं । जीं भिजली नीरीं क्रीडतां ॥१८५॥तीं नटनर्तकीनर्त्तकगण । गीतवाद्योपजीवी जन । तयां देता जाला कृष्ण । अन्यें परिधान करूनियां ॥८६॥तैशाचि परी तयाच्या स्त्रिया । भूषाम्बरा क्रेडाकाळींचिया । देत्या जाल्या आनंदमया । सर्वहि तया सुभूषिता ॥८७॥त्यानंतरें जगदीश्वर । क्रीडाविरामानुकार । स्वयें दावी मानवाकार । जो परात्पर अविच्युत ॥८८॥सुन्दर वाळुवंट तें मवाल । विस्तृत आणि समानशीळ । चंद्रप्रकाशें अतिसूज्ज्वळ । विलसे ढवळ रमणीय ॥८९॥कुसुकुसुमित द्रुमाचिया पंक्ती । तटाकीं बहुधा विराजती । ह्रदीं कुमुदें प्रफुल्लें अति । शशिदीधितिसंयोगें ॥१९०॥तया वरूनि मंद सुगंध । शीतळवायुप्रवाह शुद्ध । येणें सद्गुणी विश्रामद । कूतप्रमोद केवळ ॥९१॥तेथ स्वमुखें रमारमण । मृदुळास्तरणावरी शयन । करिता जाला तैं आपण । विश्रान्ति पूर्ण पावावया ॥९२॥तंव निकट संपूर्ण ही युवती । रतिरसलालसा कामाकृति । वेधल्या मानसें कृष्णेंङ्गितीं । तयांची स्थिति शुक सांगे ॥९३॥कृष्णैस्यैवं विहरतो गत्यालापेक्षितस्मितैः । नर्मक्ष्वेलिपरिष्वगैः स्त्रीणां किल हृता धियः ॥१३॥एवं म्हणिजे पूर्वोक्त । सक्रीड श्रीकृष्णांचें चरिते । सविलासगतिगामज्यकृत । विनोदयुक्त बोलणें ॥९४॥डोळे मोडूनि चंचलतर । विकसित अर्धोन्मिलीत वक्र । रोहेक धरूनियां चिरस्थिर । स्मर्शराकार ईक्षित ॥१९५॥तैसेंच मंदोच्च उच्चतर हास्य । नर्मक्रीडा उपहास्य लास्य । चुंबनासंघट्टनें आस्य । मन्मथावेशें आलिंगनें ॥९६॥ऐसिया उद्दामक्रीडानुकारी । इंगितीं मन्मथक्षोभकरीं । चाटुचटुललीलाप्रकारीं । हरिल्या बुद्धि स्त्रियांच्या ॥९७॥म्हणोनि केवळ तदात्मक । क्रीडानुवेधे निष्टंक । जाल्या विरहिणी समसम्यक । नाठवे आणिक हरिवीण ॥९८॥जेंवि अमृताची धणी न पुरे । कीं सुखवेळेची मेधा नुतरे । आयुष्यवृद्धीचा हर्ष न सरे । कीं संपत्ति नोसरे सदैवांची ॥९९॥तेंवि उत्कर्षें चिरकाळ । क्रीडला असतां गोपाळ । तथापि उत्कंठा अळुमाळ । न शमे केवळ अबळांची ॥२००॥प्रेमोत्सुक अधिकाधिक । मानसीं प्रवृद्ध साभिलाष । रेखिलीं अंतरीं सम्यक् । तीं इंगितें अशेख आठवती ॥१॥तयांहूनि अन्यचिंतन । विसरल्या मानिनी संपूर्ण । वेधल्या मानसें धृतध्यान । निद्रा निपटून ज्यां न लागे ॥२॥ऐसिये अवस्थे माझारी । बरळती सर्वा विदेहापरी । प्रेष्ठलीलाभिलाषीं अंतरीं । शुकवैखरी तेंचि वदे ॥३॥ऊचुर्मुकुन्दैकधियोऽगिर उन्मत्तवज्जडम् । चिन्तयत्योऽरविन्दाक्षं यास्ता मे गदतः श्रृणु ॥१४॥शुक म्हणे गा विष्णुराता । त्या मुकुंदैकबुद्धि निभ्रान्ता । ज्यांच्या मुकुंदचि अंतरीं पुरता । भरला तत्वता अतिवेधें ॥४॥देह गेह कीं जन विजन । विसरल्या दैहिक संपूर्ण । चिंतित होत्सात्या विगतमन । प्रेष्ठनलिननयनातें ॥२०५॥जेंवि परिपक्कयोगी समाहित । निर्विकल्प विलीनचित्त । आत्मचिंतनें तन्मयस्वस्थ । केवळ निवृत्त गुणनाशें ॥६॥तैशा मुकुंदैकनिष्ठा । चिंतनोत्कर्षें ध्यानाविष्टा । क्षणभरी होऊनि मौनिष्ठा । केवळ विनटा मनोन्मना ॥७॥मग उन्मत्तापरि जड । जीं वाक्यें बोलिल्या वितंड । तीं मज वक्तयापासून रूढ । ऐकें सुहादशिरोमणि ॥८॥महिष्य ऊचुः - कुररि विलपसि त्वं वीतनिद्रा न शेषे स्वपिति जगति रात्र्यामीश्वरो गुप्तबोधः ।वयमिव सखि कच्चिद्गाढनिर्भिन्नचेताः नलिननयनहासोदारलीलेक्षितेन ॥१५॥कृष्णेङ्गितें हृतधी वनिता । चिंतित असतां तया स्वकांता । बाणली विदेह उन्मदावस्था । तंव देखिली उडतां टिवटिवी ॥९॥टिवटिवीचा सहज स्वभाव । करूनियां उच्चविराव । ओरडत उडावें सदैव । बोलती स्वयमेव तयेसी ॥२१०॥श्रीकृष्णविलास साकांक्षा । करूनि स्वकल्पित उत्प्रेक्षा । स्वेच्छा वदोनियां कमलाक्षा । करिती अशेषा जानवणी ॥११॥अवो ये कुररी आक्रोशें । निद्राहीन किन्निमित्तवशें । विलपसी कां तूं विशेषें । स्वसंतोषें कां न निजसी ॥१२॥इये जगीं रात्रीच्या ठायीं । सौषुप्तविश्रांति सर्वही । प्राणिमात्र घेती पाहीं । निश्चिंत हृदयीं होऊनी ॥१३॥प्रत्यक्ष अवलोकीं पां येथ । त्रिजगच्छास्ता जगन्नाथ । जगासमान जगीं स्वस्थ । स्वयें निद्रित ये कालीं ॥१४॥स्वयंभ हृदयाचा परवरी । निजबोधाची संपत्ति सारी । निक्षेपूनियां पूतनारी । जाला निर्द्धारीं गुप्तबोध ॥२१५॥तूं विलपूनियां दीर्घ रवें । निद्रा भंगिसी स्वभावें । हें उचित नोहे जाण जीवें । सखे सदैव विचक्षणे ॥१६॥अथवा तुझा हा विरुद्ध । सहसा नोहेचि अपराध । क्कचित आम्हांसारिखी प्रसिद्ध । जालीसि निर्विद्धचित्त तूं ॥१७॥कोण्या योगें ह्मणसी । तरी तेही ऐकें गोष्टी सरिसी । बाणे अनुभव तव मानसीं । निश्चयेंसी तें बोलों ॥१८॥कमलनयन जो श्रीकृष्ण । त्याचें सविनोद हास्य जाण । तत्सह उदार लीलेक्षण । तेणेंकरून अतिशयें ॥१९॥सये भेदिलीं आमुचीं चित्तें । म्हणोनि नपवों विश्रांतीतें । निद्रा न लागे तीव्र आर्त्तें । मनोमोइतें विलपतसों ॥२२०॥बहुतेक ऐसेंच घडलें तुला । यास्तव करिसी वो गलबला । वृत्तान्त आमुतें जाणवला । तुझा आपुल्या प्रत्ययें ॥२१॥ऐसिया कुररीतें मोहिता । बोलती जंव त्या अवचित्या । तंव चक्रवाकी देखोनि आर्ता । बोलती वनिता तयेसी ॥२२॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP