मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी| विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी अनुक्रमणिका अंत्येष्टिविधिसार श्मशानयात्रा अग्नीचें पुनः संधान और्द्ध्वदेहिक विधि अग्निप्रज्वलन ( अग्नि पेटविणें ) तिलांजलि पहिल्या दिवसाची क्रिया नवश्राद्धें नग्नप्रच्छादन व पाथेयश्राद्ध अस्थिसंचयन अस्थिसंचयन श्राद्ध दुसर्या दिवसापासूनची क्रिया दहावे दिवसाची क्रिया अकरावे दिवसाची क्रिया वृषोत्सर्ग एकोद्दिष्ट श्राद्ध रुद्रगण श्राद्ध वसुगण श्राद्ध सोळा मासिक श्राद्धें दश दानें अष्ट दानें उपदानें प्रायश्चित्तधेनुदान पंचगोदानें अश्वदान शय्यादान भूमिदान पददानें बाराव्या दिवसाची क्रिया दुसरे पाथेयश्राद्ध तेरावे दिवसांची क्रिया तेरा श्रवणामान्नदानें उदकुंभश्राद्धें मासिकश्राद्धें प्रासंगिक कृत्यें अंत्येष्टिविधींतील कृत्यांची यादी लौकिक किंवा रूढीचे विधि विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं विविध धर्मांचे अंत्येष्टिविधीं अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम. Tags : hinduvidhiअन्त्येष्टिविधीहिन्दू निरनिराळ्या लोकांच्या व धर्मांच्या अंत्येष्टिविधींचें संक्षिप्त वर्णन Translation - भाषांतर आर्यसमाज१ प्रेतस्नान २ स्मशानयात्रा ३ प्रेतदहन ४ सर्वांनी स्नान करून स्मशानांतून परत येणें ५ नंतर सवडीप्रमाणें विश्वान पुरुष व स्त्रीस उपदेशासाठीं घरी आणणें व सत्कार करणें ६ परोपकारार्थ सत्कार्यी धन दान करणें प्रार्थनासमाज१ प्रेताजवळ उभें राहून ईश्वरप्रार्थना करणें २ प्रेतास स्नान घालणें ३ स्मशानयात्रा ४ चितेवर प्रेत ठेवून प्रार्थना करणें ५ प्रेतदहन ६ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रार्थना करणें ७ कन्यांनीं चवथ्या व पुत्रांनीं बाराव्या दिवशीं करावयाचें आद्यश्राद्ध ( ब्रह्मोपासना व आमान्नदान अथवा ब्राह्मभोजन ८ वार्षिक श्राद्ध ( ७ प्रमाणें )ब्रह्मसमाज१ प्रेतास स्नान घालणें २ प्रेतास सफेत कपडे घालणें ३ आप्त इष्टांनीं प्रेताजवळ बसून ईश्वरप्रार्थना करणें व शेवटचें दर्शन घेणें ४ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रेतास पुष्पमाला घालणें ५ सगळ्यांनीं उभें राहाणें व उपाध्यायानें ईश्वरप्रार्थना करणें ६ तिरडीवर प्रेत बांधणें ७ स्मशानयात्रा ८ प्रेतदहन ९ पुत्रानें ( कर्त्यानें ) प्रार्थना कर्णें १० अस्थि व रक्षा यांचें संजय ( पहिल्या अथवा दुसर्या दिवशीं )११ आठव्या दिवशीं श्राद्धयात्रा करणे व रक्षाकुंभ पुरणें; घरीं परत जाऊन पुत्रानें ( कर्त्यानें ) ईश्वरप्रार्थानारूपी श्राद्ध करणें, व उपाध्यायानें ईश्वर प्रार्थना करणें १२ श्राद्धकर्त्यानें ईश्वराचा आशीर्वाद मागणें व परोपकारार्थ यथाशक्ति दानधर्म करणेंजैन १ प्रेतस्नान २ स्मशानयात्रा ( दिवसा ) ३ प्रेतदहन ४ स्नान करून सर्वांनीं स्मशानांतून परत येणें ५ तिसर्या दिवशीं अस्थिसंचयन ( श्राद्धावांचून ) ६ दहाव्या दिवशीं मंदिरांत जाऊन पूजा कर्णें व मंदिरास वस्त्रपात्रादि अर्पण करणें ७ दहाव्यापासून तेराव्या दिवसापर्यंत ज्ञातिभोजन व मृताच्या आत्म्यासाठीं स्तोत्रें म्हणणें ८ पांजरपोळ, मंदिर, धर्मशाळा वगैरे साठीं धर्मार्थ द्रव्यदान करणें ९ एक वर्ष पावेतों दर महिन्यास आमान्न देणें १० एक वर्षानें ज्ञातिभोजनपार्शी १ प्रेतस्नान २ प्रार्थना ३ स्मशानयात्रा ( दिवसा ) ४ स्मशानांत ( दखम्यांत ) नेऊन प्रार्थनापूर्वक प्रेत उघडें ठेवून गिधाडांकडून खावविणें ५ गोमूत्रानें गृहशुद्धि करतात व प्रेताच्या जागेवर चंदनाची धुणी करतात; तसेंच प्रेतवाहकांस गोमूत्रानें व शुद्धोदकानें स्नान घालतात.६ तीन दिवस पर्यंत मांसाहार वर्ज्य करतात ७ दहावे दिवशीं, महिन्यानें, सहा महिन्यांनीं, व वर्षानें अध्यारूंस जेवूं घालतात.चिनी१ प्रेतस्नान २ देवाची ( धान्यपतीची ) प्रार्थना ३ पुरोहितास व आप्तस्वकीयांस मरणाची खबर देणें ४ प्रेत पोषाखासह पेटींत घालणें ५ स्मशानयात्रा ६ प्रेत पुरण्याची क्रिया ७ स्मशानांतून सर्वांनीं परत येणें ८ तिसर्या दिवशीं थडग्यापाशीं जाऊन मृतास खाण्याचे पदार्थ अर्पण करणें ९ सातव्या दिवशीं घरीं श्राद्धासारखी क्रिया करतात; याप्रमाणें सात आठवडेपर्यंत करतात १० प्रेताचा आत्मा घरीं केव्हा येईल ती वेळ पुरोहित मुक्रर करतो. त्यादिवशीं एका खोलींत मृताच्या आत्म्यासाठीं भोजन तयार करून ठेवतात; त्याचें सेवन करून तो जातो अशी समजूत आहे.जपानी १ प्रेत स्मशानांत नेण्यापूर्वींची प्रार्थना २ प्रेत पेटींत घालून घराबाहेर काढण्याची क्रिया ३ स्मशान यात्रा ४ प्रेत पुरण्याची क्रिया ५ प्रेत बाहेर नेतांच घर शुद्ध करतात व स्मशानांतून लोक परत येतांच त्यांना शुद्ध करण्याची क्रिया होते ६ पन्नास दिवस पर्यंत थडग्यापाशीं श्राद्धासारखी क्रिया करतात. त्यानंतर मृत मनुष्याचा आत्मा पितृलोकी जातो अशी समजूत आहे मुसलमान१ प्रेतास स्नान घालणें २ फकिरांकडून प्रार्थना म्हणविणें ३ स्मशानयात्रा ४ पुरण्याची क्रिया ५ तिसर्या दिवशी सकाळीं आप्त इष्ट जमा होऊन कुराण वाचतात व थडग्यापाशीं जाऊन फुलें वाहतात ६ दहाव्या, विसाव्या, तिसाव्या व चाळिसाव्या दिवशीं खाना तयार करून आप्त इष्टांस व गरीबांस जेवूं घालतातख्रिस्ती १ प्रेतस्नान व अंजन २ प्रेतास सफेत पोशाख घालणें ३ प्रेत पेटींत घालणें ४ स्मशानयात्रा ( दिवसा ) ५ प्रेताचें शेवटचें दर्शन घेण्यासाठीं तें खुलें ठेवणें ६ प्रेत थडग्यांत पूर्वेस पाय करून उताणें ठेवणें ७ मृताच्या आत्म्यास शांति मिळण्यासाठी सर्वांनीं प्रार्थना करणें ८ प्रेत पुरणें N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP