मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| शिवदिनकेसरीकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... शिवदिनकेसरीकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी शिवदिनकेसरीकृत पदें Translation - भाषांतर पद १ लेंज्ञानी विज्ञानी राजा ज्ञानदेव सद्गुरू माझा ।सबाह्याभ्यंतरीं पाहुनि पूजा रे ! गडे नो ! ॥ध्रुवपद.॥अद्वैतबोधें डोला । ज्ञानदेव ज्ञानदेव बोला ।सांडुनियां सर्व बोला फोला रे ! गडे नो ! ॥ज्ञानी०॥१॥शिवदिनी नाथ मनोहर । अलकापुरी वस्तीकर ।केसरीकृपे सर्वही सौख्य करा रे ! सावध ॥ज्ञानी०॥२॥पद २ वें विंचू झोंबला साजणी । धांवा लवकर कोणी ॥ध्रुवपद.॥विकळ होतसे मन माझें । घेउनि मीपणवोझें ।चढला उतरेना अति वोंझें । धन संपतीचें माझें ॥विंचू०॥१॥ठणका लागला विषयाचा शब्दचि बरळे वाचा ।टाहो फुटला देहबुद्धीचा । संग षड्वैर्यांचा ॥विंचू०॥२॥येती उतराया बहुजणी । मंत्र फुंकिती कानीं ।तेणें उतरेना निर्वाणीं । अधिक ठणका मनीं ॥विंचू०॥३॥गुणीं आणा गे ! लवकरी । पाणी ठेविल शिरीं ।कर्मदृष्टीच्या जिव्हारीं । जीव शिवातीतकरी ॥विंचू०॥४॥पहाणें पहावें तों अंतरीं । व्यापक चराचरीं ।विंचू उतरीं तो लवकरी । शिवदीन केसरी ॥विंचू०॥५॥पद ३ वें माझ्या लंबोदरा सुंदरा । सरसगमनउंदिरा रे ! ॥ध्रुवपद.॥पूर्णाचा गोड मोदक बरा । प्रेमभावें क्षीर लाडु करा ! सिद्धांत सिद्धांत वर्णित वेदांत । नित्य नैवेद्य परात्परा रे ! ॥माझ्या०॥१॥काय वर्णूं मी पीतांबरा रे ! । सगुण तो गुणगंभिरा ।मंगळदायक सिद्धिविनायक । सिद्धिबुद्धीच्या प्रियकरा रे ! ॥माझ्या०॥२॥गाय वत्सा करी हंबरा । तैसा तूं भक्तिसी प्रेमभरा ।प्रतापार्ककवेश्वरा । शिवदिन जीव अंतरा रे ! ॥माझ्या०॥३॥पद ४ वें म्हणजे भव तरशी भव तरशी । सुखांत फार उतरशी. ॥ध्रुवपद.॥निर्मल चित्त करावें । विठ्ठलभजनीं प्रेम धरावें ॥म्हणजे०॥१॥मारुनि संशय कपटी । आत्मस्वरूपीं मन हें लपटी ॥म्हणजे०॥२॥केसरी सद्गुरुचरणीं । शिवदिन गाळी जिवपण करूनी ॥म्हणजे०॥३॥पद ५ वें शिवमय जग सारें जग सारें । पाहें हेंचि विचारें ॥ध्रुवपद.॥शिवमय सकळ सृष्टी । पाहतां पाहणें एक दृष्टी ॥शिवमय०॥१॥प्रतिबिंबात्मक छाया । तेच ब्रह्मीं जाहली माया ॥शिवमय०॥२॥गुरु शिवदिन मी म्हणतां । आलें रामपदचि हें हाता ॥शिवमय०॥३॥पद ६ वें अवघें शिवमय कीं शिवमय कीं । लागुनि गेलें लय कीं. ॥ध्रुवपद.॥द्वैत विकल्प सडला । भवींचा अनुभवशब्द बुडाला ॥अवघें०॥१॥जिवशिव मुळपण हरला । मंगल चिदानंद हा भरला ॥अवघें०॥२॥सबाह्य शिवसुख मुद्रा । जैसें प्रळय उदक समुद्रा ॥अवघें०॥३॥शिवशिव शिवदिन गातां । सद्गुरु केसरि वचन आतां ॥अवघें०॥४॥पद ७ वें तोंवरि हळहळ रे । हळहळ रे ! । नाहीं भक्तीबळ रे ! ॥ध्रुवपद.॥उदंड करितो कर्मे । चुकला ब्रह्मार्पण निज वर्में ॥तोंवरि०॥१॥विवेक जागा करिना । जोंवरि शांती दृढ जीवीं धरिना ॥तोंवरि०॥२॥सकळहि विद्या जाणे । आत्मा व्यापक जोंवरि नेणे ॥तोंवरि०॥३॥शिवदिन केसरि पायीं । जंववरि शरण रिघाला नाहीं ॥तोंवरि०॥४॥पद ८ वें तो भला रे ! भला भला ।प्रपंच साधुनि परमार्थाचा लाभ ज्याणें केला ॥ध्रुवपद.॥मातापिता गणगोत बायको । आपण नामरूपांत ना, यको । श्रवणीं वेद पुराण आयको । गर्व जयाचा गेला ॥तो भला०॥१॥संतति संपति पुष्कळ भारी । चतुर्विद्येचा कारभारी ।परमार्थाची ध्वजा उभारी । संशय ज्याचा गेला ॥तो भला०॥२॥अंतरिं ज्ञान विरक्ति धरितो । बाहरि सोंगसंपादणि करितो ।जिवें जीतें मोक्षासि वरितो । भक्तिसि फार भुकेला ॥तो भला०॥३॥भजन पूजन सत्पात्रीं जाणे । शिवदिन याविण कांहिंच नेणे ।नादें उद्बोधार्थ सुखानें । केसरि गुरुचा चेला ॥तो भला०॥४॥पद ९ वें धन्य तुकोबा कीं बा ! तुकोबा कीं । तुका उतरला तुकीं ॥ध्रुवपद.॥कीर्तनीं टाळ धरी । मागें नृत्य करितो हरी ॥धन्य०॥१॥अभंगाचे कागद रक्षी । उदकीं देव तयाचा पक्षी ॥धन्य०॥२॥शीतळ केलें पाणी । माजि प्रकटे चक्रपाणी ॥धन्य०॥३॥अवस्थ देहाचि तनू । ब्रह्म झाला ज्याचा धेनू ॥धन्य०॥४॥केसरिगुरु अवतारीं । शिवदिन श्रवणमात्रें तारी ॥धन्य०॥५॥पद १० वें जैसें ज्याणें केलें तैसें त्याला फळ झालें ।ऐसें अनुभवासि आलें । यांत आमुचें काय गेलें ? ॥ध्रुवपद.॥चोर जार रांड पोरें । निंदा द्वेषी चहाडखोरं ।त्यांला बांधुनि यमदूतांनिं अघोर नरका नेलें ॥यांत०॥१॥काळ व्याळ हा विक्राळ । डंखूं पाहे सर्वकाळ ।त्याचें भय सांडुनियां मूर्खांनीं स्वहित टोलाविलें ॥यांत०॥२॥भक्त विरक्त योगी संत । सिद्ध ज्ञानी जीवन्मुक्त ।त्यांची सेवा करुनि देवें वैकुंठासि नेलें ॥यांत०॥३॥अर्थ स्वार्थ साधनअर्थ । केसरि शिवदिन गुरुपरमार्थ ।गुरुभक्तांचे गुरुभक्तीनें । जन्ममरण चुकविलें ॥यांत०॥४॥पद ११ वें उगाचि कां उडशी बा ! कां उडशी । आग्रहडोहीं बुडशी ॥ध्रुवपद.॥रक्तमांस कीं हाडें । यांत सोंवळें न दिसे गाढें ॥उगाचि०॥१॥शिरा नाडि चर्माचा । पुतळा द्वैतसंग कर्माचा ॥उगाचि०॥२॥क्रोध काम गुण वृत्ती । विटाळ नामरूप प्रवृत्ती ॥उगाचि०॥३॥संशय अंतरिं वागे । मीपण घातक पातक जागे ॥उगाचि०॥४॥शिवदिन केसरिपाया । वांचुनि, दंभ सोंवळें वांयां ॥उगाचि०॥५॥पद १२ वें भाव धरा रे ! । आपुलासा देवा करा रे ! ॥ध्रुवपद.॥कोणी काय म्हणो यासाठीं । बळकट प्रेम असावें गांठीं ।निंदा स्तुतीवर लावुनि कांटी । मी तूं हरा रे ! ॥आपुला०॥१॥सकाम साधन सर्वहि सांडा । निष्कामें मुळभजनीं भांडा ।नाना कुतर्क वृत्तिसि दवडा । आलि जरा रे ! ॥आपुला०॥२॥दुर्लभ नरदेहाची प्राप्ती । पुन्हा न मिळे हा कल्पांतीं ।ऐसा विवेक जाणुनि चित्तीं । गुरुसि वरा रे ! ॥आपुला०॥३॥केसरिनाथ गुरूचे पायीं । सृष्टि आजि बुडाली पाहीं ।शिवदिनिं निश्चय दुसरा नाहीं । भक्त खरा रे ! ॥आपुला०॥४॥पद १३ वें बाइल पैशाची बा ! पैशाची । विरळागत पुरुषाची ॥ध्रुवपद.॥धन कनकांतर गांठीं । त्याला समान सांगे गोष्टी ॥बाइल०॥१॥नेसवि साडी लुगडीं । त्यांसीं लांवी लाडीगोडी ॥बाइल०॥२॥भ्रतार वेडा पीसा । त्यासी नित्य करी कर्कशा ॥बाइल०॥३॥शिवदिन गुरुचे पायीं । पैशावीण कांहींच नाहीं ॥बाइल०॥४॥पद १४ वें भलारे भला, पंढरिच्या पाटला विठो ! तूं धांव गड्या ! ॥ध्रुवपद.॥मायानदी हे तरवेना । धिर कांहीं धरवेना ।मोहें वाहावलों, उमजेना । हित कांहीं समजेना ॥भरल्या दोन्हि थड्या । थड्या थड्या ॥पंढरिच्या०॥१॥अहंकाराच्या लाटेनें । चुकलों मी वाटेनें ।आतां कोण म्हणे, नेटानें । येईं या वाटेनें ॥गवसला पानबुड्या । बुड्या बुड्या ॥पंढरिच्या०॥२॥क्रोधें शरीर हें, व्यापीलें । मदमत्सरें दाटलें ।भ्रमजळडोहांत, बुडविलें । ममतेसीं गोंविलें ॥येथुनि काढिं मला । मला मला ॥पंढरिच्या०॥३॥सुंदर गोपिका, भुलविसी । कुंजवनाप्रति नेसी ।काळे घोंगडिला, पांघुरसी । बिदोबिदीं हिंडसी ॥मारिसि काय उड्या । उड्या उड्या ॥पंढरिच्या०॥४॥कोठें गुंतलासी, जेवाया । पक्कान्नें सेवाया ।होतों मी कष्टी, देवराया । संकट उगवा, या ? ॥खाशिल काय वड्या । वड्या वड्या ॥पंढरिच्या०॥५॥वडजा वाकड्या, तूं येसी । चोरि कराया जासी ।दहिं दुध घृत लोणी, तूं खासी । गोरस सकळां देसी ॥लाविसि काय शिड्या । शिड्या शिड्या ॥पंढरिच्या०॥६॥यमुनाजळ नेती व्रजनारी । घेउनियां घावरी । त्यांला गांठीसि, कंसारी । बोलसि नानापरी ॥मारिसि काय खड्या । खड्या खड्या ॥पंढरिच्या०॥७॥साही सावजें, बुडवीती । खोल भवार्णविं नेती ।आशा सर्पिणी, धांवती । पायां गुंडाळिती ॥सत्वर टाकिं उड्य़ा । उड्या उड्या ॥पंढरिच्या०॥८॥साधू संत तुला मिरविती । वाजंत्रें वाजती ।बहुतां प्रकारें शोभविती । चामरें ढाळिती ॥घालिति पायघड्या । घड्या घड्या ॥पंढरिच्या०॥९॥राईरुक्मिणीच्या सुखसदनीं । खदखद हांससि वदनीं ।प्रेमें सुखविशी निजरजनीं । वारा वारिती विंजणी ॥खाशिल काय विड्या । विड्या विड्या ॥पंढरिच्या०॥१०॥अरुणभेंडिचा सांवता । आवडे तुज भगवंता ।भाजी उपडीशी श्रीमंता । सकळ कला गुणवंता ॥बांधिसि काय जुड्या । जुड्या जुड्या ॥पंढरिच्या०॥११॥तुकारामाच्या शेतातें । गोफण घेउनि हातें ।उभा राहसी माळ्यावरुतें । भवतालें पाहात ॥उडविसी काय चिड्या । चिड्या चिड्या ॥पंढरिच्या०॥१२॥बहिण द्रौपदी गांजिली । सभेमाजि आणिली ।सत्वर धांवली मावली । लज्जा त्वां रक्षिली ॥पुरविसि वस्त्र घड्या । घड्या घड्या ॥पंढरिच्या०॥१३॥धर्मराजाच्या सदनातें । दुर्वास आला तेथें ।घाली भोजन बहूत । धोत्रें ढिलावत ॥लोळति गडबडां । बडां बडां ॥पंढरिच्या०॥१४॥चोखामेळा हा तुझा भक्त । नेउनि राउळांत ।चारी प्रहर अहोरात । सांगसि सक वृत्तांत ॥पावसि काय गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१५॥एकनाथाचे भक्तीसी द्वारकेहोनि येसी बहुताप्रकारें राबसी । गंध उगाळिसी ॥होसील कावड्या । वड्या वड्या ॥पंढरिच्या०॥१६॥दामाजीपंताचा महार होसी । वेदरनगरा जासी ।रसद भरोनियां यवनासी । परतोनि पंढरि येसी ॥अवघड काजा गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१७॥गुप्त केली कानुपात्रेला । अजामेळ तारिला ।पशू गजेंद्र उद्धरिला । माझे वेळे कोठें गेला ॥पहासि काय गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥१८॥धामणगांविंचा बोधला । भक्तीसी गोंवला । त्याचे धांवसी कष्टाला । शेताचे कामाला ॥बांधिसि काय मुड्या । मुड्या मुड्या ॥पंढरिच्या०॥१९॥जनिच्या स्मरणें तूं धांवसी । नाना कार्यें करिसी ।झाडिसि आंगणें उपवासी । सज्जनहृदयनिवासी ॥घालिसि काय झड्या । झड्या झड्या ॥पंढरिच्या०॥२०॥चिंता मनाची हरवावी । अहंकृति जिरवावी ।आशा मनशा हे पुरवावी । भक्तिसुखें कसवावी ॥होसिल काय पड्या । पड्या पड्या ॥पंढरिच्या०॥२१॥शिवदिन केसरी तुज ध्यातो । अखंड वदनीं गातो ।अक्षय भाट मी तुज बाहातों । थक्कित वाट पाहातों ॥लवकर धांव गड्या । गड्या गड्या ॥पंढरिच्या०॥२२॥पद १५ वें सद्गुरु मार्तंडा मार्तंडा । विवेक झळके खंडा ॥ध्रुवपद.॥औट हात जेजोरी । आत्मा नांदतो मल्हारी ॥सद्गुरु०॥१॥चौदा विद्येचा भूगोळ । त्रिकुटी करीतसे गोंधळ ॥सद्गुरु०॥२॥नव बोधाची दिवटी । तेणें चिन्मय भासे सृष्टी ॥सद्गुरु०॥३॥ज्ञानकोट बा ! करीं । दे मज नामाची वारी ॥सद्गुरु०॥४॥केसरिनाथ गुरु अवघा । शिवदिन म्हणे मी झालों वाघा ॥सद्गुरु०॥५॥पद १६ वें दैवें नरतनु सांपडली । मूढा ! तुज कां भूल पडली ? ॥ध्रुवपद.॥अमोल्य आयुष्य जातें रे ! । कां करितोसी मातेरे ? ॥दैवें०॥१॥मोहमदें तुम्हीं कां भुललां । काळ व्याळ गिळि तुजला ॥दैवें०॥२॥शिवदिन सांगे मृदुवचनें । सावध होईं श्रुतिवचनें ॥दैवें०॥३॥पद १७ वें तोंवरि सुख नाहीं सुख नाहीं । सत्य सांगतों पाहीं ॥ध्रुवपद.॥विषयकामना बाधीं । तेथें कैंची होय समाधी ॥तोंवरि०॥१॥संता शरण रिघेना भावें । तोंवरि मुक्ति कधीं त्या नोहे ॥तोंवरि०॥२॥भूतदया नाहीं ज्याला । शिवदिन काय करील तयाला ॥तोंवरि०॥३॥पद १८ वें इतुकें दे मजला दे मजला । मागतसें हरि ! तुजला ॥ध्रुवपद.॥संतसमागम अर्चा । सारासार ज्ञानचर्चा ॥इतुकें०॥१॥भगवद्भजनीं जागो । मन हें तुझ्या स्वरूपीं लागो ॥इतुकें०॥२॥असेंचि वैभव देईं । शिवदिन केसरि गुरुचे पायीं ॥इतुकें०॥३॥पद १९ वें आतां मी नाहीं मी नाहीं । नरहरिवांचुनि कांहीं ॥ध्रुवपद.॥अनुभव पाउलवाटे । जिविचें जीवन नरहरि भेटे ॥आतां०॥१॥प्रथमच अवघा सरला । दोहीं डोळां नरहरि भरला ॥आतां०॥२॥सच्चिद्ग्रंथ सुधारा । नरहरिविरहित काय पसारा ॥आतां०॥३॥शिवदिन जिवपण नेलें । गुरुनें नरहरि केलें ॥आतां०॥४॥पद २० वें भज सीताराम मूर्ति आवडे मजला पुरती ।नयनीं पहातां मन हें उन्मन विसरे कीजे स्फुरती ॥ध्रुवपद.॥नवविधभक्ती नवलाभाची रामायण गुणकीर्ती ।वाचे त्याची ध्वजा लाविली मोक्षकळसावरती ॥भज०॥१॥चाप बाण करि ठाण चांगलें लीलानाट्कधर्ती ।वाल्मीकादिक पतीत नामें स्मरणें हे उद्धरती ॥भज०॥२॥लिंगदेहलंकाराक्षस किं कामक्रोध संहरती ।महाकारणें शुद्ध सात्विकी राजा अयोध्याकीर्ती ॥भज०॥३॥लक्षुमणाचे अनुसंधानें शिवदिन जीवपण हरती ।केसरिभाळीं टिळा लाविला राजा चक्रवर्ती ॥भज०॥४॥पद २१ वें तो एक निजयोगी निजयोगी । परद्वार स्वयें भोगी ॥ ध्रुवपद.॥अनामिका घरिं राहे । याती अविंध झाला पाहे ॥तो एक०॥१॥ गोवध ज्याला घडला । नित्य सुरापान जो प्याला ॥तो एक०॥२॥स्त्रीहत्या ज्या घडली । शेखीं सुवर्णचोरी केली ॥तो एक०॥३॥केसरि गुरु उद्बोध । हृदयीं नांदे परमानंद ॥तो एक०॥४॥पद २२ वें माझी देवपुजा देवपुजा । पाय तुझे गुरुराजा ॥ध्रुवपद.॥गुरुचरणाची माती । तेच माझी भागिरथी ॥माझी०॥१॥गुरुचरणाचा बिंदूं । तोचि माझा क्षीरसिंधू ॥माझी०॥२॥गुरुचरणाचें ध्यान । तेंचि माझें संध्यास्नान ॥माझी०॥३॥शिवदिन केसरिपायीं । सद्गुरुवांचुनि दैवत नाहीं. ॥माझी०॥४॥पद २३ वें तो नयनांत वसेल जेव्हां । जग गुरुब्रह्म दिसेल तेव्हां ॥ध्रुवपद.॥प्रकृति आकृति कर्मक्रियेचा । साक्षी मुळांत वसेल जेव्हां ॥जग०॥१॥सांगितली खुण वेदश्रुतीनें । विश्व हृदयांत ठसेल जेव्हां ॥जग०॥२॥शिवदिन केसरी सद्गुरु साहेब । भिन्न कदापि नसेल जेव्हां ॥जग०॥३॥पद २४ वें मनमूषकासनिं बैसोनि यावें । क्षेम आलिंगन मजला द्यावें. ॥ध्रुवपद.॥आणिक कांहिं न मागें तुजला । मीपण माझें विलया न्यावें ॥मन०॥१॥एकाक्षरी बीज स्मरतां स्मरणीं । व्यापकदर्शन डोळां व्हावें ॥मन०॥२॥केसरीनाथ गुरुपणराजा । शिवदिन दूर्वादळ शिरीं घ्यावें ॥मन०॥३॥पद २५ वें ह्मणजे देव तुह्मी देव तुह्मीं । सरलें अवघें तूं मी ॥ध्रुवपद.॥प्रवृत्ति अवघी सांडा । निवृत्ति गाळुनि भजना मांडा ॥ह्मणजे०॥१॥विसरुनि तत्वें सांडा । स्फुरण ब्रह्मांडींचें काढा ॥ह्मणजे०॥२॥स्वात्मसुखाची खोली । समजुनि बोला निशब्द बोली ॥ह्मणजे०॥३॥सबाह्य अंतरिं कांहीं । अनुभविं दुसरें उरलें नाहीं ॥ह्मणजे०॥४॥शिवदिनजिवपण आळा । आज्ञा केसरि गुरुची पाळा ॥ह्मणजे०॥५॥पद २६ वें किन बैरीनें बइर कियो री । साजनकू बहिराग दियो री ॥ध्रुवपद.॥पेहरी जो मुद्रा भस्म चढायो । कानमो कुंडल अलख जगायो ॥किन०॥१॥खांदे जो पावरि हातमो झोली । गल बिच निर्गुन माला सैली ॥किन०॥२॥शिवदिन मनोहर केसरि प्यारा । अलख खलख सब जोति उजारा ॥किन०॥३॥पद २७ वें किसीका कोन संगाती । बाबा ॥ध्रुवपद.॥अकेलाही आवे अकेलाही जावे । हात हुजुरकी पाती ॥बाबा०॥१॥तन मन धन जो गर्बहि मतकर । कहत पुरानकी पोथी ॥बाबा०॥२॥मात तात जोरू लटका घर । होय मसानकि माती ॥बाबा०॥३॥शिवदिनके प्रभु केसरि साहेब । देख दिलभर साथी ॥बाबा०॥४॥पद २८ वें सोई कच्चा बे कच्चा बे । नही गुरुका बच्चा ॥ध्रुवपद.॥दुनिया तजकर खाक लगाई जाकर बैठा बनमो ।खेचरि मुद्रा इंद्रियनिग्रह ध्यान धरत है मनमो ॥सोई०॥१॥कुंदलियाको खूब चढावे ब्रह्मरंध्रको ल्यावे ।चलता है पानीके ऊपर जो बोले सो होवे ॥सोई०॥२॥गुप्त होकर परगट होवे मथुरा गोकुलवासी ।प्राणनिकार सिद्ध जो होवे सत्यलोकका बासी ॥सोई०॥३॥वेदशास्त्रमें कछू नही रहा पूर्ण ज्ञानको पाया ।बेदविधीका मार्ग चलके तनका लकडा किया ॥सोई०॥४॥शिवदिनके प्रभु केसरि साहिब करनी कथनी रहनी ।आपहिमध्ये आपको चीन्हे वोही है गुरुज्ञानी ॥सोई०॥५॥पद २९ वें आदेस कहनाजी कहनाजी । आदिपुरुष लखनाजी ॥ध्रुवपद.॥सिरपर टोपी कानोंमे कुंडल गले रुद्राक्षमाला ।तिलक भालपर चंद्रकोर है श्यामसुंदरका टिकला ॥आदेस०॥१॥सेली सिंनी पुंगी तुंबी और बभूतको गोला ।अनुहत किन्नर नाद सुनावे अलख निरंजन भोला ॥आदेस०॥२॥बैरागोंका लिया लंगोटा पंथ चलावे उलटा ।तत्त्वबोधका प्याला पावे गगनमगनमें लपटा ॥आदेस०॥३॥निरगुन केसरिनाथ कृपाघन शिवदिन हरिका साई ।घटमट नितबित प्रकाश गेहे रामकर दिखावे वाही ॥आदेस०॥४॥पद ३० वें दो दिन तुम भलाई कर रे ! । अखर तेरी मरमर रे ! ॥ध्रुवपद.॥सुपनासी जिंजगानी जानी । दौलत झूटी भरभर रे ! ॥दो दिन०॥१॥आतमग्यान बिन मुगत न कोई । जमका पेट डरडर रे ! ॥दो दिन०॥२॥कुटुंबकबीला साथ न जावे । छांड बुराई करकर रे ! ॥दो दिन०॥३॥शिवदिन प्रभुको साहेबके । चरन सुभाव धरधर रे ! ॥दो दिन०॥४॥पद ३१ वें रंडी दुर करना दुर करना । ध्यान गुरूका रखना ॥ध्रुवपद.॥जबलग हातमे हुवेगा रुका । तबलग रंडि कहे मेरा सका ॥रंडी०॥१॥रंडी प्रीति लगावे खाशी । आखर दिलावेगि फांशी ॥रंडी०॥२॥शिवदिन केसरि प्यारे । कामिककुं पैजार रंडी मारे ॥रंडी०॥३॥पद ३२ वें हम फकीर जनमके उदारी निरंजनवासी ॥ध्रुवपद.॥सत्तकि भिछा दे मेरे माई मनका आटा भरपूर ।बारबार हम नहि आनेके हरदम हार खुसी ॥हम फकीर०॥१॥सोना रूपा अधेला पैसा ओं कुच हम ना चाहे ।प्रेमकि भिछा लाव मेरे माई हम पंची परदेसी ॥हम फकीर०॥२॥सीरफोड जलाली करते मगन हार वो न्यारे ।शिवदिनके प्रभू केसरिसाहेब चरनोके रहिवासी ॥हम फकीर०॥३॥पद ३३ वें मन रे ! नारायन साथि करना । किस खातर डरना ॥ध्रुवपद.॥बिकट संकटसें भाग छुपाई । आजब नरदेही ।सोही काळनें आदी खाई । गाफल क्यौं रे ! भाई ॥मन रे!०॥१॥आवई हुईसो खबरधर । मेरा मई दुरकर ।झुटी माया सों न्यारा होकर । दुसतर भवजल तरना ॥मन रे!०॥२॥साच सबदमो केसरि सारा । शिवदिनका प्यारा ।नयनो भरपुर देखन सारा । दिनरईन उजाला ॥मन रे !०॥३॥पद ३४ वें हजरत अल्ला । सबदुनियापालनवाला ॥ध्रुवपद.॥जिसका असमान है एक तंबू । धरती जाजम, पवना खंबू ।उपर गाडा है गंबू । हरदम अल्ला ॥सब०॥१॥चंद्र सूरज दोनो चिराखी । नव दरवाजे दसवी खिडकी ।उप्पर रखि है एक फिरकी । सब घट अल्ला ॥सब०॥२॥सात समुंदर खंदक खोली । मोहबतका दरवाजा मोली ।अबोल बोलत मीठी बोली । सबरस अल्ला ॥सब०॥३॥साई केसरि गुरु पिरसारा । शिवदिन नाम मुरीद हि तारा ।झगमग जागत ज्योत हिजारा । लाल हिलाला ॥सब०॥४॥पद ३५ वें आल्लख जागे । गुरुजी आल्लख जागे ॥ध्रुवपद.॥उलट्पालटमोद अर्सन गाढा । रूपरेखबिन पुरूख ठाडा ।चंद्रसुरजबिन तेज उघाडा । कर्मशून्यका मूल उघाडा ॥आल्लख०॥१॥समाधिलागीं सहजासहजी । अनुहत सिंगी बाजत बाजा ।उन्मनिसंगें सो मन रीझ्या । जाहा ताहा नहि आपबिन दुजा ॥आल्लख०॥२॥चतुर्दल षडदल दशदल उलटा । द्वादशदल षोडशदल फांटा ।द्विदलपर किया चपेटा । तब सहस्रदल भौरा पैठा ॥आल्लख०॥३॥अजरामर पद केसरि गुरुका । पाया शिवदिन आदि अंतका ।अमृत पीया अर्धचंद्रका । धोका नहि अब जनममरनका ॥आल्लख०॥४॥पद ३६ वें यारो पेट बडा बांका । सबसे लगा दिया ठोका ॥ध्रुवपद.॥देख सन्यासी देख फकीरा घर घर मागे टूका ।एक आसनपर क्या बैठेगा पीछे काळ डंका ॥यारो०॥१॥ईस पेठसें चार छिनाला ईस पेटसें पैदा ।ईस पेठसें ढोंग धतूरा किया पेटने पैदा ॥यारो०॥२॥ईस पेटसें राव शिपाई राजा परजा मरते ।ईस पेटसें अमीरउमराव मुलुक मुलुकपर फिरते ॥यारो०॥३॥शिवदिन कहे मन जग बैठे नही पेटसें न्यारे ।गरिबबिरे पसू पछि सोई सबही पेटने घेरे ॥यारो०॥४॥पद ३७ वें जडाव कोंदनका कोंदनका । बनाव सच्चिद्धनका ॥ध्रुवपद.॥लाल सफेत वर काला । उपर चमके उन्मनि बाला ॥जडाव०॥१॥निगा लगी आलखमो । झगमग झनत्कार झलकमो ॥जडाव०॥२॥केसरि गुरु कांचनमो । शिवदिन जडा गया कोंदनमो ॥जडाव०॥३॥पद ३८ वें बाबा ! उमर गमाई रे ! । भाई भगति न पाई रे ! ॥ध्रुवपद.॥झुटी संगत कछु नहि बाबा ! । साहेब साथी करना ।जैसा आना वैसा जाना । नही दीन पछाना ॥बाबा!०॥१॥चांद सुरज और तारे झळकें । बिजली भाव बतावे ।ठोक न नेमे चूक पडी तब काया खाक मिलावे ॥बाबा!०॥२॥मातापिता जोरू लरके सबही झूटा खेला ।नैनन आरसा देख दिवाने कर साहेब सो मेहेरा ॥बाबा!०॥३॥दिलका आइना दिलमे देख सब घट जात जगावे ।साहेब केसरिनाथ जगावे नारायन सों भावे ॥बाबा!०॥४॥पद ३९ वें उसपर बल जैये बल जैये । प्रेम प्रीतिसें रहिये ॥ध्रुवपद.॥अलखपलखमो सारा । सब घट देखे साई हमारा ॥उस०॥१॥अजपाजप करता है । कर बिन मन मनका फिरता है ॥उस०॥२॥आसक केसरि घरका । शिवदिन बंदा उसके घरका ॥उस०॥३॥पद ४० वें सो येक धन मेरी । धन मेरी निर्गुनसागरलहरी. ॥ध्रुवपद.॥भोजनके जब माता । जैसी लोभ करे निजपूता ॥सो०॥१॥सेज पलंगपर सोवे । जैसी रंभा होके भावे ॥सो०॥२॥नीच कामपर दासी । नेमधर्मकुं नहि उदाई ॥सो०॥३॥केशरी गुरुकी चेली । शिवदिन जेर आवे गाली ॥सो०॥४॥पद ४१ वें उसपर वारि जाऊ रे ! उनके पायां लागूं रे ! ॥ध्रुवपद.॥नव दरबाजे दसवी खिरकी । ऊपर है येक फिरकी ।बिरला साधो कोई एक जाने । लेकर मनकी गिरकी ॥उस०॥१॥दोनों नयन उलटे मारूं । सब घट मेरे सांई ।निंदा स्तुति कछु नहि जाने । वोही लाल गुसांई ॥उस०॥२॥शिवदिनके प्रभु केसरि साहेब । अगमनिगमका राजा ।अनुहत डंका निसदिन बाजे । बाजत तनका बाजा ॥उस०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP