मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १५० वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १५० वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

‘‘यत्तु जाबालः’’ पक्‍वान्नमौषधं तैलं शय्या वास उपानहौ। कांस्‍यायस्‍ताम्रसीसं वा अर्धं कृच्छ्रार्धमेव च।
उदके फलमूलेषु पुष्‍पपर्णसगंधिषु। मृद्भांडमधुमांसेषु संतोष्‍य स्‍वामिनं ततः।
पापं निवेद्य विप्रेभ्‍यः प्रायश्चित्तेन युज्‍यत इति कृच्छ्रार्धं पादमित्‍यर्थं: तदधिकपरिमाणगुडादिविषयं ‘‘जाबालः’’ मणिमुक्ताप्रवालानां ताम्रस्‍य रजतस्‍य च। अयः कांस्‍योपलानां च द्वादशाहं कणान्नेति द्वादशगुणप्रायश्चित्तदर्शनात्तन्मूल्‍यात्‌ द्वादशगुणमूल्‍यमणिमुक्ताद्यपहार इदं ‘‘यत्तु विष्‍णुः’’ रजताश्र्व गोभूमिकन्यानां सकृद्धरणें चांद्रायणमिति तत्‍किंचिदधिकविषयं ‘‘मनुः’’ कार्पासकीटजोर्णानां द्विशफैकशफस्‍य च। पक्षिगंधौषधानां च रज्‍वाश्र्चैव त्र्यहं पय इति कीटजाः पट्टादयः

शिजलेलें अन्न, औषध, तेल वगैरे चोरलें असतां प्रायश्चित्त. पाणी फळें, चोरलीं असतां प्रायश्चित्त.

‘‘जें तर जाबाल’’ शिजलेलें अन्न, औषध, तेल, बिछान्या वरील वस्त्र, चर्मी जोडा, कांसें, लोखंड, तांबें व शिसें यांची चोरी केली असतां कृच्छ्रापाद प्रायश्चित्त जाणावें. पाणी, फळें, मुळें, फुलें, पानें, सुगंधिद्रव्य, मातीचें भांडें, मद्य व मांस यांची चोरी केली असतां मालकास खुष करून नंतर ब्राह्मणास आपलें पाप कळवावें. म्‍हणजे तो प्रायश्चित्ता विषयीं युक्त होत नाही. (प्रायश्चित्ती होत नाहीं)’’. असें म्‍हणतो तें अधिक ज्‍यांचें परिमाण (वजन-माप) आहे अशा गुळादिका विषयीं जाणावें. ‘‘जाबाल’’---मणि (माणीक), मोतीं, प्रवाळ, तांबें, रुपें, लोखंड, कांसें व दगड यांची चोरी केली तर बारा दिवस पावेंतों उपास. येथें बारा पट प्रायश्चित्त दिसतें त्‍यावरून त्‍यांच्या किमती पेक्षां बारापट ज्‍यांची किंमत आहे अशा माणिक, मोती वगैरेंच्या चोरी विषयीं हें (वचन) जाणावें. ‘‘जें तर विष्‍णु’’ ‘‘रुपें, घोडा, गाय, भूमि व कन्या यांची एक वेळां चोरी केली असतां चांद्रायण’’ असें म्‍हणतो तें कांहीं अधिकाविषयीं जाणावें. ‘‘मनु’’---कापूस, पाटाव, लोंकर, एक खुराचा प्राणी, दोन खुराचा प्राणी, पक्षी, सुगंधिद्रव्यें व दोरी यांची चोरी केली असतां तीन दिवस उदक प्यावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP