मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त ३९ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त ३९ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ प्रयोग.

चतुर्दश्यां कृतनित्‍यक्रियः पूर्वाण्हे प्राणानायम्‍य मासपक्षाद्युल्‍लिख्यामुकपापक्षयकामः श्रीकामोदेवताप्रीतिकामो रसायनादिसिद्धिकामो वामुकचांद्रायणं करिष्‍य इति संकल्‍प्य अग्‍ने व्रतपते व्रतं चरिष्‍यामीत्‍यादिमंत्रै र्व्रतमादित्‍याय निवेद्य केशश्मश्रुलोमनखानि श्मश्रूण्येव वा वापयित्‍वातद्दिन उपोष्‍य परदिनेऽमा चेत्तत्राप्युपोष्‍य पौर्णिमा चेत्‍पंचदशग्रासान्भुंजीत।
तत अमोत्तरपक्षे उपचयः पौर्णिमोत्तरपक्षेऽपचयो ग्रासानां। प्रतिदिनमुदिते चंद्रे आप्यायस्‍व सोमंतर्पयामि।
संते पयांसि० चंद्रं तर्पयामि। नवोनवो० चंद्रमसं तर्पयामीति तर्पयित्‍वाज्‍येनैतैरेव मंत्रै र्लौकिकेग्‍नौ हुत्‍वैतैरेव पात्रस्‍थं हविरनुमंत्र्यैतैरेव चंद्रमुपस्‍थाय यद्देवादेव हेडनमिति चतसृभिश्र्च प्रत्‍यृचमार्ज्य जुहुयात्‌ सर्वत्राग्‍नये न ममेति त्‍यागः।
ततो देवकृतस्‍येति त्रिभिः समित्‍त्रंयं हुत्‍वा ॐ भूः भुवः स्‍वः महः जनः तपः सत्‍यं यशः। श्रीः उक्‌।
ईट्‌ ओजः तेजः पुरुषः धर्म५ शिवः इत्‍येतैः पंचदश भिरेकैकं क्रमेण पात्रस्‍थं ग्रासमनुमंत्र्य मनसा नमः स्‍वाहेत्‍युक्‍त्‍वा सर्वाननुमंत्र्यैकैकमंगुल्‍यग्रैर्गृहीत्‍वा सावित्र्यानुमंत्र्य भक्षयेत्‌। तत्र प्रथमदिन एकग्रासभक्षणे प्राणाय स्‍वाहेत्‍यादयः पंचापि मंत्राः।
द्वयोर्ग्रासयोराद्यै स्त्रिभिर्मत्रैरेकंद्वाभ्‍यामपरं। त्रिषु ग्रासेषु द्वाभ्‍यां द्वाभ्‍यां द्वौ एकेनांत्‍यः। चतुर्षु द्वाभ्‍यां पूर्वं एकैकेनान्यान्‌।
पंचभ्‍योऽधिका ग्रासास्‍तूष्‍णीमेव भक्षणीयाः। समाप्तौ त्र्यवरान्‌ विप्रान्‌ भोजयित्‍वा गां दक्षिणां दद्यात्‌।
असमाप्ति प्रत्‍यहं त्रिषवणस्‍नानं सौरमंत्रैः कृतांजलिरादित्‍योपस्‍थानं गायत्र्या व्याहृतिभिः कूष्‍मांडैर्वाज्‍यहोमः।
दिवास्‍थितिः रात्रावुपवेशनं अशक्तौ शयनं यथाशक्ति आपोहिष्‍ठेतिसूक्तं, एतोन्विंद्र० ॠतंचेतितृचं, शन्नइंद्राग्‍नी० स्‍वस्‍तिनो मिमीतां० पुनंतु मां देवजनाः। ॠषभ०। विरजं० रौरवयोधाजये सामनी च पठेत्‌। एतेषामसंभवे गायत्रीं व्याहृतीः प्रणवं वा जपेत्‌।
एतच्च विप्रभोजनदक्षिणादानादिजपांतं सर्वेष्‍वपि प्राजापत्‍यादिव्रतेषु तुल्‍यम्‌

इति चांद्रायणव्रतप्रयोगः

चांद्रायणाच्या व्रताचा प्रयोग.

चतुर्दशीस स्‍नानसंध्यादि नित्‍यकर्म आटोपून पूर्वाण्हांत प्राणायाम करून मासपक्षादिकाचा उल्‍लेख करून ‘अमुक पापक्षयकामः’ किंवा ‘श्रीकामः’ किंवा ‘देवताप्रीतिकामः’ किंवा रसायणादिसिद्धिकामः’ ‘अमुकचंद्रायणं करिष्‍ये’ याप्रमाणें संकल्‍प करून ‘अग्‍ने व्रतपते व्रतं चरिष्‍यामि’ इत्‍यादि मंत्रांनी सूर्यास व्रत निवेनद करून केस (डोकीवरले), दाढी, मिशा, लोम (शरीरावले केस) व नखेंही काढवून किंवा दाढी मिशाच काढवून त्‍या दिवशी उपास करून जर दुसर्‍या दिवशी अमावास्‍या असेल तर त्‍याही दिवशी उपास करावा. दुसर्‍या दिवशी जर पौर्णिमा आली तर त्‍या दिवशी पंधरा ग्रास खावे. नंतर अमावास्‍येच्या पुढें (शुक्‍लपक्षांत) घासांची वृद्धि व पौर्णिमेच्या पुढील पक्षांत (कृष्‍णपक्षांत) ग्रासांचा र्‍हास करावा. दररोज चंद्राचा उदय झाल्‍यानंतर ‘‘आप्यायस्‍व०’’ हा मंत्र म्‍हणून ‘‘सोमं तर्पयामि’’ असें म्‍हणून तर्पण करावे. ‘‘संतेपयांसि’’ यानें ‘‘चंद्र तपर्पयामि’’ असें तर्पण करावे. ‘‘नवो नवो’’ या मंत्रानें ‘‘चंद्रमसं तर्पयामि’’ म्‍हणून पर्तण करावे. याप्रमाणें तर्पण करून याच मंत्रांनी लौकिकाग्‍नीत तुपाचा होम करून याच मंत्रांनी भांड्यांत असलेल्‍या हवीचें अभिमंत्रण करून याच मंत्रांनी चंद्राचें उपस्‍थान करून ‘‘य द्देवा देवहेडनं०’’ या चार ॠचांनी प्रत्‍येक ॠचेला तुपाचा होम करावा. सर्व ठिकाणी ‘‘अग्‍नये न मम’’ असा त्‍याग करावा. नंतर ‘देवकृतस्‍य’ या तीन मंत्रांनी तीन समिधांचा होम देऊन ‘‘ॐ भूः भुवः स्‍वः महः जनः तपः सत्‍यं यशः श्रीःऊक्‌ ईट ओजः तेजः पुरुषः धर्मः शिवः’’ या पंधरा मंत्रांनीं क्रमानें भांड्यांत असलेल्‍या प्रत्‍येक घासाचे अभिमंत्रण करून ‘‘मनसा नमः स्‍वाहा’’ असें म्‍हणून सगळ्या घासांचे अभिमंत्रण करून एकेक घास बोटांच्या अग्रांनी धरून गायत्री मंत्रानें अभिमंत्रण करून खावा. त्‍यांत पहिल्‍या दिवशी एक घास खावयाचा असल्‍यास ‘‘प्राणाय स्‍वाहा’’ इत्‍यादि पांचही मंत्र म्‍हणावे. दोन घास खावयाचे असल्‍यास पहिला पहिल्‍या तीन मंत्रांनी (प्राण, अपान व व्यान यांनी) व दुसरा पुढल्‍या दोन मंत्रांनी खावा. तीन घास असतां दोन दोन मंत्रांनी दोन व एकानें तिसरा. चार घास असतां पहिला दोन मंत्रांनी व दुसरे पुढील एकेक मंत्रानें खावे. पांचा पेक्षां अधिक घास असतां ते मुकाट्यानेंच (प्राणाय स्‍वाहा इ. न म्‍हणतां) खावे. व्रताची समाप्ति झाल्‍या नंतर कमीत कमी तीन ब्राह्मणांस भोजन घालून गाय द्यावी. व्रताची समाप्ति होई तो पावेतों रोज तीनदां स्‍नान व सौरमंत्रांनी हात जोडून सूर्याचे उपस्‍थान करावे. आणि गायत्रीमंत्रानें, व्याहृतींनीं किंवा कृष्‍मांड मंत्रांनी (यद्देवा देव हेडनं० या मंत्रांनी) तुपाचा होम करावा. दिवसा उभें रहावें, व रात्रीं बसावें अशक्त असतां निजावें जशी शक्ति असेल त्‍याप्रमाणें ‘‘आपोहिष्‍ठा’’ हें सूक्त, ‘‘एतोन्विंद्र०’’ ‘‘ॠतंच०’’ ‘‘विरजं०’’ हे मंत्र ‘‘रौरव योधाजये’’ हे दोन सामवेदाचे मंत्र म्‍हणावे. यांचा संभव नसतां गायत्रीमंत्र, व्याहृति किंवा प्रणव यांचा जप करावा. हें ब्राह्मण भोजन, दक्षिणा व दान या पासून जप पर्यंत कर्म सर्व प्राजापत्‍यादि व्रतांत सारखें आहे.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP