मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| श्रीधरस्वामीकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... श्रीधरस्वामीकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी श्रीधरस्वामीकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें हरहर नाम बोल आतां वाचे । प्राणिया ! ॥ध्रुवपद.॥प्राणी उपजोनी संसारीं । अर्चन शिवाचें जो न करी ।तो ह्या संसारसागरीं । पडिला आवर्तांमाजी ॥प्राणिया०॥१॥करितां शिवनाम उच्चार । महापापा होय संहार ।मुक्ति येउनि राखे द्वार । प्राण्या अखंड भक्ताचें ॥प्राणिया०॥२॥सकळहि देवांचाहि देव । म्हणूनि नाम महादेव ।नाम गाय स्वयमेव । शिवरूप होईल साचें ॥प्राणिया०॥३॥जय शिवनामाचा छंद । तया प्रसन्न ब्रह्मानंद ।श्रीधरस्वामीचे निजछंद । सार्थक करील जन्माचें ॥प्राणिया०॥४॥पद २ रें तो हरि असतां कां करुं चिंता ? ॥ध्रुवपद.॥शुक कोणीं केले हिरवे रे ! । मोर विचित्रही ते बरवे रे ! ।हंस धवल कोणा करवे रे ! । अत्याश्चर्यसा मिरवे रे ! ॥तो०॥१॥अन्न जिरे आणि गर्भ तो वाढे । अग्निवरी उदकाचीं झाडें ।पाहातां येकयेकेक निवाडें । ख्याति असीच असंख्य पवाडे ॥तो०॥२॥आकाशा अवकाश जयाचा । परमाणूंतही वास जयाचा ।अक्रिय, नित्य, सबाह्य दयेचा । निधि, श्रीधर शुभ गुण उदयाचा ॥तो०॥३॥पद ३ रें सखया रामा ! विश्रांति तुझिये नामीं ।म्हणउनि मजला ने त्वरें निजसुखधामीं ॥ध्रुवपद.॥अवचट सुकृतें नरदेहा झाली भेटी ।पशुसुतजायाधनधामीं प्रीती मोठी ।माझीं माझीं म्हणुनी म्यां धरिलीं पोटीं ।यांच्या संगें भोगिल्या दुःखकोटी ॥सखया०॥१॥सोडुनि स्वहिता धांवलों दिशा दाही ।शववत झालों मागुता कौतुक पाहीं ।परि खळजन हे नेदिती कवडी तेही ।परि हे आशा पापिणी लाजत नाहीं ॥सखया०॥२॥जंववरि दृढता तंववरि या तनुची प्रीती ।जर्जर झाल्या निंदक हे अवघे होती ।यांचीं दुःखें तुजला मी सांगूं किती ।म्हणउनि येतो श्रीधर काकूळती ॥सखया०॥४॥पद ४ थें पूर्णब्रह्म होय रे ! । वर्णूं आतां काय रे ! ।नंद ज्याचा तात जाणा यशोदा ते माय रे ! ॥ध्रुवपद.॥ब्रह्मांडाच्या कोटी रे ! सांठवियेल्या पोटीं रे ! ।यशोदा त्या घेऊनीयां पाजि दुधाची वाटी रे ! ॥पूर्ण०॥१॥ब्रह्म निर्विकार रे ! । नाहीं ज्या आकार रे ! ।गौळीयांचे घरीं तोचि दिसतो साकार रे ! ॥पूर्ण०॥२॥क्षीरसिंधूवासी रे ! । लक्ष्मी ज्याची दासी रे ! ।अर्जुनाचीं घोडीं धूतां लाज नाहीं त्यासी रे ! ॥पूर्ण०॥३॥पूर्णब्रह्मानंद रे ! । सर्वसुखाचा कंद रे ! ।श्रीधरस्वामीलागीं हाची लागलासे छंद रे ! ॥पूर्ण०॥४॥पद ५ वें भज भज गोपालम् । गोपीगोकुलपालम् ॥ध्रुवपद.॥कंठविलंबितनववनमालम् । तनुरुचिविजिततमालम् ॥गोपी०॥१॥करधृतमुरलीवादनलोलम् । मृगमदतिलकितभालम् ॥गोपी०॥२॥मणिमयकुंडलरुचिरकपोलम् । श्रीधरपालनशीलम् ॥गोपी०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 17, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP