मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें|
भुजंगनाथकृत पदें

भुजंगनाथकृत पदें

अनेककविकृत पदें.


पद १ लें
सांब सांब सांब सांब वद वद वद वद रसने ! ॥ध्रुवपद.॥
विश्वेशा बद्रिनाथ महाकाळ सोमनाथ ।
ॐकारा घुश्मेश्वर त्र्यंबकेश मृडशुलि जगदंब दंब दंब दंब ॥वद०॥१॥
भीमाशंकर महेश वैजनाथ नागेश ।
रामेश्वर मल्लेश द्वादशलिंगादि करुन अंब अंब अंब अंब ॥वद०॥२॥
अनुदिनिं सत्संग धरुनि......................।
रंगिं रंगला भुजंगनाथ नमुनि हर हर हर हर हर हर ॥वद०॥३॥

पद २ रें
काय गुण वर्णूं सखये ! ऐसी सद्गुरु माउली ।
एकाएकीं वृत्ती कैसी स्वरूपीं सामावली ॥ध्रुवपद.॥
जागृती स्वप्न सुषुप्ती । तुरियेनें नेउनि एकांतीं ।
त्रिवेणि तरोनि तैसी उन्मनि विसावली ॥काय०॥१॥
जागत जागत जागी झालें । अपणा आपे विसरलें ।
मागील कौतुक सकळ माव ऐसि कळली ॥काय०॥२॥
उपरती समरती............... । साधूसम रतले ।
चिन्मय आपण येचि स्थिती कांहीं नाहीं उरलें ॥काय०॥३॥
देऊनि सत्संगीं भाव । संतसंगतीचें नांव ।
दाखवी निजपदीं ठेव करुनि कृपा साउली ॥काय०॥४॥
नाथ भुजंगाचा सुत । सदाहि चरणीं रत ।
पाजवित अर्धचंद्रामृतरस गाउली ॥काय०॥५॥

पद ३ रें
विठ्ठल मम प्राणसखा । जिविचें जिवन भेटेल कैं ? ॥ध्रुवपद.॥
पुंडलीक राइ रखुमाइ । श्रवण मनन ठायीं ठायीं ।
तुळसिमाळ प्रेमबुका दाटेल कैं ? ॥विठ्ठल०॥१॥
नेत्रकमळदळ विशाळ । भाळिं बुका तुळसिमाळ ।
कवळुनी तनुसि तनु भेटेल कैं ? ॥विठ्ठल०॥२॥
भीमातटिं निकट निपट । कटिं कर ठेवूनि उभा ।
इटेवरी समचरण नमुन भेटेल कैं ? ॥विठ्ठल०॥३॥
श्रीहरी भुजंगनाथ । रंगिं भरुनि रंगनाथ ।
जन्ममरण पुन्हा खत फाटेल कैं ? ॥विठ्ठल०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 17, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP