मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
नवश्राद्धें

नवश्राद्धें

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


नवश्राद्धांस कोणी विषमश्राद्धें असेंही म्हणतात; कारण कीं, ती पहिला, तिसरा, पांचवा, सातवा, नववा, आणि अकरावा या विषम दिवशीं करितात. कर्त्यानें स्नान करून आचमन केल्यावर प्राणायाम करावा व देशकालाचा उच्चार करून, प्रेताची प्रेतत्वापासून मोकळीक होण्यासाठीं प्रथम दिवशीं नवश्राद्ध करितों, असें म्हणून उदक सोडावें. अपसव्य करून दक्षिणाभिमुख बसून, आपलेसमोर उत्तराभिमुख दर्भाचा बटु करून ठेवावा; आणि त्याची तुळसी, साका, धूप, दीप, इत्यादि साहित्यानें यथाविधि पूजा - ( गंध, पुष्प वर्ज करून - ) करावी; नंतर तुपानें युक्त असा भात किंवा सातूचे पिठाची आहुती दर्भ बटूचे हातांत द्यावी आणि आमान्न किंवा त्याचा निष्क्रय, व उदकुंभ दक्षिणेसह द्यावा. नंतर एक दर्भ ठेवून त्यावर पिंड द्यावा; पिंडपूजा करून मागें सांगितलेला ‘ अनादि निधनो० ’ हा मंत्र म्हणावा. नंतर कर्त्यानें ‘ अभिरम्यताम् ’ म्हणजे ‘ आनंदांत असावें. ’ असें म्हणावें; व प्रेताचे वतीनें क्रिया सांगणारानें ‘ अभिरताःस्मः ’ म्हणजे ‘ आनंदांत आहों ’ असें उत्तर द्यावें. त्यानंतर पिंड पाण्यांत टाकून स्नान करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP