मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १०६ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १०६ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘यमः’’ मांसमूत्रपुरीषाणि प्राश्य गोमांसमेव च। श्र्वगोमायुकपीनां च तप्तकृच्छ्रं विधीयते।
उपोष्‍य वा द्वादशाहं कूष्‍मांडै र्जुहुयाद्‌घृतमिति अत्राद्यमकामतः कामतोऽपरं।
‘‘बृहद्यमः’’ शुष्‍कमांसाशने विप्रोव्रतं चांद्रायणं चरेदिति ‘‘षट्‌त्रिंशन्मते’’ अजाविमहिषमृगाणामाममांसभक्षणे केशनखरुधिरप्राशने मतिपूर्वं त्रिरात्रमज्ञानादुपवास इति। ‘‘क्‍कचिन्मांसभक्षणमनुजानाति याज्ञवल्‍क्‍यः’’ प्राणात्‍यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्‍यया।
देवान्पितृन्समभ्‍यर्च्य खादन्मांसं न दोषभागिति। ‘‘यत्तु मनुः’’ न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने।
प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्‍तु महाफलेति तदनुज्ञातपरं न तु निषिद्धपरं निषिद्धानाचरणस्‍य पुण्यजनकत्‍वांदिति शूलपाणिः।
तन्न सत्‍यपि पुरुषार्थे नानृतं वदेदिति निषेधे दार्शपूर्णमासिकेन तेन निषिद्धानाचरणस्‍यैव क्रतूपकाराख्यपुण्यजनकत्‍वदर्शनात्‌।
तत्‍वतस्‍तु नात्रनिषिद्धानाचरणं पुण्यजनकं किंतु प्राजापतिव्रत इव मांसनिवृत्ति संकल्‍पः। यथैकादश्यां न भुंजीतेति निषेधसत्‍वेपि व्रतविधिना भोजनाभावसंकल्‍पः फलाय विधीयते। एतेन ‘‘गृहेपि निवसन्‌ विप्रोमुनिर्मांसविवर्जनादिति याज्ञवल्‍कीयमपि व्याख्यातं।
एतच्च फलं सांवत्‍सरिकं संकल्‍पस्‍य ‘‘वर्षे वर्षेऽश्र्वमेधेन योयजेत शतं समाः।
मांसानि च न खादेद्यस्‍तयोः पुण्यफलं सममिति मनूक्तेः’’

मांस, मुत, पुरीष, गाय व कुत्रें वगैरेंचं मांस ज्ञानानें व अज्ञानानें खाल्‍ले तर प्रायश्चित्त.

‘‘यम’’---मांस, मुत, पुरीष, गाईचें मांस, कुत्रें, कोल्‍हा व वानर यांचें मांस यांचें भक्षण केलें तर तप्तकृच्छ्र करावें. किंवा बारा दिवस पर्यंत उपास करून कूष्‍मांडमंत्रांनीं घृताचा होम करावा. या वचनांतील पहिलें (प्रायश्चित्त) अबुद्धिपूर्वक भक्षणाविषयी जाणावें. दुसरें (प्रायश्चित्त) बुद्धिपूर्वक भक्षणाविषयी जाणावें. ‘‘बृहद्यम’’---ब्राह्मणानें वाळलेल्‍या मांसाच्या भक्षणा विषयीं चांद्रायण प्रायश्चित्त करावें. ‘‘षट्‌त्रिंशन्मतांत’’ बकरें, मेंढरूं, म्‍हैस, व हरिण यांचें कच्चे मांस आणि केस, नखें व रक्त यांचें भक्षण बुद्धिपूर्वक केलें तर तीन दिवस उपास व अज्ञानानें केलें तर एक दिवस उपास करावा. ‘‘याज्ञवल्‍क्‍य क्‍वचित्‍प्रसंगी मांस भक्षण करण्याविषयीं आज्ञा देतो’’---प्राणं जात असतां, श्राद्धांत द्विजांच्या इच्छेवरून प्रोक्षित केलेलें, देव पितर यांस समर्पण केलेलें असें मांस खाल्‍लें असतां तें दोषकारक होत नाहीं. ‘‘जें तर मनु’’ मांस खाण्यास दोष नाहीं. मद्य पिण्यास दोष नाही. तसेंच मैथुनासही दोष नाही. कारण ही प्राण्यांची प्रवृत्ति आहे. परंतु निवृत्ति (प्रवृत्ति न होणें) हाणें ती मोठ्या फळास देणारी आहे’’ असें म्‍हणतो, तें आज्ञा केलेल्‍या विषयीं आहे. निषेधा विषयीं नाही. कारण निषेध केलेल्‍याचा स्‍वीकार न करणें हें पुण्यकारक आहे असे शूलपाणि म्‍हणतो. परंतु ते बराबर नाही. कारण पुरुषार्थ  असतांही खोटें बोलूं नये असा निषेध असतां दर्शपूर्ण मासांत असलेल्‍या त्‍याच्या योगानें निषिद्धाचें आचरण न करणें त्‍यासच क्रतूपकाराख्य जें पुण्य त्‍याचें उत्‍पादकत्‍व पहाण्यांत येते. वास्‍तविक तर येथें निषिद्धाचें आचरण न करणें तें पुण्यकारक नाही. परंतु प्रजापतिव्रता प्रमाणें मांसाच्या निवृत्तीचा संकल्‍प आहे. जसें की ‘‘एकादशीच्या दिवशीं जेऊं नये’’ असा निषेध असूनही व्रताच्या विधीनें भोजनाच्या अभावाचा संकल्‍प फळा करितां करण्यांत येतो. यावरून घरी रहाणारा ब्राम्‍हण मांस वर्ज्य केल्‍यानेंही मुनि होतो.’’ याप्रमाणें याज्ञवल्‍क्‍यानें सांगितलेल्‍या वचनाचीही व्याख्या केली. हें संकल्‍पाचें फळ एका वर्षाचें जाणावें. कारण ‘‘जो प्रत्‍येक वर्षीं एक अश्र्वमेध याप्रमाणें शंभर वर्षे पर्यंत करील, आणि जो एक वर्ष पर्यंत मांस खाणार नाही, या दोघांचें फळ सारखें आहे’’ असें मनूचें वचन आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP