मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|प्रायश्चित्तमयूख|
प्रायश्चित्त १२५ वे

प्रायश्चित्तमयूख - प्रायश्चित्त १२५ वे

विधिविहित नित्‍यकर्म (संध्यादि) न केल्‍यामुळे, पाप केल्याने व सुरा इत्‍यादि निषिद्ध पदार्थांचे सेवन केल्‍यानें त्‍याच्या शुद्धिसाठी जें कर्म सांगण्यात येतें तें प्रायश्चित्त होय.

अथ चांडालान्ने.

‘‘अंगिराः’’ अंत्‍यावसायिनामन्नमश्र्नीयाद्यस्‍तु कामतः। स तु चांद्रायणं कुर्यात्तप्तकृच्छ्रमथापि वा।  
अत्र कामतश्र्चांद्रायणमकामतस्‍तप्तकृच्छ्रं।
‘‘यत्तु कृच्छ्रपादानुवृत्तौ वसिष्‍ठः’’ एतदेव चांडालान्नभोजने ततः पुनरुपनययं तदपि चांद्रायणसमानविषयं।
‘‘विष्‍णुः’’ चांडालान्नं भुक्‍त्‍वा त्रिरात्रमुपवसेत्‌ सिध्दं भुक्‍त्‍वा पराक इति तद्बलाद्भोजितविषयं।
‘‘यत्तु मनु सुमंतू’’ चांडालांत्‍यस्त्रियोगत्‍वा भुक्‍त्‍वा च प्रतिगृह्य च। पतत्‍यज्ञानतोविप्रो ज्ञानासाम्‍यं तु गच्छतीति।
तत्राज्ञानतोऽत्‍यंताभ्‍यासे पतित्‍योक्तेर्द्वादशाद्बं कामतस्‍तु चतुर्विंशत्‍यद्बं।
‘‘म्‍लेंच्छादिभिर्बलाद्भोजितस्‍य कारिताशुभकर्मणश्र्च प्रायश्चित्तमाहापस्‍तंबः’’ बलाद्दार्साकृताये तु म्‍लेंच्छचंडालदृस्‍युभिः।
अशुभं कारिताः कर्म गवादिप्राणिहिंसनं। उच्छिष्‍टमार्जनं चैव तथा तस्‍यैव भोजनं। खरोष्‍ट्रविड्वराहाणामामिषस्‍य च भक्षणं।
तत्‍स्‍त्रीणां च तथा संगं ताभिश्र्चसह भोजनं। मासोषिते द्विजातौ तु प्राजापत्‍यं विशोधनं। चांद्रायणं त्‍वाहिताग्रेः पराकस्‍त्‍वथवा भवेत्‌।
चांद्रायणं पराकं च चरेत्‍संवत्‍सरोषितः। संवत्‍सरोषितः शूद्रोमासार्धं यावकं पिबेत्‌। मासमात्रोषितः शूद्रः कृच्छ्रपादेन शुध्यति।
ऊर्ध्वं संवत्‍सरात्‍कल्‍प्‍यं प्रायश्चित्तं द्विजोत्तमैः। संवत्‍सरैस्त्रिभिश्र्चैव तद्भावं संनिगच्छति।
‘‘शूलपाणिस्‍तु’’ संवत्‍सरैश्र्चतुर्भिश्र्च तद्भावं सोऽधिगच्छति। र्‍हासो न विद्यते तस्‍य प्रायश्चित्तैर्दुरात्‍मन इत्‍यंते पपाठ प्राजापत्‍यचांद्रायणादि मासं वासमात्रेण गवादिहिंसायां तु प्रातिस्‍विकं तत्तत्‍प्रायश्चित्तमेवाकामतोविहितं ज्ञेयम्‌।

चांडाळाच्या अन्नाविषयीं.

चांडाळांचें अन्न ब्राह्मण, क्षत्रिय व शूद्र यांनी खाल्‍ले तर प्रायश्चित्त.

‘‘अंगिरस’’---जो बुद्धिपूर्वक चांडाळाचें अन्न खाईल, त्‍यानें चांद्रायण करावें. अज्ञानें खाल्‍लें तर तप्तकृच्छ्र करावें. ‘जें तर कृच्छ्राचा चतुर्थांश करण्याविषयीं वसिष्‍ठ’’ ‘‘चांडाळांच्या अन्नाच्या भोजनाविषयीं हेंच (प्राचश्चित्त) करून नंतर पुनरुपनयन करावें’’ असें म्‍हणतो तेंही चांद्रायण ज्‍यांत सांगितलें त्‍याविषयीं जाणावे. ‘‘विष्‍णु’’---चांडाळाचें अन्न खाल्‍लें तर तीन दिवस उपास करावा. (चांडाळानें) शिजविलेलें (अन्न) खाल्‍लें तर पराक करावा’’ असें म्‍हणतो तें बलात्‍कारानें जेऊं घातलेल्‍याविषयीं जाणावे. ‘‘जें तन मनु व सुमंतु’’ ‘‘जर ब्राह्मण अज्ञानानें चांडाळ व अंत्‍यज यांच्या स्त्रियांशी गमन करील, त्‍यांच्या बराबर जेवील व त्‍यांच्यापासून दान घेईल तर तो पतित होईल. जर तो बुद्धिपूर्वक पूर्वोक्त कर्में करील तर तो साम्‍यतेला पावेल (चांडाळाप्रमाणें होईल).’’ असें म्‍हणतात त्‍यांत अज्ञानानें अत्‍यंत अभ्‍यास असतां पातित्‍याची उक्ति आहे म्‍हणून द्वादशाद्ब (बारा वर्षे) व बुद्धिपूर्वक असतां चोवीस वर्षें प्रायश्चित्त. ‘‘आपस्‍तंब म्‍लेंच्छादिकांनीं बलात्‍कारानें जेऊं घातलेल्‍यास व ज्‍याचेकडून वाईट कर्म करविलें आहे अशास प्रायश्चित्त सांगतो’’---म्‍लेंच्छ, चांडाळ व चोर यांनी बलात्‍कारानें गुलाम बनविलेले अशांकडून गाय इत्‍यादि प्राण्यांची हिंसा करणें, त्‍यांचें उष्‍टें काढणें, त्‍यांचें अन्न खाणें, गाढव, उंट व गांवडुकर यांचें मांस खाणें, त्‍यांच्या स्त्रियांशी गमन करणें, त्‍यांच्या बराबर जेवणें अशा प्रकारचें वाईट कृत्‍य करविलें असतां एक महिनापर्यंत याप्रमाणें रहाणार्‍या द्विजास प्राजापत्‍यानें शुद्धि होईल. अग्‍निहोत्र्यास चांद्रायण किंवा पराक प्रायश्चित्त होय. एक वर्षपर्यंत राहिलेल्‍यानें चांद्रायण व पराक करावा. वर्षपर्यंत राहिलेल्‍यानें चांद्रायण व पराक करावा. वर्षपर्यंत राहिलेल्‍या शूद्रानें पंधरा दिवसपर्यंत यावक प्यावे. केवळ एक महिनापर्यंत राहिलेला शूद्र कृच्छ्राच्या चतुर्थांशानें शुद्ध होईल. वर्षाच्या पुढें श्रेष्‍ठ ब्राह्मणांनीं प्रायश्चित्ताची कल्‍पना करावी. तीन वर्षांनी तो त्‍यांच्या (म्‍लेंच्छादिकांच्या) धर्माला पावेल (म्‍लेंच्छादिकांसारखा होईल) शूलपाणि तर तो चार वर्षांनीं त्‍यांच्या साम्‍यतेला पावेल, त्‍या दुरात्‍म्‍यास प्रायश्चित्तांच्या योगानें कमीपणा येणार नाही’’ असा शेवटी (आपस्‍तंबाच्या वचनाच्या) पाठ करतो. एक महिनापर्यंत वास केल्‍यानें प्राजापत्‍य, चांद्रायण वगैरे प्रायश्चित्त. गाय इत्‍यादिकांची हिंसा केली तर आपआपलें जें जें प्रायश्चित्त असेल तें तेंच प्रायश्चित्त अज्ञानानें करावयास योग्‍य आहे असें जाणावें.

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP