मराठी मुख्य सूची|विधी|कर्म विधी|ऋग्वेदीय अन्त्येष्टि विधी|
और्द्ध्वदेहिक विधि

और्द्ध्वदेहिक विधि

अंत्येष्टि म्हणजे शेवटचा होम.


चितेच्या ईशान्येस गुडघ्याइतका किंवा वीतभर खोल खळगा ख्दून त्यांत पाणी भरावें व शेवाळ टाकावी.
नंतर कर्त्यानें आचमन करून अमंत्रक प्राणायाम करून, देशकालाचा उच्चार करून “ अमुक गोत्राच्या अमुक नांवाच्या पित्याची प्रेतत्वापासून सुटका होण्यासाठी और्ध्वदेहिक करितों. ” असा संकल्प केल्यावर अपसव्य करून ‘ जी भूमि मातृरूपी, विस्तीर्ण, सर्वांस सुखदायी, कुमारी ( न नांगरलली ) आहे, व जी उदार यजमानास लोंकरी सारखी मऊ होते. अशा ह्या भूमीत तूं प्रवेश कर. ही भूमि मृत्युदेवतेच्या सान्निध्यापासून तुझें रक्षण करो. ’ (ऋग्वेद ७-६-२७)
या मंत्रानें भूमिची प्रार्थना करावी. नंतर “ आकाशांत, जलाशयांत, उत्पन्न झालेली तसेंच पर्वतापासून व वनस्पतीपासून जी उत्पन्न झालीं आहेत ही पवित्र जलें आम्हांस शुद्ध करोत ” असें म्हणून स्थलशुद्धि करावी.
“ हे पिशाचांनों, येथून लवकर दूर निघून जा; पितरांनीं ह्याला ( प्रेताला ) ही जागा नेमून दिली आहे. दिवस, रात्र आणि जल - प्रवाह यांनीं युक्त असलेली ही जागा यमानें यास दिली आहे. ” (ऋ. ७-६-१५) या मंत्रानें खळग्यांतील अगर दुसरे पाण्यानें शमीच्या डाहाळीनें तीन वेळ उलटी प्रदक्षिणा करीत चितेचें प्रोक्षण करावें, व वरील मंत्र प्रत्येक प्रदक्षिणेचे वेळीं म्हणावा. चितेचें प्रोक्षण करावें, व वरील मंत्र प्रत्येक प्रदक्षिणेचे वेळीं म्हणावा. चितेच्या आंत किंवा बाहेर स्थंडिल त्रिकोणाकृती करून यथाविधि क्रव्याद ( मांसभक्षक ) नांवाचा औपासनाग्नि सिद्ध करावा, व दर्भाच्या मूलानें चितेचे मध्यभागीं यमनामक दहनपतीसाठीं, दक्षिण भागीं मृत्युनामक दहनपतीसाठीं अशा तीन रेघा काढाव्या; व त्यांजवर तीन सोन्याचे तुकडे व तीळ ठेवावे; व माहीतगार माणसानें चिता रचावी. नंतर कर्त्यानें चितेवर दर्भ पसरून हरणाचे कातडें, वरच्या अंगास केस करून घालावें, आणि शव अग्नीच्या उत्तर बाजूनें नेऊन तें दक्षिणेस डोकें करून चितेवर ठेवावें. नंतर प्रेताचें तोंडांत, दोन्ही नाकपुड्यांत, दोन्ही डोळ्यांत, दोन्ही कानांत अशा सप्तछिद्रांत सोन्याचे तुकडे किंवा त्याचे अभावीं तुपाचे थेंब घालावे, व प्रेतावर तूप लाविलेले तीळ टाकावे. नंतर देशकालाचा उच्चार करून ‘ प्रेतोपासन करतों. ’ असा संकल्प करावा. व दोन समिधा घेऊन ‘ अग्नि, काम, लोक व अनुमती या चार प्रधान देवता व प्रेत यांनां प्रेताच्या उरावर आहुती देतों, - ’ असें म्हणावें. नंतर “ हे अग्नी, ह्या चमसाला ( सोमवल्लीचा रस पिण्याचे पात्राला ) तूं हालवूं नको. हा देवांना व पितरांना प्रिय आहे. ज्यांनां मरण नाहीं असे देव या चमसांतून सोमरसाचें पान करतात व आनंद पावतार. ” (ऋ. ७-६-२१) या मंत्रानें चमसाचें अनुमंत्रण करून, अग्नि, काम, लोक व अनुमति यांनां तुपाच्या आहुती द्याव्या, व शेवटीं प्रेताचे उरावर पांचवी आहुती, “ यापासून तूं झालास, तुझ्यापासून हा होवो. हा ( मृताचें नांव घ्यावें ) स्वर्गाला जावो. ” या मंत्रानें द्यावी.
अशा रीतीनें प्रेतोपासन करून प्रेतावर सातूच्या पिठाचे पांच अपूप करून त्यास दधिमिश्रित तूप लावून “ हे प्रेता, अग्नीचें ज्वालारूपी कवच गाईच्या चर्मानें झांकून टाक, आणि तिच्या पुष्ट झालेल्या मांसानें आच्छादन कर. म्हणजे धैर्यवान्, व आपल्या तेजानें आनंद पावणारा, अभिमानी, व तुला जाळून टाकणारा असा जो अग्नि, तो तुला चोहोंकडून बिलगून वेढणार नाहीं. ’ (ऋ. ७-६-२१) या मंत्रानें कपाळावर एक व तोंडावर एक याप्रमाणें दोन अपूप द्यावे. नंतर, ‘ अतिद्रव्यसार मेयौ० ’ आणि यौतेश्वानौ यम० ’ या दोन मंत्रांनीं दोन बाहूंवरं दोन अपूप द्यावे व पांचवा उरावर द्यावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP