मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
प्रायश्चित्तधेनुदान

प्रायश्चित्तधेनुदान

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


“ मृतानें आजपर्यंत केलेल्या पापांबद्दल प्रायश्चित्त केलें नाही; म्हणून त्या सर्व पापांचें निवारण होण्यासाठी ह्या प्रायश्चित्तधेनूचें मी दान करतों ” असा संकल्प करावा. नंतर गाईची पूजा करावी.
पूजेचा मंत्र :- “ समुद्रमंथनकालीं पांच गाई उत्पन्न झाल्या. त्यांपैकीं जी नंदा तिला नमस्कार असो. ” पूजा झाल्यावर गाईस यथाशक्ति दागिने घालावे. व तिला तीन प्रदक्षिणा करून प्रार्थना करावी. नंतर दान घेणार्‍या ब्राह्मणास गाईच्या शेपटीजवळ उत्तराभिमुख उभें करावें. आणि सुवर्णयुक्त तुपानेम भरलेल्या कांशाचे भांड्यांत गाईचें पुच्छ घालून तें पुच्छ दर्भ, तीळ व पाणी यांसह ब्राह्मणाचे हातांत द्यावें. नंतर गाईची स्तुति करून दक्षिणेसह गाई ब्राह्मणास द्यावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP