मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| आत्मारामकविकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... आत्मारामकविकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी आत्मारामकविकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें जे (जय?) शिवसांब त्रिपुरारी । असा तारक ना संसारीं. ॥ध्रुवपद.॥धरीं सत्संग, त्यजीं दुःसंग, करीं अघभंग, गा तूं रे ! ।कृपानिधीसा तो जाणोनी व .......संकटास तो हारी ॥जे शिव०॥१॥धरीं विश्वास, करीं भवनाश, असे अविनाश, जगीं बा रे ! ।किती अवतार घेउनी सदा दासांशि तो तारी ॥जे शिव०॥२॥धरी शिरिं गंग, भूषण भुजंग, पदीं मन भंग, हो तूं रे ! ।जगीं आत्माराम भावुनि.........म संकटाशि तो वारी ॥जे शिव०॥३॥पद २ रें सखया ! येईं उदारा रे ! । आजि नंदकुमारा रे ! ॥ध्रुवपद.॥सदया ! तुझि हे कीर्ति पुराणीं । यमुनातीरविहारा रे ! ॥सखया०॥१॥कालियफणिवर नाचे मनोहर । पदद्वय दावीं सुकुमारा रे ! ॥सखया०॥२॥आत्मारामा मनविश्रामा ललितलीलाचि अपारा रे ! ॥सखया०॥३॥पद ३ रें सुखकर साधूसंग । प्राण्या ! ॥ध्रुवपद.॥क्षणभंगुर तनु जाणुनि हरिगुणीं । श्रवणीं कीर्तनीं रंग ॥प्राण्या०॥१॥जाइजणें हें सर्वहि जाइल । रथगजधेनुतुरंग ॥प्राण्या०॥२॥वस्त्रें भूषणें कैंचीं अंतीं । कोठें छपरपलंग ? ॥प्राण्या०॥३॥आत्मारामबोध ठसावुनी । दृढतर राहें अभंग ॥प्राण्या०॥४॥पद ४ थें नको छंद घेऊं कृष्णा ! आला रे ! बागुलबाबा ॥ध्रुवपद.॥दशभुज पंचमुख माथां मोठा जटाभार ।गजचर्म पांघुरला कटीं वेष्टी व्याघ्रांबर ।विभूति चर्चिली आंगीं नीलकंठ दिगंबर ।त्रिलोचन उग्ररूपी भयंकर आबाबाबा ॥नको०॥१॥घरधनी येतिल आतां भोजना सत्वर घरीं ।पाकनिष्पत्ति जे त्वरें केलि पाहिजे कीं बरी ।जिलिबि दळ्या मांडे लाडू दुधपाक शिरापुरी ।ताताचिया ताटीं जेवीं संगीं बैसोनीयां बाबा ॥नको०॥२॥उगा राहें नाहीं तरी बोलावित्यें बागुलाला ।येईं रे ! बागुला ! ह्मणतां गौरीवर द्वारीं आला ।डुगु डुगु डमरू शिंगीनाद आंगणांत केला ।आरूढला नंदीवर अर्धांगी ते जगदंबा ॥नको०॥३॥कृष्णासी तैं घेउनि कडिये यशोमती द्वारीं आली ।होईल जोग्याची दृष्टी बाळासी ह्मणऊनि भ्याली ।लपविला कृष्ण अचळ वस्त्र मुखावरती घाली ।भिईल कीं उग्ररूपा देखोनी लावण्यगाभा ॥नको०॥४॥जोगी ह्मणे कां हो ! बहु रुदतो हा तूझा बाळ ।दृष्टी झाली यासी ह्मणुनी घेत असे बहु आळ ।विभूति घेउनी हस्तीं मंत्रितसे पशुपाळ ।लावुनियां भाळीं कृष्णा म्हणे रुदतोसि कां बा ! ॥नको०॥५॥तदा बहु हर्षे हास्य केलें बालमुकुंदानें ।यशोदाही वोसंडली संतोषली आनंदानें ।जोगीयासीं पूजीयेला प्रीतिभावें बहुमानें ।म्हणे माझ्या बाळा देईं दर्शन तूं नित्य ये बा ! ॥नको०॥६॥श्रीराम शिवाचे हृदयीं विष्णूच्या हृदयीं शिव ।शिव विष्णु एकरूप नसे कांहीं द्वैतभाव ।आत्माराम एक लीलानाटकी तो झाला सर्व ।शिवप्रिती गोपाळासी गोपाळक प्रीति सांबा ॥नको०॥७॥ N/A References : N/A Last Updated : March 17, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP