मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककविकृत पदें| शिवरामस्वामिकृत पदें अनेककविकृत पदें अनुक्रमणिका आदिनारायणकृत पदें निजानंदस्वामिकृत पदें शिवदिनकेसरीकृत पदें रंगनाथस्वामिकृत पदें शिवरामस्वामिकृत पदें मध्वनाथस्वामिकृत पदें नरहरिकविकृत पदें महिपतिकृत पदें गोपाळनाथकृत पदें आत्मारामकविकृत पदें गंगाधरकविकृत पदें पांडुरंगकविकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें श्रीधरस्वामीकृत पदें परमानंदकविकृत पद जनार्दनकृत पद राघवकविकृत पदें बल्लवकविकृत पद रामकविकृत पदें भुजंगनाथकृत पदें कोकिळकविकृत पद निरंजनकृत पदें कृष्णदयार्णवकृत पद शुकानंदकृत पदें हरिकविकृत पद निंबराजकृत पद दीनानाथकृत पद माधवकविकृत पद हनुमंतकविकृत पद शिशुमतिकविकृत पद गिरिधरकविकृत पदे मानपुरीकृत पद व्यंकटसुतकृत पद जिवनतनयकृत पद गोसावीनंदनकृत पदें गोपालात्मजकृत पदें जयरामात्मजकृत पदें शिवरामात्मजकृत पद त्र्यंबककविसुतकृत पद गंगाधरात्मजकृत पद शिवदासतनयकृत पद रामतनयकृत पद अनंतकविसुतकृत पद शुकानंदनाथतनयकृत पद राजाराम प्रासादीकृत पदें माणिकप्रभुकृत पदें रविदासकृत पदें जगजीवनात्मजकृत पद प्रेमाबाईकृत पदें गुरुदासकृत पद नारायणबोवाकृत पदें शिवदासात्मजकृत पदें वासुदेवस्वामीकृत पदें सुभरावबावाकृत पदें माधवकृत पदें अनामकविकृत पदें वासुदेवा दीनानाथा । कमललो... शिवरामस्वामिकृत पदें अनेककविकृत पदें. Tags : kavimarathipadकविपदमराठी शिवरामस्वामिकृत पदें Translation - भाषांतर पद १ लें भय कासयाचें आत्म अनुभवीं योगिया ? ॥ध्रुवपद.॥देह अहंभाव त्यागी । मृत्यु मारुनीयां अंगीं ।देव आपणचि झालिया ॥भय०॥१॥योग कर्मातें गाळी । ज्ञान संशयातें टाळी ।आपुल्या ठायांसी आलिया ॥भय०॥२॥पूर्णानंदें पूर्णपणीं । दुजयातें दृष्टी नाणी ।शिवरामचि होउनी ठेलिया ॥भय०॥३॥पद २ रें माझा गे ! तोचि माझा गे ! । सखा जीवलग देव माझा गे ! ॥ध्रुवपद.॥नामरूपासी अतीत । नामें तारिले पतीत ।रूपें बिंबला मतींत । नटनाटक तो हरी ॥१॥त्याचें गे ! ध्यान त्याचें गे ! लागलें तें काय बोलूं वाचे गे ! ॥ध्रुवपद.॥जैसा चुंबक लोहा साह्य । दाहक अग्नी व्यापी बाह्य ।तैसा अंतर खेळे बाह्य । तैसा अंतर खेळे बाह्य । व्यतिरेक अन्वयें ॥२॥काई गे ! बोलूं काई गे ! । क्रियाचि न दिसे आतां कांहीं गे ! ॥ध्रुवपद.॥पूर्ण पाहतां ऐसें त्यास । नेलें पाहण्यानें पाहल्यास ।सर्व विसरलें कृत्यास । पूर्ण शिवरामीं पाहीं ॥३॥पद ३ रें निजीं निज लागलि मज माये ! ।स्मरणाचा आठव तोहि नोहे नोहे ॥ध्रुवपद.॥जागृति स्वप्न सुषुप्ति हरपली । तूर्या तेथें विरोनियां गेली ॥निजीं०॥१॥ब्रह्माविष्णुहरिहरादिक मूर्ती । मजमाजी स्मरोनि उठताती ॥निजीं०॥२॥पूर्णानंदीं मी सहज निजों गेल्यें ।शिवरामीं उठोंचि विसरल्यें ॥निजीं०॥३॥पद ४ थें चरणपल्लवीं ठेविं दयाळा ! ॥ध्रुवपद.॥चरणपल्लवीं ठेविं मज हरी ! । मरण महाभय दूर निवारी ॥चरण०॥१॥भाग्यबळें बहुतां दिवसां मन । पाहिन म्हणतें तुज गोपाळा ! ॥चरण०॥२॥हृदय जाणत्या काय मी चोरूं ? । क्षमा करीं अपराध दयाळा ! ॥चरण०॥३॥पूर्ण गुरू शिवराम दयाळा ! । अखंड गातो तव गुणमाला ॥चरण०॥४॥पद ५ वें कटिं कर ठेवुनि विठो ! काय मौज पहासी ? ।हांसति आम्हांसि लोक हे तुझे निवासी ॥ध्रुवपद.॥सिंहाचे बाळकासि गांजिताति कोल्हीं । हे लाज कोणा आली ? ।पतितपावन दिनानाथ ब्रीद प्रतिपाळीं ॥कटिं कर०॥१॥हरिणी वनीं पाडसासि मोकलोनि जाये । मग ल्यासी गती काये ? ।पक्षिणिचीं पिलें स्मरति तेंवि तुतें बाहें ॥कटिं कर०॥२॥तूंचि बंधु तूंचि बहिण तूंचि तातमाता । तुजवीण कोण त्राता ? ।शिवराम पुंडलिक वरद गणेशनाथा ॥कटिं कर०॥३॥पद ६ वें नेघें रे ! जन्मा नेघें रे ! जन्मा नेघें रे ! ॥ध्रुवपद.॥जननीतें गरोदर । कफदुर्गंधी विवर ।तप्त जननीजठर । माजी उकाडा होये ॥नेघें रे०॥१॥जंतुकिडियांचा सुकाळ । तोडिताती अंतरमाळ ।वरि वरि जठराग्नीचा ज्वाळ । वाहे नवमासवरी ॥नेघें रे०॥२॥वरि वरि होतां श्वासोच्छ्वास । नाहीं तिळभरी अवकाश ।ऐसा यातनेचा त्रास । पूर्ण शिवराम पाहीं ॥नेघें रे०॥३॥पद ७ वें आत्मा अनुभवी योगियां रे ! भय कासयाचें ? ॥ध्रुवपद.॥देहे अहंभाव त्यागें । मृत्यु सारोनिया आंगें ।देव आपणचि झालिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥१॥योग कर्माकर्म गाळी । ज्ञान संशयातें टाळी ।आपुले ठायां आलिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥२॥पूर्णानंद पूर्णपणीं । दुजयातें दृष्टी नाणी ।शिवरामचि होउनि ठेलिया । भय कासयाचें ? ॥आत्मा०॥३॥पद ८ वें सांवळा श्रीघनश्याम श्याम चला पाहूं ।काम धाम त्यजूनियां रामपदीं राहूं ॥ध्रुवपद.॥स्वस्थ माझे मस्तकीं हस्तकक्षी ठेवी ।उदय अस्तरहितवस्तु प्रस्तुतची दावी ॥सांवळा०॥१॥वासवादिपदा नाश वासनावियोगें ।श्रीनिवासदेवपदीं वास करूं अंगें ॥सांवळा०॥२॥त्यजुनि छंद करुनि मंद कर्ण वृंद काम ।पूर्णानंद आनंदकंद भजूं शिवरामा ॥सांवळा०॥३॥पद ९ वेंगुरुच्या उपकारा उपकारा । नाहीं पारावारा ॥ध्रुवपद.॥देउनि आपुला डोळा । डोळा दाखविला घननीळा ॥गुरुच्या०॥१॥देउनि आपुली दृष्टी । दृष्टी दाखविली निजसृष्टी ॥गुरुच्या०॥२॥जिकडे पाहे तिकडे । अवघें ब्रह्मचि बहसे उघडें ॥गुरुच्या०॥३॥स्वरूप नयनीं जडलें । डोळस शिवरामासी केलें ॥गुरुच्या०॥४॥पद १० वें गुंग मला केलें, गुरुनें गुंग मला केलें ।येकायेकीं भुरळ घालुनि मीपण माझें नेलें ॥ध्रुवपद.॥वहिल्या देशीं पावक आला काय चेटक केलें ? ।वागुं काणुं सांगुन त्याणें उलटें चालविलें ॥गुंग मला०॥१॥जातां जातां नवल जाहलें मन पांगुळलें ।नामातीत पुरुष त्याचें दर्शन तें झालें ॥गुंग मला०॥२॥गपकन अंधार पडला बाई ! झपकन उजाडलें ।चंद्रसूर्य नसतां तेथें तेज प्रकाशलें ॥गुंग मला०॥३॥अर्धचंद्र अमृत बाई ! पिउनियां धालें ।ब्रह्मानंद शिवरामीं जन्ममरण चुकवीलें ॥गुंग मला०॥४॥पद ११ वें संत दयाळ कसे ? । राजा रंक जया सरिसे ॥ध्रुवपद.॥देउनि भेटी तोडिति माया । नेउनि दाविती निजपदठाया ॥संत०॥१॥श्रवणीं पाजुनि अमृतवाणी । नेउनि दाविती चिन्मयखणी ॥संत०॥२॥शिवरामाचें अभिनव लेणें । लेवविलें मज पूर्ण कृपेनें ॥संत०॥३॥पद १२ वें तेचि गत बाई ! आचार तिचे ठायीं ।जाणिवेचा बोल आंगीं येऊं दिला नाहीं ॥ध्रुवपद.॥सत्कर्माचा सडा बरा घालुनियां द्वारीं ।माजघरची वोज बरी दावि लोकाचारी ॥तेचि०॥१॥निष्कामाचे चहुंकोनीं सारविलें घर ।सुरंग रंग रंगमाळ घाली निरंतर ॥तेचि०॥२॥घवघवित प्रेमकुंकूं लावुनियां भाळीं ।पूर्णानंदीं शिवरामीं विचरे वेल्हाळी ॥तेचि०॥३॥( पान नं. १८१ वरील पदे. )पद १३ वें तोचि गेला पाहिं रे ! । ज्या रामीं दृष्टि नाहिं रे ! ।रामीं आरामल्या मग तया कैंचें काय रे ! ॥ध्रुवपद.॥मातीमाजी घट रे ! । तंतूमाजी पट रे ! ।मातीतंतू निर्धारितां कैंची खटपट रे ! ॥तोचि०॥१॥हेमीं अलंकार रे ! । पाण्याची ती गार रे ! ।हेमपाणी पाहों जातां कैंचा तो आकार रे ! ॥तोचि०॥२॥मिथ्या भवबंध रे ! । नामरूप द्वंद्व रे ! ।शिवरामीं पाहों जातां अवघा पूर्णानंद रे ! ॥तोचि०॥३॥पद १४ वें प्रीति धरीं हरिपायीं । मना रे ! ॥ध्रुवपद.॥या नरदेहीं सार्थक हेंचि । संतसमागमिं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥१॥सारासारविचार करोनी । ब्रह्म सनातन होईं । मना रे ! ॥प्रीति०॥२॥धाला धाला बोध निमाला । शिवरामचरणीं राहीं । मना रे ! ॥प्रीति०॥३॥पद १५ वेंकपींद्रा ! सुखी असे कीं प्राणसखी सीता । जनकदुहिता ॥ध्रुवपद.॥नवनीतापरि अतिकोमळ तनु । गिळिलि न कीं पिशिता - । शनानें ॥सुखी०॥१॥विरह सतीला पळही न सोसे । झालासे कशिता । विधाता ॥सुखी०॥२॥धन्य मित्र तूं या दोघांतें । झालासे पुशिता । नेत्रजळ ॥सुखी०॥३॥शिवरामासी कधीं भेटसी । करीतसे प्रणिता । निशिदिनीं ॥सुखी०॥४॥पद १६ वें देवचि मानव तो । न मनीं केवळ दानव तो ॥ध्रुवपद.॥मी माझें हें नेणे स्वप्नीं । सुखदुःखेंविण खेळें भुवनीं ॥देवचि०॥१॥इच्छामात्र पदार्थीं नाहीं । कर्म तयाप्रति बाधिल कायी ॥देवचि०॥२॥वृत्तिरहित व्यवहार जयाचा । पूर्णशिशू शिवराम तयाचा ॥देवचि०॥३॥पद १७ वेंनिवालों निजसुखें या या महाराजांचे पायीं ।येथुनी मागुती आह्मां फिरणेंचि नाहीं ॥ध्रुवपद.॥सप्रेम येऊनि येथें करीतसे थारा ।तात्काळ तोडिला चहूं देहांचा उभारा ।कृपायुक्त ठेवितां तेणें मस्तकिं अभयकरा ।कैशा खुंटुनि गेल्या नाना जन्म येरझारा ॥निवालों०॥१॥पुष्टी झाली कैशी अपुल्या आनंदें मी धालों ।अंगोंअंगीं उतती गगनीं न माय ऐसा झालों ।परेच्या ऊपरी मौन ग्रासुनीयां गेलों ।शब्दचि पारूषला आतां काय ह्मणोनि बोलों ॥निवालों०॥२॥असो हें बोलणें फळलें सद्गुरूचें पायीं ।जिवशिव हा यावरूनि आतां ओवाळीन बाई ! ।जिवशिव न दिसे कांहीं, तरि म्यां कुरवंडावें कायी ? ।शिवरामीं तटस्त पूर्णानंदीं निज राहोही ॥निवालों०॥३॥पद १८ वें जीवगांठी समुळ छेदुनीयां । उभा कैसा सन्मुख येउनीयां ॥ध्रुवपद.॥कवण भाग्य न कळे मज माझें । दिल्ही भेटी दयाल गुरुराजें ॥जी०॥१॥दृश्य देखणें सर्व हिरुनि नेलें । मन माझें संकल्पशून्य केलें ॥जी०॥२॥स्फुरणाची मोडलि सर्व वाट । शिवरामीं शिव राम असें दाट ॥जी०॥३॥पद १९ वें ऐसा नवस वृत्तिसि होता बाई ! ।आजि फळला या सद्गुरूच्या पायीं ॥ध्रुवपद.॥सद्गुरुतीर्थीं सप्रेमभावें न्हाऊं ।सर्व तेणें चित्ताचा मळ धूऊं ।अंतरिं बरवें सहजात्मरूप पाहूं ।पाहाण्यामाजी सुख तेंचि होउनि राहूं ॥ऐसा०॥१॥सर्वां भूतीं श्रीराम यावा भेटी ।उघडुनियां भक्तीची भूषणपेटी ।लेणें लेतां पावे न शोभा मोठी ।स्वामी अपुला कवळी न दृढ पोटीं ॥ऐसा०॥२॥मग मी त्यासीं बोलेन कांहीं गूज ।त्याच्या सेजेसि घेइन मी नीज ।पूर्ण सुखें स्मरेन मी हो मज ।शिवरामीं इतकेंचि माझें काज ॥ऐसा०॥३॥पद २० वें महाराजा सद्गुरु मायबापा ! । तुझ्या संगें संसार गमे सोपा ॥ध्रुवपद.॥तुझा हस्त धरूनि जातां वाटे । पदोपदीं समाधिसुख दाटे ॥महा०॥१॥प्रबोधाची देखोनि जीव वाढी । देहबुद्धिधाकेंचि प्राण सोडी ॥महा०॥२॥शिवरामीं लागला तुझा छंद । प्रगटला सबाह्य पूर्णानंद ॥महा०॥३॥पद २१ वें तुझे पाय तारक दीनबंधू । कवळोनि तरेल भवसिंधू ॥ध्रुवपद.॥प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही तीर । मायामोहें भरूनि वाहे नीर ॥तु०॥१॥अहंकाराच्या आदळती लाटा । बळें नेताती आपुलिया वाटा ॥तु०॥२॥शिवरामीं हा धाक होता फार । पूर्णानंदीं पावलों पैल पार ॥तु०॥३॥पद २२ वें धन्य दिवस आजि वर्णूं काय ।संतांचें पाय देखिलिया सन्मुख माय ॥ध्रुवपद.॥आळशावरी जैशी वाहे गंगा । त्रितापभंगा ।तैसे तुम्हीं उद्धरिलें जगा । दर्शनें कीं गा ! ॥धन्य०॥१॥सकळ हीं मंगळें आजि जाहलीं । व्रतें तपें घडलीं ।सकळही तीर्थस्नानें केलीं । पातकें गेलीं ॥धन्य०॥२॥एका शिवरामासि धन्य झाला । वर्णवे न बोला ।पूर्व संचित ठेवा फळासि आला । सत्संग घडला ॥धन्य०॥३॥पद २३ वें देवचि तो नर कीं तो नर कीं । न मनीं त्यासि गति नरकीं ॥ध्रुवपद.॥मी माझें नेणें स्वप्नीं । सुखदुःखाविण खेळे भवनीं ॥देव०॥१॥इच्छा पदार्थमात्रीं नाहीं । चित्त सदा चिन्मात्रीं ॥देव०॥२॥वृत्तिविना व्यवहार जयाचा । पूर्ण शिष्य शिवराम तयाचा ॥देव०॥३॥पद २४ वें हुकूम साहेबका । हम तो चोपदार बांका ॥ध्रुवपद.॥ब्रह्माविष्णुमहेशा । प्रभुका अवतार खासा ॥हुकूम०॥१॥दशचारोपर सत्ता । ब्रह्मा सत्यलोकका दाता ॥हुकूम०॥२॥पूर्णगुरू शिवराम बंदा । बंदगी करले येखादा ॥हुकूम०॥३॥पद २५ वें बंदे ! क्यौं भूला क्यौं भूला ? आखर खावेगा झोला ॥ध्रुवपद.॥कवडीकवडी माया जोडी । आखर जावेगा खूला ॥बंदे०॥१॥भाई बहिन जोरू लरके । कोन किसीका साला ॥बंदे०॥२॥शिवराम कहे समाल बंदे । कर साहेबसों सल्ला ॥बंदे०॥३॥ N/A References : N/A Last Updated : March 16, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP