मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
अस्थिसंचयन

अस्थिसंचयन

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, चौथ्या, सातव्या किंवा नवव्या दिवशीं अस्थि गोळा कराव्या. त्यांत द्विपाद त्रिपाद नक्षत्रें व कर्त्याचें जन्मनक्षत्र वर्ज करावें. श्मशानांत जाऊन आचमन करून अमंत्रक प्राणायाम करावा व देशकालाचा उच्चार करून अपसव्य करावें आणि अमुक गोत्रांतील अमुक नावांच्या प्रेता ! “ हे शैत्ययुक्त, औषधींनीं संपन्न, आनंद देणारे, आह्लादकारक आणि फलयुक्त वृक्षांनीं संपन्न पृथिवी, तूं बेडकीशीं संगत हो, आणि अग्नीशीही संगत हो ” (ऋ. ७-६-२२).
हा मंत्र म्हणून दुधानें मिश्रित उदक घेऊन शमीच्या डहाळीनें पायापासून तीन उलट्या प्रदक्षिणा करीत तें चितेवर शिंपडावें; नंतर पायापासून मस्तकापर्यंतच्या अस्थि कर्त्यानें, आंगठा, अनामिका व करांगळी यांनी काढून कोर्‍या मडक्यांत, शब्द न होईल अशा रीतीनें भराव्या; बाकीची राख सुपानें पाखडून बारीक बारीक अस्थिही मडक्यांत भराव्या आणि राख नदींत टाकावी. पावसाळ्याशिवाय इतर वेळी पाणी येत नाहीं, अशा स्वच्छ जागीं खाडा खोदून ‘ उपसर्प मातरं० ’ ( पहा पृ. १०) या मंत्रानें अस्थीचें मडकें खाड्यांत ठेवावें. ‘ उच्छञ्चस्व पृथिवी० ’ ( पहा पृ. १८ ) या मंत्रानें मडक्याचे आजुबाजूस खाड्यांत माती टाकावी; ‘ उच्छ्वञ्चमाना० ’ ( पहा पृ. १८ ) हा मंत्र म्हणून हात जोडून जप करावा; व ‘ उत्ते स्तभ्नामि० ’ ( पहा पृ. १९ ) हा मंत्र म्हणून नवीन खापर मडक्यावर ठेवावे. नंतर मडकें न दिसेल अशा रीतीनें त्यावर माती लोटून मागें न पाहतां दुसरीकडे जाऊन स्नान करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP