मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| आदिनारायणकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... आदिनारायणकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी आदिनारायणकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें त्रिपुरांतक जीविं धरावा. ॥ध्रुवपद.॥मदनकदन सुखसदन सदय दुतू ।वदनिं वदत करिं भजनिं पुरावा. ॥त्रिपुरांतक०॥१॥अरतु परतु परतु सुख निरसुनी ।भरणिं भरत भव भरुनि तरावा. ॥त्रिपुरांतक०॥२॥दुरितहरणपदिं शरण शरण आदी - ।नारायणमय बोध भरावा. ॥त्रिपुरांतक०॥३॥पद २ रें भोलानाथ शंभू गा रे ! ॥ध्रुवपद.॥त्रिशूलपाणीसहित भवानी ।हरिहर पतितपावन मनिं ध्या रे ! ॥भोलानाथ०॥१॥आदिनारायणिं भाव धरूनी ।झडकरि सतत विगतभव हा रे ! ॥भोलानाथ०॥२॥पद ३ रें पांडुरंगाचे पाय पाहूं चला रे ! ॥ध्रुवपद.॥नामबळें त्रैलोक्य जिंकूं । करूं काळावरी हल्ला रे ! ॥पांडु०॥१॥निमिष असे हें बहु मोलाचें । टपतो रविचा पिला रे ! ॥पांडु०॥२॥दशवदनादिक गर्वें गेले । कां उगले तुम्ही भुला रे ! ॥पांडु०॥३॥आदिनारायण कोटिकृपेनें । नरदेह तुम्हां दिला रे ! ॥पांडु०॥४॥पद ४ थें जा जा रे ! शरण तुम्ही जा रे ! ॥ध्रुवपद.॥तारिल तो निज देखोनि करुणा रे ! ।अरे ! सद्गुरु महाराजा रे ! ॥शरण०॥१॥आदिनारायणस्वामिचे चरणीं ।निश्चळ दृढ मनिं वो गा रे ! ॥शरण०॥२॥पद ५ वें गाय गुण श्रीरामाचे तूं ॥ध्रुवपद.॥मृगजळवत तव भवभ्रममाया । ध्याय चरण श्रीरामाचे तूं ॥गाय०॥१॥आदिनारायणसद्गुरुस्मरणीं । रतणें हें गुज प्रेमाचें तूं ॥गाय०॥२॥पद ६ वेंकेला व्रजवर गडी गडी तो । जो गड्या नेत पैलथडी थडी तो. ॥ध्रुवपद.॥शाकपत्र एक मात्र असोनि द्रौपदीचे आवडी ।गुप्त तृप्त अधमर्षण करि मुनि अनुपम रसपरवडी. ॥केला०॥१॥धर्म यज्ञ नृपराज मिरवत दधिघृतपय वाहडी ।तुष्ट पुष्ट संतुष्ट करुनि मग द्विजोच्छिष्ट सांवडी. ॥केला०॥२॥धर्म चंद्र अमरेंद्र भी वंदिति तो नेणति गोवळ मुढीं ।उभा उभा घन नभा करुनि बळें हिरोनि नेतो घोंगडी. ॥केला०॥३॥सूर्यसदन रति चौर्यमिसें त्या गोठणिं मारित दडी ।तो हरि गवसुनि बांधुनि बळकट त्राहाटित वृषभासुडीं. ॥केला०॥४॥गज गणिका द्विजअजामिळादिक ध्रुव कुब्जा कूबडी ।अचळ पदाप्रति आदिनारायणें पोंचविली ते घडी. ॥केला०॥५॥पद ७ वेंविलंब न लावीं न लावीं । झडकरि स्वरूप दावीं ॥ध्रुवपद.॥दीनानाथे गिरिजे ! । ब्रीद सत्य करावें तुळजे ! ॥विलंब०॥१॥तुझिया भेटीसाठीं । बळकट प्राण धरिला कंठीं ॥विलंब०॥२॥आदिनारायण तान्हा । तूं माय कृपेचा दे पान्हा ॥विलंब०॥३॥पद ८ वें चाल वो ! सखिये ! पंढरीला जाऊं । शशिभागीं न्हाऊं ॥ध्रुवपद.॥भूवैकुंठिं हरिमंदिर पाहूं । निजदर्शन घेऊं ।............. । ............. ।कटिं कर नटसम चरण विटेवरी ।प्रेमें बुका तुलसीदल वाहूं ॥चाल वो०॥१॥वीणा वरदंडी मादल वाहूं । मन हें बोजाऊं ।हृदयीं सगुणाचें रुपडें ध्याऊं । सद्भावें गाऊं ।राजकाज जगिं लाज विसर्जुन ।कीर्तनि हरिगुण मंगल गाऊं ॥चाल वो०॥२॥श्रद्धा भक्ति गडणी या बोलावूं । पायीं त्याचे राहूं ।संतांचे चरणीं प्रेम दुणाऊं । रस आजी भाऊं ।धन्य धन्य गुरु आदिनारायण ।जगततळीं नृपयोग कमावूं ॥चाल वो०॥३॥पद ९ वें या नगरीं कोणी वर जीना ॥ध्रुवपद.॥सये ! नेमा निवर्जित्या कांहीं । व्रजजन शोकप्रवाहीं ।वाजवी मुरली गिरिधरधारी । तों तनननननन ॥या नगरीं०॥१॥बाहिल्या नये येक । राहिना उगा वो ! ॥तेणें माझा रतिपती सळाले । सनननननन ॥या नगरीं०॥२॥आदिनारायण दहीं । घृत दुध नवनित पात्रें ।उलंडुनि नाचतो । दणणणणणण ॥या नगरीं०॥३॥पद १० वेंजीव झाला वारा । बाई ! वो ! जीव झाला वारा ।घडिमध्यें वो ! आणीं हरी ॥ध्रुवपद.॥व्याकुळ मी निशि वैरिणी वाढे । रतिपति करि शरमारा ॥घडि०॥१॥आदिनारायण वैद्य या विषयीं । औषध तोचि निवारा ॥घडि०॥२॥पद ११ वें वेडी पिशी झालें, पूर्ण निमालें ।नामसुधारस प्यालें गे बाई ! ॥ध्रुवपद.॥सद्गुरुवचनें, भेटुनि गेलें । माझें मीपण नेलें ॥गे बाई०॥१॥मस्तकिं हस्तक, ठेवुनि आपुला । आपण ऐसें केलें ॥गे बाई०॥२॥आदिनारायण, अंकित झाला । समूळ पातक गेलें ॥गे बाई०॥३॥पद १२ वें जों जों नणदियावर जीवो. ॥ध्रुवपद.॥न मानी माये ..... ..... ..... ।तों तों खळ विषय सुरतिंचा गर जीवो ॥जों जों०॥१॥प्रयत्न करी जंव न चले कांहीं ।विरहतापें विकळ पडुनि करि अरजी वो ! ॥जों जों०॥२॥आदिनारायण गाउनी भाके ।सर्वभावें राखिली शेवटीं त्याची मर्जी वो ! ॥जों जों०॥३॥पद १३ वें जय ललिते देवी ! । त्रिपुरसुंदरी ! पाहि माम् ॥ध्रुवपद.॥गिरिवरनंदिनि बाले ! । वीणारवझांझरि लोले ।ता तथैय तक तथैय धिमिकट । तथैय तथैय झेंतारि झेंतारि ॥त्रिपुर०॥१॥जय जय जगदाधारे ! । मुनिजनमनस्वात्मविचारे ! ।तातथौंग तक तथै धुमकड । तथै झेंकड् कड् झेंतारि झेंतारि ॥त्रिपुर०॥२॥आदिनारायणमात्रे ! । पद देईं पावन मात्रे ! ।वोदनतान तन दरना तन दीम् । झेंतरकिडतक् झेंतारि झेंतारि. ॥त्रिपुर०॥३॥पद १४ वें कसा करिल भवपार । हरि मज. ॥ध्रुवपद.॥तनमनधन विषयांत गुंतलेम । भजनीं आळस फार. ॥हरि०॥१॥मी एक गायक मी एक वैदिक । हाचि उठे अहंकार. ॥हरि०॥२॥खटपट करितां वायां गेलों । नाहीं केला उपकार. ॥हरि०॥३॥आदिनारायण जोडुनि पाणी । पतित करी उद्धार. ॥हरि०॥४॥पद १५ वें शिणलासि माझ्या बा ! रे ! ॥ध्रुवपद.॥पायीं अनवाणी । संगें रुकमिणी ।कांटे कर्नाटकच्या वाटे चालतांना उपवाशी. ॥शिणलासि०॥१॥अतिसकुमारा । नंदकुमारा ! ।नागर गिरिवरधारी पंढरपुरचा रहिवाशी ॥शिणलासि०॥२॥आदिनारायण । जगजीवन ।पतितपावन भक्ताकरितां ब्रीद बाळगिशी ॥शिणलासि०॥३॥पद १६ वें भज रे ! मनुज ! त्वं बालमुकुंदम् । जय परमानंदम् ॥ध्रुवपद.॥वृंदावनवासं श्रीगोविंदम् । करधृतारविंदम् ।.............................. । ...................... ।नंदनंद वृंदावनविहरण कुंदरदन सच्चित्सुखकंदम् ॥भज०॥१॥गुरुदैवतदैवत पंचमरंगम् । नववेणुतरंगम् ।वीणारवमंडल तालमृदंगम् । स्वरसंगीतांगम् ॥रागरंग भासांग शुभांगं गंगाधरवृततांडवरंगम् ॥भज०॥२॥तकताधिकता त्रिवट व्ययबंदम् । ध्रुवगीतप्रबंधम् ।गायंतं गोपकुमारीवृंदम् । रासोत्सवछेदम् ॥पदकिसलय नटनाट्यमहीतल आदिनारायणमध्यमिलिंदम् ॥भज०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP