मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ३५ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३५ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

ब्रह्मकूर्च.

ब्रह्मकूर्चमाह ‘‘जाबालः’’ अहोरात्रोषितो भूत्‍वा पौर्णमास्‍यां विशेषतः। पंचगव्यं पिबेत्‍प्रातर्ब्रम्‍हकूर्चविधिः स्‍मृतः।
‘‘प्रजापतिः’’ पालाशं पद्मपत्रं वा ताम्रं वाथ हिरण्मयं। गृहीत्‍वा साधयित्‍वा तु तथा कर्म समाचरेत्‌।
‘‘पराशरः’’ गोमूत्रं कृष्‍णवर्णायाः श्र्वेतायाश्र्चैव गोमयं। पयश्र्च ताम्रवर्णाया रक्ताया गृह्यते दधि।
कपिलाया घृतं ग्राह्यं सर्व कापिलमेव वेति। ‘‘सएव’’ मूत्रमेकपलं दद्यादंगुष्‍ठार्धं तु गोमयं। क्षीर सप्तपलं दद्याद्दधि त्रिपलमुच्यते।
घृतमेकपलं दद्यात्‍पलमेकं कुशोदकं। गवां वर्णांतरस्‍य पंचगव्यपरिमाणांतरस्‍य च बोधवाक्‍यानि ग्रंथांतरे द्रष्‍टव्यानि तदर्थस्‍तु प्रयोगेऽस्‍माभिः संगृहीतः ‘‘पराशरः’’ आपोहिष्‍ठेति चालोड्य मानस्‍तोकेति मंथेयत्‌।
‘‘स एव’’ सप्तावरास्‍तु ये दर्भा अच्छिन्नाग्राः शुकत्‍विषः। तैरुध्दृत्‍य तु होतव्यं पंचगव्यं यथाविधीति ‘‘ प्रजापतिस्‍तु’’ स्‍थापयित्‍वाथ दर्भेषु पालाशैः पत्रकैरथ तत्‍समुध्दृत्‍य होतव्यं देवताभ्‍यो यथाक्रमं ‘‘पराशरः’’ इरावती इदं विष्‍णुर्मानस्‍तोके च शंवती।
एताभिश्र्चैव होतव्यं हुतशेषं पिबेद्विजः। ‘‘प्रजापतिः’’ अग्रये चैव सोमाय सावित्र्या च तथैव च।
प्रणवेन तथा हुत्‍वा स्‍विष्‍टकृच्च तथैव च। ‘‘मरीचिः’’ अग्‍नयेस्‍वाहा, सोमाय स्‍वाहा, इंदवते० ‘इदंविष्‍णुः’ मानस्‍तोके० गायत्र्या० प्रजापते नत्‍वदेतानीत्‍याज्‍याहुतीरग्‍नौ जुहुयात्‌ ‘‘पराशरः’’ आलोड्य प्रणवेनैव निर्मथ्‍य प्रणवेन तु।
उध्दृत्‍य प्रणवेनैव पिबेच्च प्रणवेन तु ‘‘मरीचिः’’ पालाशेन च पत्रेण बिल्‍वपत्रेण वा पिबेत्‌। तृतीयं ताम्रपात्रं वा ब्रम्‍हपात्राणि तानि वै।
‘‘वृद्धपराशरः’’ यत्‍वगस्‍तिगतं पापं देहे तिष्‍ठति मानवे। ब्रम्‍हकूर्चो दहेत्‍सर्वं शुष्‍कमग्‍निरिवेंधनमिति। पानदिने
चोपवासः ब्रम्‍हकूर्चोपवासस्‍तु दहत्‍यग्‍निरिवेंधनमिति ‘‘पराशरोक्तेः’’
ब्रम्‍हकूर्च.

ब्रम्‍हकूर्चाचा विधि.

‘‘जाबाल’’ ब्रम्‍हकूर्च सांगतो---पौर्णिमेच्या दिवशी विशेषें करून अहोरात्र उपोषित राहून दुसर्‍या दिवशी सकाळी पंचगव्य प्यावे. याला ब्रम्‍हकूर्चविधि म्‍हणतात. ‘‘प्रजापति’’---पळसाचें पान, कमळाचें पान, तांब्‍याचें भांडें किंवा सोन्याचें भांडें घेऊन त्‍यांत ब्रम्‍हकूर्च निर्माण करून मग कर्म करावे. ‘पराशर’---काळ्या गाईचें गोमूत्र, पांढर्‍या गाईचें शेण, तांबड्या गाईचें दुध, तांबड्या गाईचें दहि व कपिला गाईचें तूप घ्‍यावें. अथवा सगळें कपिला गाईचेंच घ्‍यावे. ‘‘तोच’’---गोमूत्र एक पळ, अर्घ्या अंगट्या एवढें शेण, सात पळें दुध, तीन पळें दहि, एक पळ तूप व एक पळ दर्भांनी मिश्र असे पाणी घ्‍यावे. गाईच्या दुसर्‍या वर्णाची व पंचगव्याच्या दुसर्‍या प्रमाणांची ज्ञापक वाक्‍यें दुसर्‍या ग्रंथांत पहावी. त्‍यांच्या अर्थाचा प्रयोगांत आम्‍ही संग्रह केला आहे. ‘‘पराशर’’--‘‘आपोहिष्‍ठा’’ या मंत्रानें एकत्र करून ‘‘मानस्‍तोके’’ या मंत्रानें मंथन करावे. ‘‘तोच’’---हिरवे, ज्‍यांची टोकें कापली नाहीत अशा सातां पेक्षां अधिक अशा दर्भांनी पंचगव्य घेऊन विधीप्रमाणें होम करावा. ‘‘प्रजापति’’---दर्भांवर तें पंचगव्य ठेऊन पळसांच्या पानांनी घेऊन क्रमानें देवतांस त्‍याचा होम द्यावा. ‘‘पराशर’’---‘‘इरावती’’ ‘‘इदं विष्‍णुः’’ ‘‘मानस्‍तोके’’ व ‘‘शंवती’’ या ॠचांनीं त्‍याचा (पंचगव्याचा) होम करावा. होम करून शेष राहिलेलें प्यावें. ‘‘प्रजापति’’---अग्‍नि व सोम या देवतांस तसेंच गायत्रीमंत्र व प्रणव यांनी हवन करावे. तसेच स्‍विष्‍टकृत्‌ होम करावा. ‘‘मरीचि’’---‘‘अग्‍नयेस्‍वाहा’’ ‘‘सोमायस्‍वाहा’’ ‘‘इंदवते०’’ ‘‘इदं विष्‍णुः’’ ‘‘मानस्‍तोके’’ ‘‘गायत्रीमंत्र’’ ‘‘प्रजापतेनत्‍वदेतानि’’ या मंत्रांनी तुपाच्या आहुति अग्‍नींत द्याव्या. ‘‘पराशर’’---‘‘प्रणवानें एकत्र करून प्रणवानें मंथन करून (घुसळून), प्रणवानें घेऊन प्रणवानें प्यावे. ‘‘मरीचि’’---पळसाचें पान, बेलाचें पान किंवा तिसरें तांब्‍याचें पात्र (पळी) याने तें प्यावें, हीं ब्रम्‍हपात्रें होत. ‘‘वृद्धपराशर’’---मनुष्‍याच्या देहांत चर्म व अस्‍थि यांत असलेल्‍या सर्व पातकाला जसा वाळलेला लाकडास अग्‍नि जाळतो त्‍याप्रमाणें ब्रम्‍हकूर्च जाळील. ब्रम्‍हकूर्च ज्‍या दिवशीं पिण्यात येईल त्‍या दिवशी उपास करावा. कारण, ‘‘ब्रम्‍हकूर्चाचा उपास अग्‍नि वाळलेल्‍या लाकडास जसा जाळतो त्‍याप्रमाणें पापास जाळतो.’’ असें ‘‘पराशराचें’’ म्‍हणणें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP