मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
तिलांजलि

तिलांजलि

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


सर्वांनीं स्नान करावें. नंतर - ‘ हा ( अग्नि ) पेटून आमचें पाप नाहीसें करो. हे अग्निदेवा, आमचेवव्र संपत्तीचा प्रकाश पाड. ( खरोखर ) हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचें पाप नाहींसें करो. ’ (ऋ.१-७-५).
या मंत्रानें डाव्या हातानें अनामिकेनें पाणी ढवळून पुन्हा स्नान करावें व दर्भावर अश्मा ठेवून त्यावर कार्त्यासह सर्वांनीं अपसव्यानें मृताचे गोत्राचा व नांवाचा उच्चार करून तिलांजली द्यावी.
नंतर कर्त्यानें दाहजनित तृषेच्या शमनासाठी उत्तरीयोदक अश्म्यावर पिळावें.
दिवसा प्रेत दहन केलें असेल, तर नक्षत्र दिसेपर्यंत व रात्रीं दहन केलें असेल, तर सूर्योदयापर्यंत तेथें रहावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP