मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| नारायणबोवाकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... नारायणबोवाकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी नारायणबोवाकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें हरि हर गुरुराज भजा यमपुरिभय वारा ॥ध्रुवपद.॥प्रेमें हरिध्यान धरुनि नारायण बोला ।संग त्यजुनि सगुण भजुनि रंग डंग डोला ॥हरि०॥१॥विषय दुःखरूप सकळ तुच्छ भोग त्यागा ।सद्गुरुपदकमल नमुनि अचळदान मागा ॥हरि०॥२॥दारुणभय घोर पंथिं थोर दुःख झालें ।कष्टुनि जडकर्म करुनि जन्मुनि बहु गेले ॥हरि०॥३॥कर्म सांग घडे ऐसें पुण्य गांठिं जोडा ।नारायण परं धाम सद्गुरुपद जोडा ॥हरि०॥४॥पद २ रें कैसा होऊं सद्गुरु ! उतराई । वाचे वर्णवेना तुझी नवलाई ॥ध्रुवपद.॥उफराटें चालवी पायांवीण । कांहीं केल्या तो होऊं नेदी शीण ।अनायासें दाखवी निज खूण । एकाएकीं जगभान केलें लीन ॥कैसा०॥१॥जन्मोजन्मींचें दुःख विसरलों । परदेशीं आपल्या घरा आलों ।बोध पुत्र देखतां सुखावलों । प्रेमानंदें निजनामामृत प्यालों ॥कैसा०॥२॥निजकांता भेटली स्वानुभूती । सुखमंचकीं बैसतां ओंवाळी ती ।सर्व भावें आवडी डोल देती । काय वानूं त्या स्वरूपाचि ख्याती ॥कैसा०॥३॥निजरूप त्वां केलें चक्रपाणी ! । अगोचर ठेविलें निरंजनीं ।नारायण करी तो विनवणी । देहावीण येतसे लोटांगणीं ॥कैसा०॥४॥पद ३ रें चाल चाल रे मना ! वना जाऊं । रम्य काननीं एकटें सुखी राहूं ॥ध्रुवपद.॥पुण्यारण्याची महाशोभा पाहूं । शोभा पहातां श्रीहरिगुण गाऊं ।वन्य तरूंची सुपर्ण फळें खाऊं । इच्छाविहारि त्या मृगासंगें धावूं ॥चाल०॥१॥दिव्य सरितांचें जळ तृष्णाहारी । मलय मारुत हा स्वयें वारा वारी ।पर्णशय्येतें मृदु निद्रा करी । स्थिर राहे अंतरीं धीर धरी ॥चाल०॥२॥रात्रीं लावूं सोज्ज्वळ चंद्रदीप । विरक्ति कांतेचें पाहूं गौर रूप ।रूप पाहातां आलिंगी आपोआप । दूर करिते स्वयें सर्व ताप ॥चाल०॥३॥ऐशा सुखाची त्या वनीं आहे खाण । तेथें राहतां सांपडे त्याची खूण ।नेटें बोटें दाखवी नारायण । अंगें भेटवी तो सखा निरंजन ॥चाल०॥४॥पद ४ थें या रे ! या रे ! सद्गुरूच्या गह्रीं जाऊं ।प्रेमभक्तीचा सोहळा डोळां पाहूं ॥ध्रुवपद.॥प्रेमानंदें सर्वदां तेथें राहूं । सर्व भावें तयचे गुण गाऊं ।तन मन हें धन तया देऊं । त्याचे चरणीं लागतां सुखिया होऊं ॥या रे०॥१॥शरण जातां अपार दुःख नेतो । निजरूपीं पामरा ठाव देतो ।डोळे भरूनी श्रीहरी दाखवीतो । परब्रह्मींची सुधा चाखवीतो ॥या रे०॥२॥सद्गुरुरायाशिं मोठा कळवळा । निजबोध सांगतो वेळोवेळां ।शांत करी संसार ज्वर ज्वाळा । जया अंगीं वागती सर्व कळा ॥या रे०॥३॥नका नका रे ! धरूं अनुमान । स्वयें भक्तांसी करी निरंजन ।याची ग्वाही देतसे नारायण । मिथ्या होय तरि कापा माझी मन ॥या रे०॥४॥पद ५ वें कैसा तरि हरी किंकर तूझा । गुरु ! करीं कर धर माझा ॥ध्रुवपद.॥तव गुण गणितां फणिवर शिणला कवणा पार न लागे ।ऐसा प्रभु जाणोनि दीनदयाळु सभय अभय तुज मागे ॥कैसा०॥१॥दोषी कुटिल कलंकी कामी पामर जड अन्यायी ।सदय हृदय तव जाणुनि सखया ! पडिलों तुझिये पायीं ॥कैसा०॥२॥हाल हरामी मन तव नामीं न जडुन विषयीं धांवे ।पंचमहा किती कोटी पापी परी विकलों तुझिया नांवें ॥कैसा०॥३॥धांवुन येशी अभय मज देशी तरि मायाभ्रम नासे ।मनिं विश्वार आस चरणाची नारायण कासे ॥कैसा०॥॥४॥पद ६ वें जातें बाई ! माहेरा मूळ आलें । सद्गुरुमाये आवडि बोलाविलें ॥ध्रुवपद.॥बहु चिंता गांजिती सासुबाई । दुःख फार साजणी करूं काई ? ।राहवेना अंतरीं धीर नाहीं । माय बहिणी ओळखी असूं द्यावी ॥जातें०॥१॥आशा तृष्णा ह्या माझ्या जावा नणदा । रात्रंदिवस दाविती नानाछंदा ।काय सांगूं यांच्या मि परफंदा । आतां करवेना हा घरधंदा ॥जातें०॥२॥अवघड माहेराचि ही देहवाट । भावा संगें चालणें मला नीट ।रुद्रगिरीचा तो चढोनियां घाट । गगनपंथें आतांचि जाणें नीट ॥जातें०॥३॥एका चित्तें जातसें परगावीं । वाटे जातां भूलवि माया देवी ।नारायण तेथिंचा पंथ दावी । अंगें भेटवी तो सखा निरंजन आई ॥जातें०॥४॥पद ७ वें आज मुरली गोविंद वाजवितो ॥ध्रुवपद.॥लोक म्हणति हा वेणु नव्हे बाई । वेणुनादें चेटक ऐसें काई ।शुष्केंधन काष्ठांत नीर वाही । कैंचा आतां स्वैंपाक सासू बाई बाई ॥आज०॥१॥स्वयें मुरलीनें योग कोणें केला । जेणें लोभे हरिहस्त बैसायाला ।नेणें हरिचा मुखचंद्र चुंबियेला । तुच्छ गमली मागील रम्य लीला लीला ॥आज०॥२॥मधुर मुरली ऐकतां चित्त मोहे । चित्र जैसें तैसेंच उभें राहे ।ऐसें चैतन्य जड नीर वाहे । पहा वेणूंत कोणीं काय आहे आहे ॥आज०॥३॥एक म्हणती ही सवत कोठें होती । प्रेम फांसा घालूनी घर घेती ।पिसें वेडें लावुनी वनीं नेती । ह्मणे नारायण कृष्णसंग देती देती ॥आज०॥४॥पद ८ वें तो सद्गुरु परब्रह्म तो हरि शिवयोगी ॥ध्रुवपद.॥सदय हृदय अभय वरद मृदु मंजुळ बोले ।विषम विषय वमुनि गरळ सरळ सहज डोले ॥तो०॥१॥सगुण सुमन अगुण अमन सचराचरवासी ।निगम गमन वसन गगन शीतळ सुखराशी ॥तो०॥२॥निकट वसे प्रकट नसे गुण लक्षण कांहीं ।सुगम सुमति निगम वदति अंतपार नाहीं ॥तो०॥३॥नारायण पूर्ण काम अंतरसुख भोगी ।जाति शरण ध्याति चरण तरतिल भवरोगी ॥तो०॥४॥पद ९ वें सोहं चांदणी । चांदणी ग साजणी ! ।गुरूंनीं दाखविली नयनीं ॥ध्रुवपद.॥हृदय सत्वाचे । सत्वाचे आकाशीं ।उगवला उडुपति पुनवेशीं ॥शुद्ध कैवल्य । कैवल्य सिंधुवासी ।देखिला समतेजोराशी ॥लोपल्या तारा । तारा ग ! तेजासी ।लगटल्या शीतळ किरणासी ॥शुभ्र बिंबाचे । बिंबाचे अवकाशीं ।गवसला पूर्ण योगियासी ।राजयोग्याची । योग्याची योगरजनी ॥गुरूंनीं०॥१॥गगनीं चंद्राचे । चंद्राचे अंगीं पुरती ।पसरली दश द्वारावर्ती ॥द्विदळ चक्राचे । चक्राचे दळीं वसती ।भ्रमरगुंफेंत राहे पुढती ॥हंस पुरुषासी । पुरुषासी संग करिती ।ब्रह्मरंध्रिचें भुवन भरिती ॥नादबिंदूच्या । बिंदूच्या कळा भवती ।सकळ ब्रह्मांड भरुनि उरती ॥पंच रंगांचे । रंगांचे शुद्ध अंगणीं ॥गुरूंनीं०॥२॥उठवर पाहतां । पाहतां परतोन ।सहज तनु गेली हरपोन ॥शेज शून्याची । शून्याची मनोहरिणी ।सघन आनंद कंद परणी ॥सुगम एकांत । एकांत वद वर्णी ।सगुण चंद्राशीं झालि मिळणी ॥परम सुख झालें । झालें ब्रह्मभुवनीं ।सखे बाई ! वदवेना वदनीं ॥नवल सद्गुरुची । सद्गुरुची करणी ॥गुरूंनीं०॥३॥प्रकट निजवस्तु । वस्तु चांदणी ।फांकल्या प्रभा ग ! चिद्गगनीं ॥शबल मुळ माया । माया मोहिनी ।सिद्ध योगींद्रचित्तरमणी ॥सकळ विश्रांति । विश्रांति भोग भवनीं ।त्रिगुण जड जीवतापशमनी ॥गहन संसार । संसारसिंधुतरणी ।दत्तगुरु नारायण चरणीं ॥जन्ममरणासी । मरणासि सोडि पाणी ॥गुरूंनीं०॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 18, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP