मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
रामतनयकृत पद

रामतनयकृत पद

अनेककविकृत पदें.


श्रीगुरुचें चरणकंज हृदयीं स्मरावें ॥ध्रुवपद.॥
निखिलनिगमसाधारण सुलभाहुनि सुलभ बहु ।
इतर योगयाग विषयपथ कां धरावे ? ॥श्रीगुरु०॥१॥
नरतनु दृढ नाव इला बुडवुनि अतिमूढपणें ।
दुष्ट नष्ट कुक्कुरतनुमाजि कां फिरावें ? ॥श्रीगुरु०॥२॥
रामतनय विनवी तुज आझुनि तरी उमज समज ।
विषयवीष पिउनि तरी व्यर्थ कां मरावें ? ॥श्रीगुरु०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP