मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
उपदानें

उपदानें

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


‘ त्या त्या दानाचें फळ मृतास परलोकीं मिळावें म्हणून ही दानें करतों. ’ असा संकल्प करावा. तीं दानें
१ अन्न,
२ उदकुंभ,
३ चर्मीजोडा,
४ कमंडलु,
५ छत्री,
६ वस्त्र,
७ काठी,
८ लोहदंड,
९ शेगडी,
१० दीप,
११ तीळ,
१२ वीडा,
१३ चंदन,
१४ पुष्पमाला,
याप्रमाणें आहेत. ज्या दानाचे मंत्र वर आले नाहीत ते खाली लिहिल्याप्रमाणें आहेत.
चर्मी जोडे देतेवेळचा मंत्र :- “ कांठ्याकुठ्यापासून रक्षण होण्यासाठीं चर्मी जोड्याचें दान करतों. तो सर्व मार्गामध्यें सुखदायक होवो; व त्यानें मृतास आराम मिळो. ”
कमंडलु वगैरेच्या दानाचे मंत्र :- आसनदानाचाच मंत्र म्हणावयाचा. मात्र त्यांत ‘ आसनेन च ’ याबद्दल ‘ उदपात्रेण ’ वगैरे म्हणावें. तसेंच यष्टिदानाच्या, शेगडीच्या, चंदनाच्या, व पुष्पमालेच्या दानाचे वेळी ‘ त्रिलोकीनाथ ’ या मंत्रांचे तृतीयचरणांत त्या त्या वस्तूंचा उच्चार करावा.
लोहदंडदानाचा मंत्र :- “ जाणून, अजाणपणी अथवा लोभानें मृताकडून जें पाप घडलें असेल तें सर्व या लोहदंडाचे दानानें नाहीसे होवो.
दीपदानाचा मंत्र :- “ दीप हा नित्य ज्ञान देणारा असून, तो देवतांना सदा प्रिय आहे. याच्या दानानें मृतास सौख्य व शांति मिळो. ”
तांदूलदानाचा मंत्र :- “ सर्व साहित्यानें युक्त असा हा विडा नेहमी मंगलकार्यांत इष्ट आहे. व तो देवांनाहि प्रिय आहे; त्यायोगानें मृताचें मुख सुगंधित असो. ”
याशिवाय क्कचित् निरनिराळी दानें आणखी करितात. उदाहरणार्थ कापूस, सप्त धान्यें, सिद्धस्थाली ( खिरीनें भरलेले भांडे ) ऊर्णावस्त्र ( लोकरीचें वस्त्र, शालजोडी वगैरे ) व्यजन ( पंखा ) नग्नप्रच्छादनीय वस्त्र इत्यादि यांचे मंत्र सहज समण्याजोगे आहेत.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP